Lokmat Agro >लै भारी > काजू बागेत आंतरपीक म्हणून केली करटुल्याची शेती अन् भगवानराव झाले सगळ्यांना माहिती

काजू बागेत आंतरपीक म्हणून केली करटुल्याची शेती अन् भगवानराव झाले सगळ्यांना माहिती

Kartule was cultivated as an intercrop in the cashew Crop and farmer Bhagwanrao became popular in konkan | काजू बागेत आंतरपीक म्हणून केली करटुल्याची शेती अन् भगवानराव झाले सगळ्यांना माहिती

काजू बागेत आंतरपीक म्हणून केली करटुल्याची शेती अन् भगवानराव झाले सगळ्यांना माहिती

तालुक्यातील गवाणे येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणातल्या लाल मातीत प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटुले (काटले, कॅन्टोला) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे.

तालुक्यातील गवाणे येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणातल्या लाल मातीत प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटुले (काटले, कॅन्टोला) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अनिल कासारे
लांजा : तालुक्यातील गवाणे येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणातल्या लाल मातीत प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटुले (काटले, कॅन्टोला) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे.

त्यांच्या या प्रयत्नांना चांगले यश आले असून, त्यांनी शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श ठेवला आहे. लांजा बाजारात सुमारे २०० ते ३०० रुपये किलो दर असलेली करटुले ही भाजी जगातील सर्वश्रेष्ठ भाजी म्हणून ओळखली जाते.

त्यामुळे या भाजीला मोठी मागणी आहे. औषधी आणि रानभाजी असलेली ही करटुले भाजी आता व्यावसायिक शेती म्हणून उदयास आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात रानावनात, वन्य प्रदेशात वा डोंगरदऱ्यांत आढळणारे करटुलेचे पीक आता रत्नागिरी जिल्ह्यात रुजू पाहते आहे.

लांजा तालुक्यातील गवाणे येथील शेतकरी भगवान ढेकणे यांनी प्रायोगिक शेती केली आहे. ढेकणे यांनी गवाणे येथे शेतीचे विविध प्रयोग केले आहेत. आपल्या काजू बागेत आंतरपीक म्हणून करटुले शेती करण्याचा नवा प्रयोग केला.

कमी देखभाल खर्चात, कमी कालावधीत चांगला दर मिळवून देणारे हे पीक असल्याचा अनुभव त्यांना आला आहे. ढेकणे यांनी औरंगाबाद येथून ५०० अर्का भारत जातीची कंद रोपे आणून जून महिन्यात लागवड केली आहे.

पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भावही अत्यंत कमी असल्याचे ते सांगतात. तीन महिन्यांत फळमाशीची समस्या उ‌द्भवली. मात्र सापळे लावून ती नियंत्रणात आणल्याचे ते सांगतात. काढणीनंतर कंद सुप्तावस्थेत जात असल्याने त्याला पाण्याची गरज पडत नाही.

चार दिवसाआड उत्पादन
व्यावसायिक उत्पादन घ्यावयाचे असल्याने मजुरांच्या साह्याने नर व मादी फुलांचे परागीकरण केले. परिणामी अपेक्षित फळे मिळणे सुरू झाले. नैसर्गिक हिरवा पोपटी रंग असलेल्या या अर्का भारत वाणाच्या करटुल्याचे चार दिवसाआड ३० ते ४० किलो उत्पादन मिळते.

स्थानिक स्तरावरील विक्रीतूनच फायदा
- भगवान ढेकणे यांनी गेल्यावर्षी हातखंबा येथील रानातून कंद जमा करत दोन गुंठ्यात बीजोत्पादनासाठी लागवड केली होती. त्यातून त्यांना चांगले पीक मिळाले.
त्यातून यंदाच्या हंगामात जून महिन्यात औरंगाबादमधून त्यांनी कंद आणले आणि त्या कदांची त्यांनी लागवड केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले.
- दोन बाय दोन मीटर अंतरावर लागवड केलेल्या या करटुलेचे दीड महिन्यातच उत्पादन सुरू झाले.
जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या दरम्यान तीन तोडे झाले. ढेकणे यांनी लांजा येथे करटुलेची विक्री केली.
त्याला २०० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. करटुलेपासून उत्पादन घेता येते, याची प्रचिती भगवान ढेकणे यांनी दिली आहे.

पीक पद्धतीतील बदलातून एक एकरावर केलेली करटुलेची लागवड शेतीतील उत्साह वाढवून गेली. सर्वाधिक पसंती असलेल्या या भाजीला मोठी मागणी आहे. औषधी वनस्पती आणि विविध गुणधर्म असलेल्या या भाजीची महिती युट्यूबवर पाहून लागवड केली आहे. - भगवान ढेकणे

अधिक वाचा: उत्पादन वाढविण्यासाठी भात पिकात करा या वनस्पतीची लागवड

Web Title: Kartule was cultivated as an intercrop in the cashew Crop and farmer Bhagwanrao became popular in konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.