Lokmat Agro >लै भारी > नोकरी मिळेना! कांदा व्यापारातून शेतकरीपुत्र कमावतोय वर्षाकाठी २० लाख

नोकरी मिळेना! कांदा व्यापारातून शेतकरीपुत्र कमावतोय वर्षाकाठी २० लाख

ganesh hanpude solapur farmer son earning 20 lakhs per year by trading onion | नोकरी मिळेना! कांदा व्यापारातून शेतकरीपुत्र कमावतोय वर्षाकाठी २० लाख

नोकरी मिळेना! कांदा व्यापारातून शेतकरीपुत्र कमावतोय वर्षाकाठी २० लाख

शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्थेत पाऊल टाकलं पाहिजे असं गणेश सांगतो.

शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्थेत पाऊल टाकलं पाहिजे असं गणेश सांगतो.

शेअर :

Join us
Join usNext

- दत्ता लवांडे

सोलापूर :  
शेतकरी शेतीत उत्पादन घेतो पण शेतमाल नसल्याने कवडीमोल दरात विक्री करावी लागते. कमी दरात विक्री केल्याने शेतकरी नुकसानीत जातो पण व्यापारी मात्र मालामाल होतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्थेत पाऊल टाकले पाहिजे. हाच हेतू समोर ठेवून गणेश हणपुडे हा अवघा २८ वर्षाचा शेतकऱ्याचा मुलागा कांदा व्यापारातून वर्षाकाठी तब्बल २० लाखांचा निव्वळ नफा कमावत आहे. 

गणेश हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातला. पुण्यात नोकरीच्या हिशोबाने त्याने २०१७ मध्ये पुणे गाठले. नाटकामध्ये आवड असल्याने सुरूवातील नाटकामध्ये काम करणे सुरू केले. कलेची आवड असल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावण्याच्या दृष्टीने त्याचा संघर्ष चालू होता. पण कला क्षेत्रातही हाताला काम मिळत नसल्यामुळे त्याने नाटक करता करता स्विगी, झोमॅटोमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम केले. पण त्यातूनही त्याला पुरेसे पैसे मिळत नव्हते. पुढे त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. 

गावात शेती होती, शेतीतून चांगले उत्पन्न निघत होते पण पुरेसा दर मिळत नव्हता. शेतकरी भरडला जात होता पण व्यापारी मात्र कायम मालामाल होत होते हे त्याच्या डोक्यात होते. सिंधुदुर्ग येथे नोकरी करत असलेल्या भावाकडे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना तेथील कांदा बाजारातील दर पाहून शेतकऱ्यांकडून कमी दरात माल खरेदी करून व्यापारी जास्त दरात विक्री करतात असं त्याच्या लक्षात आलं आणि कांदा विक्रीचा व्यापार करण्याची कल्पना सुचली. पुढे २०२० साली गणेशने कांद्याच्या व्यापाराला सुरूवात केली. 

सुरवातीला त्याला भरपूर अडचणी आल्या. कांदा कुठे विकावा? त्याचा सौदा कसा करावा? कोणत्या मार्केटमध्ये चांगला दर मिळतो? असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर होते. सुरूवातील तो पिकअप गाडीमध्ये कांदा भरून दुसऱ्या जिल्ह्यांत विक्रीसाठी पाठवत होता. नंतर त्याने परांडा येथे गणेश ट्रेडर्स या नावाने व्यापार सुरू केला. आजच्या घडीला तो शेतकऱ्यांचा कांदा मोठमोठ्या कंटेनरने परराज्यांत पाठवतो. कांद्याच्या व्यापारातून तो वर्षाकाठी पाच कोटींच्या घरात उलाढाल करतो आणि  २० लाख रूपयांचा निव्वळ नफा कमावतो. हा व्यवसाय आणखी वाढवण्याचा त्याचा मानस आहे. 

परांडा येथे असलेला गणेशचे कांदा खरेदी केंद्र
परांडा येथे असलेला गणेशचे कांदा खरेदी केंद्र

मावसभावाला सोडायला लावली जर्मन कंपनीतील नोकरी
गणेशचा मावसभाऊ सुजित निंबाळकर हा जर्मन कंपनीत काम करत होता. पण गणेशने त्याला कांदा व्यापारात नफा जास्त असल्याचं सांगितलं आणि नोकरी सोडायला सांगितली. पुढे गणेश हणपुडे आणि सुजित निंबाळकर या दोघांनी मिळून हा व्यवसाय पुढे नेला आणि आज त्यांच्या या व्यवसायातील वार्षिक उलाढाल पाच कोटींच्या घरात आहे. 

शेतकऱ्यांना फसवण्याची भावना नाही

जे पूर्णवेळ व्यापारी असतात त्यांना शेतकऱ्यांना तोटा होतो याचे फारसे घेणेदेणे नसते. पण गणेश शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात तो कांदा खरेदी करतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कांद्याच्या बाजारपेठेसंदर्भात आणि दरासंदर्भात मार्गदर्शनही करतो. किती काळ कांदा ठेवावा, भविष्यात दर मिळेल की नाही असा सल्लाही तो देतो.

एकासोबत दुसऱ्याही व्यवसायाची जोड

व्यवसाय करत असताना फक्त एकच व्यवसाय करून चालत नाही, त्याच्या जोडीला इतर व्यवसायही असायला हवेत म्हणून गणेशने मागच्या दोन वर्षांपासून दिवाळीच्या सणानिमित्त पुण्यात फटाके विक्रीचा व्यवसाय केला. त्यातून गणेशला आठ दिवसांत दीड लाखांचा नफा झाला. 

शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसायात उतरावे

शेतकऱ्यांना कसं पिकवावं हे सांगायची गरज पडत नाही, तर कसं विकावं हे सांगणं गरजेचं असतं. विक्री व्यवस्था शेतकऱ्यांना जमत नाही म्हणून आज शेतकऱ्यांची ही स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलाने विक्री व्यवस्थेत उतरले पाहिजे आणि आपण जो माल उत्पादित करतो तो माल विकला पाहिजे. जोपर्यंत शेतकरी प्रत्यक्षपणे विक्री व्यवस्थेत उतरत नाही तोपर्यंत शेती व्यवसाय तोट्यात राहील असं तो सांगतो. 

शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसायात उतरले पाहिजे. व्यापार काय आहे ते समजून घेतले पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांना व्यापार समजणार नाही तोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. आपण उत्पादित केलेला माल आपणच विक्री करावा लागेल तेव्हा शेती कुठेतरी नफ्यात येईल. लोकमतच्या माध्यमातून शेतकरी पुत्रांनी शेतमालांच्या व्यापारात उतरावे असं आवाहन मी करतो.
- गणेश हणपुडे (शेतकरी, कांदा व्यापारी, करमाळा)

Web Title: ganesh hanpude solapur farmer son earning 20 lakhs per year by trading onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.