Lokmat Agro >लै भारी > ६ एकरात २३ लाखांचे उत्पन्न, केळी विकली थेट चंडीगढला

६ एकरात २३ लाखांचे उत्पन्न, केळी विकली थेट चंडीगढला

Hard work pays off, income of 23 lakhs from 6 acres | ६ एकरात २३ लाखांचे उत्पन्न, केळी विकली थेट चंडीगढला

६ एकरात २३ लाखांचे उत्पन्न, केळी विकली थेट चंडीगढला

मेहनतीचे फळ : शेतकरी झालाय मालामाल

मेहनतीचे फळ : शेतकरी झालाय मालामाल

शेअर :

Join us
Join usNext

कष्ट करण्याची तयारी दाखवली तर सर्वकाही साध्य होते. पण, त्याकरिता कष्ट करणे आवश्यक आहे. कळमनुरी तालुक्यातील डिग्रस वंजारी येथील एका शेतकऱ्याने सहा एकरात केळीचे पीक घेत यातून, जवळपास २३ ते २४ लाख उत्पन्न मिळविले. नुसते उत्पादनच घेतले नाही तर थेट चंदीगडला केळी पाठविल्याने त्यांना हा फायदा झाला.

डिग्रस वंजारी येथील शेतकरी नागेश नारायण गोरे हे दरवर्षी सोयाबीन, कापूस व इतर पारंपरिक पिके घेत शेती करीत होते. सिंचनाची सोय नसल्याने त्यांना यावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र या चक्रातून बाहेर पडण्यासाठी एक विहीर व बोअर घेतला. तेथून काही अंतरावरूनच इसापूर धरणाचा कॅनॉलही गेला आहे. पाणीही जेमतेम असले तरी त्याचे नियोजन करून केळी पीक घेण्याचे ठरविले. इतर शेतकरी व कृषी विभागाच्या मदतीने सहा एकरात केळी लावली. अपार कष्ट घेतले तेव्हा केळीही चांगली बहरली. घडही चांगले भरले.

मात्र स्थानिकला भाव मिळत नसल्याने काय करायचे, हा प्रश्न होता. त्यांनी इंटरनेट व काही जाणकारांकडून माहिती घेतली तर चंदीगडला चांगला भाव मिळत असल्याचे कळाले. मग त्यांनी त्याचे नियोजन केले.

चंदीगडला पाठवली केळी.....

पिकते तिथे विकत नाही असे म्हणतात. गोरे यांनाही तोच अनुभव आला. मग काय त्यांनीही जेथे चांगला भाव मिळतो, ते ठिकाण चंदीगड शोधले. तेथे माल पाठविला आणि २६ लाखांचे उत्पन्न मिळविले. अजूनही एक, दोन गाड्या माल शिल्लक राहिला आहे. तोही चंदीगड येथे पाठविला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये केळीला भाव मिळत नसल्याने इतरत्र ती विकण्याचा निर्णय फायदेशीर ठरला.

चंदीगडला केळी पाठवली. या वर्षात भाव पण १८०० ते १९०० मिळाला. केळीचे रोप हे मध्य प्रदेशामधून घेतले होते.हे एक रोप १५ रुपयांना घेतले होते. ते २ रोप रेवा कंपनीचे होते. केळीसाठी सहा एकरमध्ये तीन लाख खर्च केला. केळी वाढावी यासाठी जास्त प्रमाणात लेंडी खताचा वापर केला. तसेच काही प्रमाणात रासायनिक खते वापरले. 

मेहनतीला नशिबाची साथ

पैसा जवळ असूनही काही उपयोग नसतो. कधीकधी नशीबही लागते. मात्र या फळबागेसाठी मेहनत घ्यावी लागते. या बागेची व्यवस्थित जोपासना करूनच थांबता येत नाही. तर नंतर विक्रीचेही योग्य नियोजन लावावे लागते. ते गणित जुळून आले. त्यामुळे हे उत्पन्न घेता आले. - नागेश नारायणराव गोरे, शेतकरी

Web Title: Hard work pays off, income of 23 lakhs from 6 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.