Join us

Farmer Success Story : शेतकऱ्याने झेंडू शेतीतून साधले अर्थकारण; तीन महिन्यांत मिळाले तीन लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 18:08 IST

पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक आणि कमी पाण्यावर दोन एकरावर झेंडूची लागवड केली. कमी कालावधीत दोन एकरातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे बटनपूर येथील शेतकऱ्याने सांगितले. एवढेच नव्हे, तर शेतकऱ्याने २०१६ साली फुलाचे सर्वाधिक उत्पन्न घेतल्याबद्दल कृषी विभागाकडून प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविले होते.

महेश कणजे

वलांडी : पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक आणि कमी पाण्यावर दोन एकरावर झेंडूची लागवड केली. कमी कालावधीत दोन एकरातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बटनपूर येथील शेतकऱ्याने सांगितले. एवढेच नव्हे, तर शेतकऱ्याने २०१६ साली फुलाचे सर्वाधिक उत्पन्न घेतल्याबद्दल कृषी विभागाकडून प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविले होते.

बटनपूर येथील प्रगतिशील शेतकरी बसवराज काशिनाथ शेनारे यांची आपल्या सर्व्हे नंबर ३० मध्ये मध्यम ते सर्वसाधारण स्वरूपाची जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी उसाचे उत्पादन घेतले होते. जमिनीची कस कमी होऊ नये आणि पीक बदलून घ्यावे. या उद्देशाने त्यांनी फुल शेती घेण्याचा निर्णय घेतला.

यानंतर त्यांनी जूनमध्ये मुगाची पेरणी करून त्यात मुगाचे उत्पादन जुलै अखेरीस काढल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झेंडू लावण्यात आले. बियाणे आणून रोप तयार केले.

या जातीच्या बियाण्याचे २५ दिवसानंतर रोप तयार करण्यात आले. यानंतर दोन बाय पाच मध्ये या झेंडूच्या फुलांची रोपांची लागवड करून झेंडूची शेती बहरली. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दसऱ्याला ६ क्विंटल फुलांची पहिली तोडणी केली. या फुलांना ८० ते १०० रुपये भाव मिळाला. आता दिवाळी सणाकरिता जवळपास

२० क्विंटल फुलांची दुसरी तोडणी करण्यात आली असून, यापैकी १५ क्विंटल फुलाची विक्री झाली आहे. नांगरणी, कोळपणी, माती चढविणे, दांडाच्या माध्यमातून पाणी देणे प्रत्येक दहा दिवसाला एकदा कीटकनाशक फवारणी उर्वरित पाच क्विंटल फुले ही लक्ष्मी पूजन व पाडव्या दिवशी विक्री होतील.

या फुलांना उदगीर, भालकी व कमलनगर येथे सर्वाधिक मागणी आहे. तिसरी तोडणी म्हणजे तुळशी लग्न सोहळ्याच्या वेळी होईल. आता साधारणपणे आणखीन पाच क्विंटल उत्पन्न मिळण्याची आशा असून, आतापर्यंत दोन एकरात झेंडूचे तीन लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी शेनारे यांनी सांगितले.

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.

भालकी, कमलनगर येथे फुलांना मागणी...

■ या फुलांना उदगीर, भालकी व कमलनगर येथे सर्वाधिक मागणी आहे. तिसरी तोडणी म्हणजे तुळशी लग्न सोहळ्याच्या वेळी होईल. आता साधारणपणे आणखीन पाच एक क्विंटल उत्पन्न मिळण्याची आशा आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दसऱ्याला ६ क्विटल फुलांची पहिली तोडणी केली. या फुलांना ८० ते १०० रुपये भाव मिळाला. आता दिवाळी सणाकरिता

■ जवळपास २० क्विंटल फुलांची दुसरी तोडणी करण्यात आली असून, यापैकी १५ क्विंटल फुलांची विक्री झाली असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

हेही वाचा : Success Story : डाळबट्टी पिठातून उभारला शेती प्रक्रिया उद्योग; पळसगावचा प्रदीप करतोय वार्षिक ५० लाखांची उलाढाल

टॅग्स :शेती क्षेत्रलातूरमराठवाडाशेतकरीफुलंशेतीबाजारदिवाळी 2024