Join us

इस्रायल पॅटर्नची कमाल; पाणी लागेल कमी, भरघोस सीताफळं पिकण्याची हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:01 AM

शिरूर तालुक्यातील खैरेवाडी येथील प्रकाश आनंदराव खैरे व त्यांची पत्नी यांनी तीन वर्षांपूर्वी एक हेक्टरमध्ये सीताफळांच्या रोपांची आठ बाय दहा वर इस्राईल पद्धतीने लागवड केली होती सीताफळांची रोपे ठिबक सिंचनासाठी ८० हजार रुपये खर्च आला असून सीताफळांच्या झाडांना सीताफळे लगडली आहे मुंबई बाजारात मागणी ही वाढली आहे.

सिकंदर तांबोळीपाण्याची कायम भासणारी कमतरता त्यात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न याचा पा कसलाच ताळमेळ बसत नसल्याने पारंपारिक शेती अडचणीत येत आहे. आधुनिक पद्धतीने शेती करत एक हेक्टर क्षेत्रात साडेसहाशे सीताफळ झाडांची लागवड केली आहे. या सिताफळाच्या झाडांची लागवड तीन वर्षापूर्वी केली आहे. यावर्षी लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. त्यास मुंबईत मार्केट मिळत असल्याने ग्रामीण भागातील खैरेवाडीच्या सीताफळाने मुंबईकरांमध्ये गोडवा निर्माण केला असल्याचे खैरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश खैरे यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील खैरेवाडी येथील प्रकाश आनंदराव खैरे व त्यांची पत्नी यांनी तीन वर्षांपूर्वी एक हेक्टरमध्ये सीताफळांच्या रोपांची आठ बाय दहा वर इस्राईल पद्धतीने लागवड केली होती सीताफळांची रोपे ठिबक सिंचनासाठी ८० हजार रुपये खर्च आला असून सीताफळांच्या झाडांना सीताफळे लगडली आहे मुंबई बाजारात मागणी ही वाढली आहे. मुंबईतील व्यापाऱ्यांनी जागेवरच फळांची खरेदी केली असून सीताफळ गोड आणि चवदार असल्यामुळे मागणी वाढले आहे. ग्रामीण भागात तरुण शेतकऱ्याला एक हेक्टर मधून एक लाखाची आर्थिक उन्नती झाली आहे.

लागवडीचे तंत्र■ लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून, कुळवून घ्यावी. हलक्या व मुरमाड जमिनीत ४ x ४ मीटर आणि मध्यम जमिनीत ५ x ५ मीटर अंतरावर ४५ x ४५ × ४५ सेंमी आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात लाग लागवडीपूर्वी शेणखत १ ते ते १.५ घमेले, पोयटा माती २ ते ३ घमेले, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत.■ पाऊस पडल्यानंतर खड्ड्यामध्ये कलमे किंवा रोपे लावावीत. खत, माती मिश्रमाने भरलेल्या खड्यामध्ये रोपे, कलमे लागवताना मध्यभागी लहान खड्डा करून लावावीत. काठीचा आधार देऊन, सुतळीने सैल बांधावीत.

अधिक वाचा: कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन देणारं गवती चहाचे पिक

फळबाग शेतीकडे वळावेआधुनिक तंत्रज्ञानाचा व बुद्धीक वापर करून तरुणांनी फळबाग शेतीकडे वळायला हवे ही शेती नक्कीच आर्थिक भरारी देत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची झाडांची योग्य अशी काळजी घेतलीमार्केट मध्ये या फळाना चांगली मिळते. ही फळे जर मुंबईसह इतर ठिकाणी विक्रीसाठी नेली. तर त्यांना चांगला भावही मिळतो.

टॅग्स :शेतीफलोत्पादनशेतकरीपीकमुंबईइस्रायलबाजारफळे