केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत घेण्यात येणारी या अतिशय प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे नामांकन झाले आहे. या स्पर्धेसाठी नामांकित झालेले हे राज्यातील हे एकमेव गाव आहे, हे विशेष. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत पाटगाव येथील मधाचे गाव पाटगाव या उपक्रमामुळे मधुपर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. या उद्योगाच्या माध्यमातून पाटगावसह आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नाबार्डच्या सहकार्यातून 'पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी' स्थापन करण्यात आली आहे.
मध निर्मिती प्रक्रिया व विक्री उद्योग यासाठी पाटगावच्या मधाचे ब्रँडींग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटींगसाठी आवश्यक ती सर्व तयारी सरकारने पूर्ण केली. यापुढील काळात पाटगावच्या मधाचे ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटींगसाठी आवश्यक ती सर्व तयारी सरकारने पुणे केली आहे. यापुढील काळात पाटगावच्या मधास चांगलीच मागणी येईल.
मधमाशी पालनासाठी या गावात होत असलेल्या या प्रयत्नांची दखल देशपातळीवर घेतली जात आहे. ही बाब अत्यंत अभिमानास्पद असून हा उपक्रम देशातील पथदर्शी उपक्रम ठरेल. - दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्हापूर
पश्चिम घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्ह्यात मध व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते, म्हणून पाटगाव परिसरातील मौजे तांबाळे, अंतूल, शिवडाव, पाटगाव, मळगाव, मानी, शिवाची वाडी, धुयाची वाडी गावातील ३५ महिलांना सेंद्रिय मधसंकलन प्रक्रियेत सामावून घेत त्यांना हक्काचा मध उद्योग- व्यवसाय मिळवून देण्यासाठी मंडळाने प्रयत्न केले. - रवींद्र साठे, सभापती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