Lokmat Agro >लै भारी > Coconut Farming : चार एकरमध्ये कोलंबस नारळ शेतीचा यशस्वी प्रयोग, ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

Coconut Farming : चार एकरमध्ये कोलंबस नारळ शेतीचा यशस्वी प्रयोग, ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

Latest news Columbus Coconut Farming in Four Acres, Success Story of Brahmangaon Farmer  | Coconut Farming : चार एकरमध्ये कोलंबस नारळ शेतीचा यशस्वी प्रयोग, ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

Coconut Farming : चार एकरमध्ये कोलंबस नारळ शेतीचा यशस्वी प्रयोग, ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

Coconut Farming : शेतकऱ्याने कोलंबस नारळाची लागवड केली असून एका झाडाला सुमारे पाचशे ते सातशे नारळे लागतात.

Coconut Farming : शेतकऱ्याने कोलंबस नारळाची लागवड केली असून एका झाडाला सुमारे पाचशे ते सातशे नारळे लागतात.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) कसमादे परिसरात डाळिंब पीक (Pomegranate) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र डाळिंबावर तेल्या व मर रोग आल्याने अनेक शेतकरी शाश्वत शेती करताना दिसत आहेत. बहुसंख्य शेतकऱ्यांचा फळशेती करण्याकडे कल वाढला आहे. येथील ब्राह्मणगावचे शेतकरी दीपक अहिरे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत येथे नारळाची लागवड (Coconut Farming)  केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण, सटाणा, कळवण, मालेगाव हा कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या कसमादेत मोठ्या प्रमाणात कांदा, डाळिंब, मका, द्राक्ष, भाजीपाला ही पिके घेतली जातात. डाळिंबावर तेल्यारोग व मररोग आल्यापासून कसमादेतील बहुसंख्य शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळले आहेत. शेतकरी पेरू, चिकू, आंबा, द्राक्ष, ड्रॅगन फ्रूट, अॅपल बोर, अंजीर, उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, काकडी, केळी लागवड करताना दिसत आहेत.

फळपिकांकडे कल
या बागेत त्यांनी नारळाबरोबर लिंबू व पेरुची लागवड केली आहे. नारळाच्या झाडाला पाणी कमी लागते. शेणखत, मजुरी, खतांचा खर्चही कमी असतो. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा विविध फळपिके घेण्याकडे कल वाढला आहे. अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूट, केळी, पेरु यासह अनेक फळपीक घेण्याकडे कल वाढत आहे.

शेतकऱ्यांनी डाळिंब पीक घेताना.... 

ब्राह्मणगाव शेतकरी दीपक अहिरे म्हणाले की, वडील सीताराम अहिरे यांच्या मार्गदर्शनाने व भाऊ रुपेश अहिरे यांच्या मदतीने नारळांची शेती करीत आहे. आगामी काळात कच्ची खजूर लागवड करणार आहे. प्रथमच हा प्रयोग केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे. मालेगावचे तर उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे म्हणतात की, शेतकऱ्यांनी डाळिंब पीक घेताना कुठलाही एकच बहार घ्यावा. त्यामुळे तेल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूट, केळी, पेरु यासह अनेक फळपीक घेण्याकडे कल वाढत आहे.

१८ बाय १८ फुटावर लागवड; ५ वर्षांनी येते फळ
फळपिकांना खर्च कमी, तसेच उत्पन्न जादा असल्याने बहुतेक शेतकरी या पिकांची लागवड करीत आहेत. ब्राह्मणगाव येथील दीपक अहिरे या शेतकऱ्याने चार एकरमध्ये त्यांनी गेल्या वर्षापासून नारळाची झाडे लावली आहेत. येथे चार एकरांत पाचशे नारळांची झाडे लावण्यात आली आहेत. यात लहान जातीच्या कोलंबस नारळाची त्यांनी लागवड केली आहे. या नारळाला तीन फुटांपासून नारळ येतात. रोप पाच वर्षांचे झाल्यानंतर त्याला नारळ येण्यास सुरुवात होते. एका झाडाला सुमारे पाचशे ते सातशे नारळे लागतात. अहिरे यांनी आंध्र प्रदेश राज्यातील राजमंडरी येथून थेट तीनशे रुपये नगाप्रमाणे नारळाची रोपे आणली. १८ बाय १८ फुटावर नारळाची त्यांनी लागवड केली आहे. येथील नारळाचे ओल्या शहाळेसाठी वापरणार आहे.

Web Title: Latest news Columbus Coconut Farming in Four Acres, Success Story of Brahmangaon Farmer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.