Lokmat Agro >लै भारी > Success Story : बारा एकरांत फळबाग, तर पाऊण एकरांत अद्रकाची लागवड, शेतकऱ्याची प्रयोगशील शेती 

Success Story : बारा एकरांत फळबाग, तर पाऊण एकरांत अद्रकाची लागवड, शेतकऱ्याची प्रयोगशील शेती 

Latest news Experimental ginger farming by a farmer in Nagpur district see details | Success Story : बारा एकरांत फळबाग, तर पाऊण एकरांत अद्रकाची लागवड, शेतकऱ्याची प्रयोगशील शेती 

Success Story : बारा एकरांत फळबाग, तर पाऊण एकरांत अद्रकाची लागवड, शेतकऱ्याची प्रयोगशील शेती 

कळमेश्वर तालुक्यातील बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे यांनी अद्रक (आले) लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे.

कळमेश्वर तालुक्यातील बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे यांनी अद्रक (आले) लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- विजय नागपुरे 

नागपूर :शेतीत नवनवीन प्रयोग करून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसू नये आणि शेती तोट्यात जाऊ नये म्हणून शेतकरीवर्ग वेगवेगळे पर्याय सोधतानाच प्रयोगही करताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, कळमेश्वर तालुक्यातील बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे यांनी अद्रक (आले) लागवडीतून धम्माल केली आहे. आल्याची शेती करणारे ते तालुक्यातील एकमेव शेतकरी आहेत.

बाबाराव कोदे यांची तेलकामठी परिसरात जिरोला (रिठी) येथे २२ एकर डोंगराळ जमीन आहे. येथील भूगर्भात ८०० फूट खोलपर्यंत काळा दगड आहे. त्यामुळे शेती ओलिताखाली आणण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्यांनी तेलकामठीतील केसरनाला तलावातून दोन किमी अंतरावर पाइपलाइन टाकत शेतातील विहिरीत व शेततळ्यात पाणी आणले. त्यांच्या २२ एकर जमिनीपैकी १२ एकरात १५०० संत्रा झाडे, तर एक हेक्टरमध्ये ५६० मोसंबीची झाडे आहेत. यासोबतच ते गेल्या पाच वर्षापासून अद्रकाची लागवड करत आहेत. 

गेल्या वर्षी अद्रक महाग असल्याने अद्रकाची जास्त प्रमाणात विक्री केली. उर्वरित अद्रकाच्या बियाणांपासून त्यांनी यावर्षी पाऊण एकरामध्ये अद्रकाची लागवड केली होती. यातून त्यांना ५० क्विंटल अद्रकाचे उत्पादन झाले. यावर्षी प्रतिकिलो १०० रुपये दराने अद्रक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते विकले आहे. अद्रकाची लागवड करण्यासाठी बेड पद्धतीचा वापर करण्यात येतो. पाण्याचे व खतांचे नियोजन ठिबक सिंचनाद्वारे करण्यात येते. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्यानंतर फेब्रुवारीनंतर केव्हाही अद्रकाची काढणी करता येते. यावर्षी ते पुन्हा 5 अडीच एकरात अद्रकची लागवड करणार आहेत. कोरोना काळामध्ये अद्रकाला २० ते ३० रुपये किलोचा भाव मिळाल्याने नुकसान सहन करावे लागले होते. परंतु, त्यानंतर मात्र अद्रकाला भाव मिळाल्याने ते नुकसान भरून निघाले. 


मोर्शी परिसरात असलेल्या नातेवाइकाकडून आल्याच्या (अद्रक) शेतीची माहिती घेतली. नंतर मोर्शी येथून बियाणे आणले आणि लागवड केली. गेल्या वर्षीपर्यंत अडीच एकर क्षेत्रात उत्पादन घेत होतो. आता स्वतःच उत्पादित केलेल्या आल्याचे बियाणे लागवडीसाठी ठेवत असतो. अद्रक खरेदीसाठी शेतकरी संपर्क साधतात तर उर्वरित अद्रक हे कळमना मार्केट, नागपूर, छिंदवाडा, मोहपा येथील बाजारामध्ये विक्री करण्यात येते. दरवर्षी एकरी ७० ते ८० क्विंटल अद्रकाचे उत्पादन होत असल्याचे कोढे यांनी सांगितले.

- बाबाराव कोढे, तेलकामठी

Web Title: Latest news Experimental ginger farming by a farmer in Nagpur district see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.