Lokmat Agro >लै भारी > Success Story : शेतीसाठी वैद्यकीय व्यवसाय साेडला, आता बागायती शेतीतून लाखोंचे उत्पन्न 

Success Story : शेतीसाठी वैद्यकीय व्यवसाय साेडला, आता बागायती शेतीतून लाखोंचे उत्पन्न 

Latest News Closing medical business and earning lakhs from horticulture by gadchiroli doctor | Success Story : शेतीसाठी वैद्यकीय व्यवसाय साेडला, आता बागायती शेतीतून लाखोंचे उत्पन्न 

Success Story : शेतीसाठी वैद्यकीय व्यवसाय साेडला, आता बागायती शेतीतून लाखोंचे उत्पन्न 

Success Story : डाॅ. नंदकिशाेर अंताराम शेंडे यांनी डाॅक्टरकीचा व्यवसाय साेडत यशस्वीरीत्या बागायती शेती करत आहेत.

Success Story : डाॅ. नंदकिशाेर अंताराम शेंडे यांनी डाॅक्टरकीचा व्यवसाय साेडत यशस्वीरीत्या बागायती शेती करत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext


- लिकेश अंबादे

गडचिरोली : शेतीत फारसा फायदा नसल्याचे कारण सांगून अनेक शेतकरी स्वत:ची शेती दुसऱ्याला भाड्याने देतात व स्वत: एखाद्याकडे माेलमजुरी करून जीवन जगतात. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) काेरची येथील डाॅ. नंदकिशाेर अंताराम शेंडे हे याला अपवाद आहेत. त्यांनी चक्क डाॅक्टरकीचा व्यवसाय साेडून शेती (Farming) कसण्यास सुरुवात केली. तनमनधनाने शेतीकडे लक्ष दिल्याने त्यातून लाखाेंचा नफा मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. 

नंदकिशोर शेंडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील डीएचएमएस, डीएसीचे प्रशिक्षण घेतले आहे. काही दिवस त्यांनी डाॅक्टरकीचा (medical Profesion)  व्यवसाय केला. त्यांच्याकडे वडिलाेपार्जीत आठ एकर शेती आहे. सुरुवातीला ते पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करत होते. मात्र, यात पाहिजे तेवढा नफा मिळत नसल्यामुळे ते २०१५ पासून बागायती शेतीकडे वळले. पाच एकरात फळ व बागायत, तर तीन एकरात धानाची शेती करीत आहे.

सन २०१६ मध्ये पहिल्यांदाच शेतात लावलेल्या खरबुजाच्या चार एकर शेतीतून चार लाखाचा नफा, तर एक एकराच्या कारलीच्या शेतीतून साडेतीन लाख रुपयांचा नफा झाला. तेव्हापासून ते कायमचे बागायती शेतीकडे वळले. सध्या डॉ. नंदकिशोर शेंडे हे शेतामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, कारली आणि खरबुजाचे पीक घेतात. सदर भाजीपाला नागपूर, गोंदिया व छत्तीसगड राज्यात व्यापाऱ्यांमार्फत पाठविला जाताे. शेंडे यांनी स्वतःचे कृषी केंद्र सुरू केले असून, बियाणे, कीटकनाशके, फवारणी याबाबत शेतकऱ्यांना समजावून सांगतात. शेंडे हे नाविन्यपूर्ण शेती करत असल्यामुळे अनेक कृषी अधिकारी, शेती करण्यास उत्सुक असणारे शेतकरी शेतावर येऊन भेट देतात. 

इतर शेतकऱ्यांना करतात मार्गदर्शन 
धानाच्या शेतीत फारसा नफा राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळबाग आदी पिकांकडे वळावे, यासाठी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचे ऐकून अनेक शेतकरी फळबाग शेतीकडे वळले आहेत. शिवाय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन शेंडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Latest News Closing medical business and earning lakhs from horticulture by gadchiroli doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.