बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा: आढळगाव येथील शेतकरी भाऊसाहेब भानुदास उबाळे यांनी विजेच्या लपंडावावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेवरचे दोन कृषी पंप बसविले आणि सौर ऊर्जेवरच्या कृषी पंपावर साडेपाच एकर कांदा केला कांद्याला वेळेवर पाणी मिळाले आणि कांद्याचे पिक जोमदार पिक आले साडे पाच एकरात १ हजार ७५० गोणी कांदा निघाला.
यामधुन चालू बाजारभावानुसार ११ लाखाचे उत्पन्न निघाले आहे. आढळगाव चे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांचे वडील भाऊसाहेब उबाळे यांना घोडेगाव तलावाजवळ १३ एकर क्षेत्र आहे या क्षेत्रात ऊस आठ एकर पाच एकर कांदा होता ऊसातून १२ लाखाचे उत्पन्न निघाले.
विज टंचाईवर मात करण्यासाठी शासकीय अनुदान योजनेतून सौर ऊर्जेवरचे तीन एच पी चे दोन कृषी पंप बसविले या साठी ३२ हजाराचा खर्च आला आणि सौर ऊर्जा सिस्टीम मुळे कृषी पंपाचे विज बिल कमी झाले.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाफे पध्दतीने साडे पाच एकर गावरान कांदा लागवड केली. शेण खेत बरोबर रासायनिक खताची मात्रा दिली किटक नाशक फवारणी केल्या.
सौर ऊर्जा कृषी पंपामुळे कांदा पिकाला पाणी वेळेवर मिळाले त्यामुळे एका कांद्याचे वजन सरासरी २०० ग्राम इतके झाले कलरही चांगला आला.
सध्या कांद्याचे भाव कोसळलेले आहेत मात्र उबाळे परिवाराला कांद्याचे एकरी उत्पादन चांगले निघाले त्यामुळे एकरी दोन लाखाचे उत्पन्न मिळाले मिळाले आहे. उत्पादन खर्च वगळता ६ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे.
विजेचा लपंडावामुळे कृषी पंप चालत नाही पिकाला वेळेवर पाणी मिळाले नाही कि उत्पादनात घट होते परिणामी शेतीचे नफा तोट्याचे समीकरण बिघडते आणि शेतकरी नाराज होतात शासनाच्या अनुदान योजनेतुन दोन कृषी पंप बसविले आणि विज टंचाईची चिंता संपली शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेवरचे कृषी बसविले तर निश्चित फायदा आहे. - भाऊसाहेब उबाळे, शेतकरी, आढळगाव
अधिक वाचा: पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल