कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी म्हणून ओळखली जाणारी रेशीम शेती करत देवगावमधील अनेक शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. बदलत्या हवामानाच्या, पाऊस पाण्याच्या सगळ्या मार्गावर पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन देवगावमधल्या अनेकांना लखपती केलं आहे.
शहादेव किसानराव ढाकणे. इतिहासात पदव्युत्तर झालेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याने तीन एकरात रेशीमाची लागवड केली. रेशमातून मिळणारं वार्षिक उत्पन्न साधारण १२ लाखांचं. जालना बाजारात एका बॅचची नुकतीच विक्री केल्याचे ते सांगतात. २८८ अंडेपुंजाची एक बॅच. दीड एकरातील या उत्पन्नातून एक लाख १९ हजार ५२० रुपये त्यांना मिळाले. पुढची बॅच तयार होण्यास लागणारा कालावधी १५ दिवसांचा. शहादेव ढाकणे म्हणतात, "
"माझी एकूण शेती 11 एकर. त्यातल्या फक्त तीन एकरभर मी रेशीम शेती केली. रेशमातून मिळणारे वार्षिक उत्पन्न भरपूर आहे. साधारण बारा लाख रुपये तीन एकरातून मिळतात. जालना मार्केटमध्ये काल एका बॅचची विक्री केली. 415 किलो दराने विक्री झाली. आता पुढची बॅच पंधरा दिवसांनी येईल. अंडीपुंज विकत आणल्यानंतर कोष होण्यासाठी अळ्यांना दोन वेळा पाला द्यावा लागतो. हा पाला कोरडा असणेच गरजेचे आहे. यासाठी वातावरण गरम ठेवणे, निर्जंतुकीकरण फवारणी अशी सगळी काळजी घ्यावी लागते. "
देवगावातीलच सोमनाथ गीतेंनी एकूण 18 एकर शेतीपैकी तीन एकर वरच रेशीम शेती केली. यांचंही वर्षाला रेशीम शेतीतून भरघोस उत्पादन आहे. तीन एकरातल्या रेशीम शेतीतून आठ ते नऊ लाख प्रति वर्ष नफा सोमनाथ गीते यांना झाला. यांना क्विंटल मागे 43 हजार रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
"माझं 18 एकर शेत आहे. तीन एकर रेशीम सोडल्यास कापूस, तूर, मका, मोसंबी अशी पिकं घेतली आहेत. बाकीच्या पिकांमधून 15 ते 18 लाख रुपयांचं उत्पन्न आहे." 32 वर्षीय सोमनाथ गीते म्हणाले.
यंदा पाऊस लांबल्यामुळे एकच बॅच झाली. तो नीट झाला असता तर आतापर्यंत दोन बॅच तरी निघाल्या असत्या, असे ते म्हणाले. एका बॅचमध्ये साधारण 250 अंडीपुंज असतात. त्यासाठी सव्वा एकर वर तुतीची लागवड करावी लागते.
सध्या मराठवाडा हे रेशीम लागवडीचे प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. औरंगाबाद मधील देओगाव गावातील अनेक शेतकऱ्यांनी रेशीम लागवडीचा प्रयोग येथील केला आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी कठोर परिश्रम आणि प्रगत पद्धतींवर अधिक भर दिला होता.