Lokmat Agro >लै भारी > नादच खुळा! पुण्यातील 'या' शेतकऱ्याचं शेतातच संशोधन अन् भुईमुगाच्या हायब्रीड वाणांची निर्मिती

नादच खुळा! पुण्यातील 'या' शेतकऱ्याचं शेतातच संशोधन अन् भुईमुगाच्या हायब्रीड वाणांची निर्मिती

Farmers are researching and developing groundnut hybrid varieties directly in their own fields bhor kiran yadav farmer | नादच खुळा! पुण्यातील 'या' शेतकऱ्याचं शेतातच संशोधन अन् भुईमुगाच्या हायब्रीड वाणांची निर्मिती

नादच खुळा! पुण्यातील 'या' शेतकऱ्याचं शेतातच संशोधन अन् भुईमुगाच्या हायब्रीड वाणांची निर्मिती

विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतावरच हा प्रयोग सुरू असून निवृत्त शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी नवीन वाण विकसीत केले जात आहेत. 

विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतावरच हा प्रयोग सुरू असून निवृत्त शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी नवीन वाण विकसीत केले जात आहेत. 

शेअर :

Join us
Join usNext

- दत्ता लवांडे

पुणे: शेतकरी आपल्या शेतात नव्या पिकांची, प्रजातींची लागवड करत असतात. तर काही शेतकऱ्यांना आपल्या शेतावर विविध प्रयोग करण्याची आवड असते. त्याचप्रमाणे पुण्यातील एक शेतकरी आपल्या शेतातच भुईमुगावर संशोधन करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतावरच हा प्रयोग सुरू असून निवृत्त शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी नवीन वाण विकसीत केले जात आहेत. 

दरम्यान, भोर तालुक्यातील संगमनेर येथील शेतकरी किरण यादव हे आपल्या शेतात मागच्या अनेक वर्षांपासून भुईमूग लागवड करत आहेत. तर काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या हेतूने त्यांनी आपल्याच शेतावर संशोधन सुरू केलं असून नवीन वाण विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बीएआरसी ट्रॉम्बे मुंबई येथील निवृत्त शास्त्रज्ञ डी. एम. काळे हे असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन यादव यांना मिळत आहे.

कसे आहे संशोधन?
देशामध्ये भुईमुगाचे 194 हून अधिक नवीन वाण विकसित केले गेले आहेत. यामध्ये स्पॅनिश उपटा प्रकाराचे 108, व्हॅलेन्सिया प्रकारचे 5, व्हर्जीनिया उपटा प्रकारचे 50, व्हर्जीनिया पसऱ्या प्रकारचे 31 नवीन वाण विकसित केले गेले आहेत. भारत सरकारच्या कृषी मंत्रालय विभागाने पीक गुणवत्ता प्रमाण संर्दभात बी-बियाणे कायद्या नुसार मध्यवर्ती उप समिती प्रस्थापित केली आहे. ती उपसमिती विकसीत नवीन वाण शेतकऱ्यांच्या शेतावर सर्वसाधारण लागवडीसाठी शिफारस व प्रसारित करते. देशातील विविध हवामान व पीक फेर पालट परिस्थिती नुसार  शेतकरी प्रामुख्याने कमी पक्व काळ (100 ते 120 दिवस) असलेल्या वाणाची लागवडी साठी निवड करतात. 

किरण यादव आणि त्यांचे कुटुंबीय
किरण यादव आणि त्यांचे कुटुंबीय

पीक सुधारणा ही निरंतर प्रक्रिया आहे. अधिक उत्पन्न क्षमता असलेले वाण विकसीत करण्याच्या खालील प्रमाणे विविध पध्दती आहेत:-
1) परदेशातील अधिक उत्पन्न क्षमताअसलेले वाण उपलब्ध करणे.
2) प्रचलित वाणामधील काढणीवेळी निरोगी व अधिक उत्पन्न क्षमता असलेल्या झाडांची निवड करणे व त्याचा पुढील लागवडीस उपयोग करणे.
3) सजातीय वंशावळी मधील भिन्न वाणाचा संकरीकरणासाठी उपयोग करणे.
4) उत्सर्जन किरणांचा उपयोग करुण उत्परिवर्तन घडविणे.
5) एकाच वंशावळीतील प्रचलीत व प्रजातीय वाणांचा संकरीकरणात उपयोग करणे.

