Join us

Women's Day : शिक्षण इयत्ता दहावी, पण बैलगाडा शर्यतीत तिनं भल्याभल्यांना आसमान दाखवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 19:00 IST

Women's Day : इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलीने आतापर्यंत बैलगाडा शर्यतीची (Bailgada Sharyat) अनेक मैदाने गाजवून आपला ठसा उमटवला आहे. 

- भाऊराव वाळके 

नाशिक : बैलगाडा शर्यत (Bailgada Sharyat) म्हटली क्रिकेटप्रमाणेच मोठा रसिकवर्ग या खेळाला लाभला आहे. पार गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत बैलगाडा शर्यतीची क्रेझ आहे. यात प्रामुख्याने तरुणाईचा भरणा अधिक दिसून येतो. पण अवघ्या दहावी शिक्षण असलेल्या सिन्नरच्या (Sinnar) कार्तिकीने याला छेद दिला आहे. गेल्या काही वर्षांत तिने बैलगाडा शर्यतीची मैदाने गाजवून सोडली आहेत. 

मागील वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरापुढे खिल्लार बैल- जोडी, गाय असायची. पण दिवसेंदिवस यांत्रिकीकरणामुळे त्यांची संख्या कमी होत असली तरी बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे जणू जुळलेले समीकरण म्हणावे लागेल, अशाच बैलगाडा शर्यतीचा छंद असलेल्या येवला, निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या गोंदेगाव येथील कार्तिकी सोमनाथ कांगणे (Kartiki Kangne) या इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलीने आतापर्यंत बैलगाडा शर्यतीची अनेक मैदाने गाजवून आपला ठसा उमटवला आहे. 

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. अनेक कुटुंबात महिलाहि पुरुषांच्या छंदामध्ये भाग घेऊन त्यामध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असतात. आजपर्यंत आपण महिलांना नोकरी, धंद्यामध्ये बघितले आहे, पण ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत हा एक शेतकऱ्यांना लागलेला छंदच आहे/ शेती म्हटलं की त्यासोबत बैल, गाय आणि जनावरे यांचा लळा लागलेला असतो. 

सिन्नर तालुक्यातील दापूर, येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे मैदान गाजवून पुरुषांनाही लाजवेल, अशा शर्यतीत भाग घेऊन कार्तिकीने रोख बक्षिसासह ग्रामस्थांच्यावतीने सत्कार स्वीकारून येवला, निफाड तालुक्यामध्ये आपले नाव बैलगाडा शर्यतीवर कोरले आहे.

आपल्या शेतातच सराव

इयत्ता सातवी पासून कार्तिकी बैलगाडा चालवत असून वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीकामात मदत करणाऱ्या कार्तिकीला पुढे बैलांचा लळा लागल्याने पुढे तिने हळूहळू बैलगाडा शर्यतीची सराव आपल्या शेतातच सुरू केला आणि बघता बघता कार्तिकी बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेऊ लागल्याने व मैदाने गाजू लागल्याने कार्तिकीचे नाव परिसरामध्ये चर्चिले जाऊ लागले, आज या महिला दिनानिमित्त कार्तिकीला लाख लाख अगणित शुभेच्छा.

टॅग्स :शेती क्षेत्रजागतिक महिला दिनजागर "ती"चानाशिकशेती