Lokmat Agro >लै भारी > बागायतदार ते साताऱ्यातील एकमेव द्राक्षाचे निर्यातदार; वरूडे कुटुंबीय कमावतात वर्षाकाठी एक कोटींचा नफा

बागायतदार ते साताऱ्यातील एकमेव द्राक्षाचे निर्यातदार; वरूडे कुटुंबीय कमावतात वर्षाकाठी एक कोटींचा नफा

Horticulturist sole grape exporter in Satara Varude family earns profit one crores per year | बागायतदार ते साताऱ्यातील एकमेव द्राक्षाचे निर्यातदार; वरूडे कुटुंबीय कमावतात वर्षाकाठी एक कोटींचा नफा

बागायतदार ते साताऱ्यातील एकमेव द्राक्षाचे निर्यातदार; वरूडे कुटुंबीय कमावतात वर्षाकाठी एक कोटींचा नफा

साताऱ्याचे वरूडे कुटुंबीय द्राक्ष निर्यातीतून कमावतात वर्षाकाठी १ कोटींची नफा

साताऱ्याचे वरूडे कुटुंबीय द्राक्ष निर्यातीतून कमावतात वर्षाकाठी १ कोटींची नफा

शेअर :

Join us
Join usNext

सातारा : कितीही मोठा महापूर आला तरी पूर ओसरल्यानंतर लव्हाळ्याची काडी परत नव्याने आपलं अस्तित्व निर्माण करत असते. त्याचप्रमाणे अनेक शेतकरी जगभरातल्या स्पर्धेमध्ये शून्यातून आपलं विश्व निर्माण करू पाहत असतात. पण सगळ्यांना येईल ते यश कसलं. त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि आपल्या कष्टात सचोटी असावी लागते. याचप्रकारे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव तालुक्यात पाण्याची कसलीही सोय नसताना, अल्पभूधारक असलेल्या वरूडे कुटुंबियांनी द्राक्ष निर्यातीतून आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. 

साधारण १९८४ साली विठ्ठल वरूडे, रामकृष्ण वरूडे आणि राजेंद्र वरूडे या भावंडांनी एक एकर द्राक्षाची बाग लागवड केली होती. आपल्या मालाला इथल्या लोकल मार्केटमध्ये दर मिळत नसल्याचं पाहून त्यावेळीच त्यांनी आपला माल परदेशात निर्यात करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. या भावंडांनी आपल्या खडतर संघर्षाच्या जोरावर अखेर द्राक्ष निर्यातीचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं आणि ५ एकर असेलली शेती आता ३५ एकरांवर नेऊन ठेवली आहे. त्यांच्या चेतन आणि शुभम या मुलांनीही त्यांना नव्या, आधुनिक आणि अद्ययावत शिक्षणाची चांगलीच साथ दिली आहे. आज घडीला वरूडे कुटुंबियांचं उत्पन्न १ ते दीड कोटींच्या घरात असून साताऱ्यातील पहिले द्राक्ष निर्यातदार म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. 

सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यातील निमसोड हे गाव. येथील रामकृष्ण वरूडे आणि विठ्ठल वरूडे यांचा कपड्यांचा पारंपारिक व्यवसाय. पण भविष्यातील शेतीचे महत्त्व ओळखून आपणही शेतीत उतरलं पाहिजे या हेतून त्यांनी सुरूवातील १ एकर द्राक्षाची बाग लावली. पहिल्यापासूनच आपल्या मालाचा दर्जा टिकवण्याची सवय त्यांनी लावून घेतल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचं उत्पादन ते काढू लागले. सुरूवातीपासूनच ते एजंटच्या माध्यमातून द्राक्ष परदेशात निर्यात करत होते.

निर्यातीच्या दृष्टीने मुलांना शिक्षण
पहिल्यापासूनच द्राक्ष निर्यात करण्याचे ध्येय होतं पण आपलं शिक्षण त्यासाठी कमी पडत होतं म्हणून या दोघा भावंडांनी मुलांना शिकवायचं ठरवलं. याच हेतूने विठ्ठल वरूडे आणि रामकृष्ण वरूडे यांनी चेतन आणि शुभम या आपल्या मुलांना कृषी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात पाठवले. त्यांनीही चांगल्या पद्धतीने कृषीमाल निर्यातीसंदर्भातील शिक्षण पूर्ण केले असून यादरम्यान शुभमला नेदरलँडमध्ये कृषी शिक्षणाची संधी मिळाली. 

व्यवस्थापन
सध्या वरूडे यांच्या शेतीमध्ये जवळपास ६० कामगार कायम काम करण्यासाठी आहेत. त्याचबरोबर फवारणी आणि इतर छोट्यामोठ्या कामासाठी ५ ट्रॅक्टर, पाण्याची टाकी, शेततळे, पॅकहाऊस अशा सुविधा आहेत. तर सिंचनासाठी ऑटोमायझेशन असल्यामुळे व्यवस्थापनासाठी जास्त त्रास होत नाही. हवामानाचे भविष्यातील धोके ओळखण्यासाठी वेदर स्टेशनचा वापर केला जातो.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
वरूडे यांनी सुरूवातीपासूनच आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सध्या त्यांच्या शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे स्प्रेयर, ड्रीप इरिगेशन सिस्टममदील ऑटोमायझेशन (या सिस्टमच्या माध्यमातून खते सोडता येतात), अत्याधुनिक वेदर स्टेशन, मालाची पॅकिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांसहित पॅक हाऊस आणि माल साठवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज अशा सुविधा त्यांच्याकडे आहेत.