शेतकऱ्याच्या शेतावर भुईमुग - संशोधन एक अभिनव प्रयोग 
पीक प्रजनन ही निरंतर प्रक्रिया आहे यामुळे पिकामध्ये सातत्याने सुधारणा घडविणे शक्य होते. राष्ट्रीय व राज्य पातळीवर विविध संशोधन केंद्र व कृषी विद्यापीठ, बिएआरसी, कृषी विज्ञान केंद्र, इक्रीसॅट इत्यादी संशोधन संस्थामध्ये भुईमूग पीक संशोधन चालू आहे. शेतकरी हवामानानुसार वाणाची लागवडीसाठी निवड करतात. सर्वसाधारणपणे अधिक उत्पन्न क्षमता, लवकर पक्व काळ व रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या वाणास शेतकऱ्यांची पसंती असते. व्यापाऱ्यांची उत्पादीत शेंगांमध्ये दाण्यांची अधिक प्राप्ती, तेलाचे प्रमाण अधिक किंवा कमी, दाण्याचा आकार,आकृती, रंग व चव यास पसंती असते. तेलामध्ये ओलीक (MUFA) स्निग्ध आम्ले अधिक असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. यामुळे आरोग्याबद्दल जागरुक असलेल्या लोकांची आरोग्यवर्धक तेलास पसंती असते.

वर नमूद केलेले वैशिष्ट्यानुसार गेली चार वर्षापासून भुईमूग निवृत्त शास्त्रज्ञ शेतकरी एकत्र सहकार्याने शेतकऱ्याच्याच शेतावर भुईमूग पीक संशोधन करीत आहेत. यासाठी खालील वाणांचा संकरीत प्रजननासाठी उपयोग करण्यात आला आहे.

(1) टी. ए. जी. -24
स्पॅनीश उपटा प्रकार, निम बुटका, वनस्पती वजन कमी व    शेंगाचे वजन अधिक म्हणजे कापणी निर्देशांक अधिक, शेंगाचा आकार  मध्यम व पक्व काळ (110 ते 115 दिवस).

(2) जम्बो          
व्हर्जीनिया उपटा प्रकार, शेंगाचा आकार मोठा , दाण्यामध्ये  प्रथिणे ओलीक स्निग्ध आम्लचे प्रमाण अधिक, पक्व काळ अधिक (140 ते 150 दिवस).

(3) नैसर्गीक उत्परिवर्तीत वाण
स्पॅनीश उपटा प्रकार, दाण्याचा रंग जांभळा, तेल व ओलीक स्निग्ध आम्लचे प्रमाण अधिक, शेंगाचा आकार मध्यम, पक्व काळ मध्यम (115 ते 120 दिवस).

(4) वेस्टर्न- 66
स्पॅनीश उपटा प्रकार, शेंगाचा आकार मध्यम, उत्पादन क्षमता अधिक, पक्व काळ मध्यम (115-120 दिवस). 
(5) किंग नीर- 20+ 
निम पसरा प्रकार, शेंगाचा आकार मध्यम, तेलाचे व तेलामध्ये ओलीक स्निग्ध आम्लचे प्रमाण अधिक, दाण्यामध्ये सुप्तावस्था अधिक (45 दिवस),सहनशील रोग प्रतीकार क्षमता.
(6) धनलक्ष्मी 
व्हॅलेन्सिया प्रकार, शेंगाचा आकार मध्यम, तीन दाणे शेंगाचे प्रमाण अधिक, पक्वकाळ लवकर (95 ते 100 दिवस).
(7)कादीरी लेपाक्षी
 व्हर्जीनिया उपटा प्रकार, शेंगाचा आकार लहान, संख्या अधिक, रोग प्रतीकारक क्षमता अधिक, पक्व काळ अधिक (120 ते 125 दिवस).
(8) कादीरी- 6 
स्पॅनीश उपटा प्रकार, शेंगाचा आकार लहान व  संख्या अधिक, रोग प्रतीकार क्षमता, पक्व काळ  (115-120 दिवस)

वरील ८ वाणा पासून ते नवीन एसडीएमके (संपत धमाका) वाणांची निर्मिती करीत आहेत. त्या वाणांच्या उत्पादन व  गुणवत्ता तपासणी माननीय संपतरराव यादव एस. आर. टी. फार्म हाऊसवर चालू आहेत. कोणताही शेतकरी पिकाचे उत्पादन घेण्याबरोबरच शेतात संशोधनही करू शकतो हे किरण यादव यांनी दाखवून दिलं आहे.


प्रचलीत वाणांचा आम्ही संकरीकरण प्रयोगात उपयोग करुन काही आशादायक संतती वंशावळ वाणांची निवड केलेली आहे. या निवडक वाणांची तसेच वंशावळ 3 व 5 पिढी यांची प्रचलीत वाणाबरोबर चाचणीसाठी 2024 उन्हाळी हंगामात लागवड केलेली आहे.
-  किरण संपत यादव (एस. आर. टी. शेतकरी, संगमनेर, ता. भोर, जि. पुणे)

Web Title: Farmers are researching and developing groundnut hybrid varieties directly in their own fields bhor kiran yadav farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.