मेहरून नाकाडेरत्नागिरी: केवळ एक पीक किंवा निव्वळ आंबा बागायतीवर अवलंबून न राहता संगमेश्वर तालुक्यातील सूर्यकांत पेडणेकर विविध पिके घेत आहेत. मुख्य पीक असलेल्या क्षेत्रात आंतरपीक घेत त्यांनी उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे.
सूर्यकांत यांची स्वतःची २२ एकर जागा लागवडीखाली आहे. शिवाय ५० एकर आसपासची पडीक जागा भाड्याने घेत लागवडीखाली आणली आहे. प्रत्येक जमीन व त्याचा पोत याचा अभ्यास करून नियोजनपूर्वक विविध पिकांची लागवड केली आहे. दहा एकर क्षेत्रावर त्यांनी देशी केळी लागवड केली आहे, तर तीन एकर क्षेत्रावर लाल केळी लावली आहेत.
केळीच्या बागेत ३० हजार अननस लागवड केली आहे. तसेच ६०० नारळ, सात हजार काजू, १००० दालचिनी, ५०० फणस, १०० आवळा लागवड केली आहे. घन लागवड पद्धतीने ३०० केशर आंबा लागवड व २०० हापूसची लागवडही केली आहे. तैवान पिंक या वाणाचे २०० पेरू झाडे लावली आहेत.
सेंद्रिय शेतीवर भर असल्यामुळे १०२ गायींचे संगोपन सूर्यकांत करव आहेत. गायींसाठी ओला चारा सतब मिळावा यासाठी दोन एकर क्षेत्राव नेपियर गवताची लागवड केली आहे शेतीच्या कामात सूर्यकांत यांच्या पत्नी, मुलगा, छोटा भाऊ यांची मदन मिळत आहे.
शेतीसाठी कृषितज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे मार्गदर्शन घेत आहेत सूर्यकांत यांनी सर्व प्रकारच्या पिकांची लागवड केली असून उत्पादन सुरु झाले आहे. विशेष म्हणजे पिकाचा दर्जा चांगला असल्याने विक्रीसाठ विशेष परिश्रम न करता, शेताच्य बांधावरच विक्री करावी लागत आहे.
बुशमिरी लागवड यशस्वीकेळीच्या बागेत अननस व बुशमिरीची लागवड केली आहे. झुडुपवर्गीय बुशमिरी चांगली बहरली आहे. याशिवाय नारळ झाडावर ४०० काळीमिरीचे वेलही सोडले आहे. ओली व वाळलेली दोन्ही प्रकारची काळी मिरी ते विकतात. काळीमिरी उत्पादनासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत. काळीमिरी वाळविण्यासाठी अधिक परिश्रम लागतात. त्याऐवजी ओली काळीमिरी विक्री करणे सुलभ ठरते, शिवाय दरही चांगला मिळतो. काळीमिरीसाठी वन्यप्राण्याचा त्रास होत नाही. शिवाय नारळ/सुपारी बागेत आंतरपीक शक्य आहे. सूर्यकांत यांनी तर केळीच्या बागेत अननस व बुशीमिरीचे आंतरपीक घेत आहेत.
चिक नसलेला फणससूर्यकांत यांनी एकूण ५०० फणसाची लागवड केली आहे. त्यामध्ये देशी, विदेशी विविध प्रकारचे फणस आहेत. विशेष म्हणजे चिक नसलेला फणस त्यांनी लावला आहे. चिकित्सक व प्रयोगशील वृत्तीमुळेच ते सतत नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करत आहेत. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाण लागवडीवर त्याचा भर आहे.
शेतीची पूर्वीपासूनच आवड होती, मात्र पारंपरिक शेतीऐवजी वेगळा प्रयोग म्हणून मिश्रपिकांची लागवड केली आहे. मुख्य पिकामध्ये आंतरपीक म्हणून अन्य लागवड करत आहे. त्यामुळे मुख्य पिकाचे नुकसान झाले तर आंतरपिकामुळे खर्च तरी भरून काढणे शक्य होते. कोकणच्या लाल मातीत विविध पिके शक्य आहेत. नियोजन करून शेती लागवड करून गावातील अन्य पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या आहेत. प्रत्येक पिकातून भरघोस उत्पन्न मिळविणे शक्य आहे, मात्र त्यासाठी अभ्यास, परिश्रम, चिकाटी गरजेची आहे. कुटुंबियांचे पाठबळ सतत लाभत आहे. - सूर्यकांत पेडणेकर, किरदाडी