वरूडे यांनी आपल्या शेतात बसवलेले आधुनिक वेदर स्टेशन
वरूडे यांनी आपल्या शेतात बसवलेले आधुनिक वेदर स्टेशन

टप्प्याटप्प्याने प्रगती
द्राक्ष शेतीच्या जोरावर त्यांनी सुरूवातील एक एकर, एक एकरवरून दोन, दोनवरून चार, चारवरून आठ अशी करत तब्बल ३५ एकर जमीनीवर द्राक्ष शेतीचे नंदनवन फुलवलं आहे. त्याचबरोबर पाण्याची सोय नसल्यामुळे तब्बल १२ किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन करून पाण्याची सोय केली आहे. नवीन ओसाड माळरानावर घेतलेल्या जमिनीत शेततळे खोदून तिथेच पंप हाऊस उभारले आहे. पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेजही बांधल्यामुळे त्यांची उत्पादनापासून निर्यातीपर्यंतची सगळी व्यवस्था स्वत:चीच आहे. 

पॅकहाऊस आणि कोल्ड स्टोरेज
द्राक्ष निर्यातीच्या अनुषंगाने वरूडे यांनी शेतातच पॅकहाऊस बांधले. सरुवातील कमी भांडवल असल्यामुळे छोटे पॅकहाऊस बांधले होते. तर पुढे माल निर्यात करण्याच्या दृष्टीने २००४ साली शेतातच कोल्ड स्टोरेज बांधले. हे स्टोरेज १०० टन क्षमतेचे असून २० टन क्षमतेचे प्री कुलींग सुद्धा या ठिकाणी केले जाते.

एक्स्पोर्ट कंपनीची स्थापना
२००७ साली द्राक्ष निर्यातीमधील काही तांत्रिक कारणामुळे त्यांना जवळपास २० ते ३० लाखांचा फटका बसला. पण पुढे त्यांनी निर्यातीचे स्वप्न सोडले नाही. निर्यातीचा योग्य अभ्यास करून मैदानात उतरायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे २०१८ साली चेतन आणि शुभम या दोघांचाही कृषी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शेजारील शेतकरी सुनिल मोरे यांना सोबत घेऊन आपली निर्यात कंपनी Growplus Exports Pvt. Ltd.  या नावाने सुरू केली. तेव्हापासून ते कंपनीच्या माध्यमातून ६०० ते ६५० टनापर्यंत माल निर्यात करतात.

दोन तरूणांची हाती कारभार
विठ्ठल वरूडे आणि रामकृष्ण वरूडे यांनी आता आपल्या दोन्ही कृषी शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या चेतन आणि शुभम या मुलांच्या हाती हा कारभार दिला आहे. त्यातील शुभम हे निर्यात आणि विक्री व्यवस्थेचे नियोजन तर चेतन हे उत्पादन आणि व्यवस्थापनाचे नियोजन बघतात. त्यामुळे कामांचे योग्य विभाजन होऊन उत्पादन आणि विक्रीच्या साखळीत कोणतीच अडचण येत नाही.

परदेशी ग्राहकांची विश्वासाहर्ता
वरूडे कुटुंबीय फक्त स्वत:च्या शेतात पिकवलेला माल निर्यात करतात त्यामुळे त्यांच्या मालाची प्रत आणि दर्जा उत्तम असतो. निर्यातक्षम उत्पादनासाठी ते सुरूवातीपासूनच योग्य व्यवस्थापन करत असल्याने त्यांच्या मालावर परदेशी ग्राहक विश्वास ठेवतात. त्यांचे ग्राहक ठरलेले असून ते त्यांनाच माल निर्यात करतात. युरोपातल्या मॉल आणि सुपर मार्केटमध्ये त्यांच्या मालाला चांगली मागणी असल्याचं ते सांगतात. 

उत्पन्नाचा हिशोब
सध्या वरूडे कुटुंबाची घरची ३५ एकर द्राक्षाची बाग आहे. तर यामधून त्यांचे सरासरी तीनशे ते साडेतीनशे टन द्राक्षाचे उत्पन्न निघते. या संपूर्ण मालाची निर्यात केल्यामुळे दर चांगला मिळतो. यातून वरूडे कुटुंबियांचे सुमारे २ कोटींचे उत्पन्न निघते. व्यवस्थापन, मजुरी, खते, औषधे, पाणी यांचा खर्च साधारण ५० लाख ते १ कोटींच्या घरात गेला तरी १ कोटी ते दीड कोटींचे वार्षिक उत्पन्न वरूडे कुटुंबाला मिळते. 

केवळ दोन एकर शेती असताना या शेतीतून आज वर्षाकाठी करोडो रूपये उत्पन्न मिळवण्यापर्यंत मजल या दुष्काळी भागातील निमसोड नावाच्या खेड्यातील वरूडे कुटुंबियांनी मारली आहे. वरूडे कुटुंबियांचा हा प्रवास  इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Web Title: Horticulturist sole grape exporter in Satara Varude family earns profit one crores per year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.