राजेंद्र मांजरे
कांद्याला सध्या बाजारपेठेमध्ये कमी बाजारभाव मिळत असला तरी जे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड करत आहे त्यांना बाजार चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहे. कांद्याचे भाव घसरल्यानंतर शेतकरी त्याची लागवड कमी करत आहेत.
त्याचवेळी काही शेतकरी वेगळ्या पद्धतीने कांदा पिकवून आज चांगले आर्थिक उत्पादन घेत असल्याचे चित्र दिसत आहे. खेड तालुक्यातील खरपुडी (खुर्द) येथील शेतकरी बाळासाहेब विठोबा गाडे यांनी कांद्याच्या लागवडीत बदल करण्याचा विचार केला आणि त्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीने कांद्याचे उत्पादन घेत आहेत.
खरपुडी येथील शेतकरी बाळासाहेब गाडे यांनी माळरानावर एक एकर क्षेत्रात शेती फुलवली आहे. गेल्या तीन वर्षापासून रासायनिक खतांचा दुष्परिणाम ओळखून जैविक पध्दतीने एकर शेतजमिनीत कांद्याची लागवड करत आहे.
त्यांनी कांदा उत्पादित करण्यासाठी कुठल्याच प्रकारची कीटकनाशके तणनाशके बुरशीनाशके तसेच रासायनिक खतांचा वापर केला नाही, त्यांनी पूर्णतः जैविक म्हणजेच सेंद्रिय खतांचा वापर केला. जैविक खतांमध्ये त्यांनी चांगल्या प्रतीचे जुने कुजलेले शेणखत, गोमूत्र इत्यादी नैसर्गिक खतांचा वापर केला आहे.
एक एकर क्षेत्रात टप्प्याटप्प्याने कांदा लागवड केली असून पिकांची निगा राखत आहेत. नियमित उत्पादनाच्या तुलनेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या कांद्याचे उत्पादन कमी मिळत असले तरी मात्र चव, गुणवत्ता व प्रतवारी चांगली असल्याने त्यांच्या कांदा पिकांला चांगला बाजारभाव मिळत असतो.
तसेच अनेक व्यापारी थेट बांधावर येऊन कांदा खरेदी करत असल्याचे शेतकरी गाडे यांनी सांगितले, शेतात एक पत्रा शेड उभारून तार जाळी वर्तुळाकार गोल कणगीत कांदा साठवून ठेवतात त्यामुळे कांद्याची टिकवणक्षमता, प्रतवारी चांगली राहते. जुलै, ऑगस्ट महिन्यात कांदा विक्री करत असल्याचे शेतकरी गाडे सांगतात.
जैविक पद्धतीने कांदा लागवड करून जैविक खतांचा वापर करून उत्पादित केलेला कांदा हा पूर्णतः विषमुक्त असल्याने त्यांच्या कांद्याला चांगली मागणी मिळते, गावातील शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर करून कांदा शेती करावी यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. - बाळासाहेब गाडे (कांदा उत्पादक शेतकरी, खरपुडी, ता. खेड)
बाळासाहेब गाडे गेल्या काही वर्षापासून ऑरगॅनिक औषधे खते वापरून यशस्वी कांदा उत्पादन घेत आहे. कांदा खाण्यासाठी ही अतिशय चविष्ट असून रासायनिक प्रक्रिया न केल्यामुळे तो दीर्घकाळ टिकतो. कांद्याचे आगर असलेल्या खेड तालुक्यात सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी कांदा लागवड ही काळाची गरज आहे. - सोमनाथ टोपे, अध्यक्ष, विकास सोसायटी, वाकी
अधिक वाचा: गडगंज पगाराची विदेशी नोकरी सोडून तयार केला स्वतःचा शेतमाल ब्रँड