औरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल भोसले यांनी डाळिंबाचे 'शरदकिंग' नावाने वाण विकसित केले आहे. या वाणाला राष्ट्रीय पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम २००१ अंतर्गत 'स्वामित्व हक्क' (पेटंट) मिळाले आहेत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत यासंबंधीचे नोंदणी पत्र नुकतेच विठ्ठल भोसले यांना प्रदान केले.
सन २०१० ला आपल्या डाळिंब बागेत वेगळे वैशिष्ट्य असलेले झाड बघायला मिळाले. त्यानंतर त्यांनी त्या झाडापासून ४०० रोप विकसित केले. त्यावर अभ्यास करून नवीन वाग विकसित केले. त्याचे 'शरदकिंग' असे नामकरण केले. त्यांची जडगावला १८ एकर शेती असून त्यातील ५ एकरमध्ये त्यांनी स्वतः विकसित केलेल्या 'शरदकिंग' या वाणाचे डाळिंब लावले आहे. विठ्ठल भोसले यांनी डाळिंबाचे 'शरदकिंग' वाण विकसित करून देशपातळीवर जालना जिल्ह्यास बहुमान मिळवून दिला आहे.
'शरदकिंग'ची वैशिष्ट्ये- गडद भगवा रंग- आकाराने मोठे, ४०० ते ८०० ग्रॅमपर्यंत वजनाचे फळ- झाडांची व फळांची सेटिंग चांगली होऊन जवळपास ८० टक्के फळ एकाच आकाराचे मिळतात- साल जाड असल्याने सनबर्नचा प्रादुर्भाव देखील कमी होतो ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.