Lokmat Agro >लै भारी > विदेशासह, परराज्यातील फळबागांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागलाय लळा

विदेशासह, परराज्यातील फळबागांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागलाय लळा

Farmers of Marathwada are developing foreign & abroad orchards | विदेशासह, परराज्यातील फळबागांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागलाय लळा

विदेशासह, परराज्यातील फळबागांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागलाय लळा

डाळिंब, चिकू, लिंबोणी, पेरू, केळी द्राक्षे, संत्रा, ड्रॅगन, खजुरा, सफरचंद या फळबागांच्या शेतीला शेतकऱ्यांचे प्राधान्य

डाळिंब, चिकू, लिंबोणी, पेरू, केळी द्राक्षे, संत्रा, ड्रॅगन, खजुरा, सफरचंद या फळबागांच्या शेतीला शेतकऱ्यांचे प्राधान्य

शेअर :

Join us
Join usNext

नितीन कांबळे

हवामान बदलामुळे पारंपरिक पिके घेताना अडचण येत असल्याने व आर्थिक लाभाचा मेळ बसत नसल्याने आधुनिक शेतीची कास धरत विदेशासह, परराज्यातील फळबागांचा आष्टी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना लळा लागला असून, लाखो रुपयांचे उत्पन्न काही शेतकरी घेत आहेत. त्यामुळे या फळबागांचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी हा दुष्काळी तालुका म्हणून संबोधला जातो. शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करून दरवर्षी हंगामी पिके घ्यायचा पण यात आर्थिक पडतळ बसत नसल्याने हळूहळू नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेले. शेतीविषयक माहिती उपलब्ध होत गेली. मग याच माध्यमातून कमी पाणी, कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळवले जात असल्याने आधुनिक पद्धतीने शेतकरी शेती करू लागले.

ज्यात आता डाळिंब, चिकू, लिंबोणी, पेरू, केळी द्राक्षे, संत्रा या फळबागांच्या शेतीला प्राधान्य देत शेतकरी आर्थिक उन्नती साधत असताना नवनवीन प्रयोग यशस्वी कसे करता येतील यासाठी झगडत आहेत. 

सफरचंदाची लागवड

हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या भागात पिकणारे सफरचंदाचे पीक महाराष्ट्रातल्या तापमानात येऊ शकते का?  याचा अंदाज घेत आष्टी तालुक्यात काही शेतकरी सफरचंदाची लागवड करीत आहेत.

ड्रॅगनच्या शेतीकडे वळाले शेतकरी

थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल आणि श्रीलंका या देशात व्यापारी तत्त्वावर ड्रॅगन फळांची लागवड केली जाते. या पिकाला रोग आणि किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून, पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. मागील काही वर्षांत महाराष्ट्रात काही भागात ड्रॅगनची शेती शेतकरी करू लागले. आष्टी तालुक्यातही काही शेतकरी याकडे वळले आहे.

महाराष्ट्रातही खजूर शेतीचा प्रयोग

सौदी अरेबिया, इजिप्त, इराणमध्ये खजूर शेती प्रसिद्ध आहे. राजस्थान आणि गुजरातमध्ये खजुराची लागवड केली जाते, तर महाराष्ट्रातही खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी ठरत आहे. हीच खजूर शेती आता ग्रामीण भागातील दुष्काळी आष्टी तालुक्यात काही ठिकाणी केली जात आहे.

सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा

या फळबागांचे क्षेत्र वाढले

सफरचंद ३ हेक्टर

ड्रॅगन फ्रूट १४ हे.

खजूर ३ हेक्टर

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपण विविध फळबागांची यशस्वी शेती करू शकतो. यासाठी शिक्षण असावेच असे काही नाही. फक्त कष्ट करण्याची जिद्द असावी, मी अंगठेबहाद्दर असूनदेखील सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, खजूरची यशस्वी शेती केली आहे. आजच्या तरुणांनी देखील अशा आधुनिक शेतीकडे वळावे. - विजया घुले, शेतकरी, केळसांगवी

ग्रामीण भागातील शेतकरी आता हवामानाचा अंदाज घेत वेगवेगळ्या पद्धतीचे शेतात प्रयोग करत आहेत. आजवर तालुक्यात विदेशासह परराज्यातील सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, खजूर या फळबागांची यशस्वी शेती करणारे शेतकरी आहेत. भविष्यात ही फळबाग शेती वाढेल. कृषी विभागाकडून आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते. गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी

Web Title: Farmers of Marathwada are developing foreign & abroad orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.