गडचिरोली : केवळ शेतीव्यवसायावर (Farming) अवलंबून न राहता जोडधंदा करण्याचा संकल्प करून गडचिरोली (Gadchiroli) तालुक्याच्या बेलगाव येथील शेतकऱ्याने गावातच मिनी राईस मिल व दालमिल व्यवसाय उभारला. या व्यवसायामुळे त्यांना हंगामात अधिक तर वर्षभर काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळत आहे. त्यांच्या शेतीला एका चांगल्या व्यवसायाची जोड मिळालेली आहे.
गडचिरोली तालुक्याच्या बेलगाव येथील पसरराम रामदास कोठारे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ २०२२-२३ या वर्षी घेतला. यासाठी त्यांना बँकेकडून ५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या कर्जातून त्यांनी मिनी राईस मिल (Mini Rice Mill) व दालमिल संच उभारला. सध्या राईसमिलमध्ये बिघाड असून त्यांचा दालमिल व्यवसाय सुरू आहे.
याशिवाय त्यांच्या कुटुंबातीलच एक भाऊ पीठ गिरणी व मिरची कांडप (गिरणी) चालवितात. त्यांच्या दालमिलवर मार्च महिन्यापासून डाळ भरडाईसाठी गर्दी असते. ही गर्दी संपूर्ण उन्हाळ्यात असते. पावसाळ्यात डाळ भरडाई होत नाही. त्यानंतर पुन्हा डाळ भरडाईला सुरुवात होते. गडचिरोली व धानोरा तालुक्याच्या अनेक गावांतील शेतकरी आपल्याकडील डाळी भरडाईसाठी बेलगाव येथे घेऊन येतात.
३५ टक्के अनुदान मिळणारपसरराम रामदास कोठारे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ २०२२-२३ या वर्षी घेतला. यासाठी त्यांना बँकेकडून ५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. कोठारे यांच्या दालमिल व मिनी राईसमिल प्रकल्पाची किंमत ५ लाख रुपये आहे. यासाठी त्यांना ३५ टक्के म्हणजेच १ लाख ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
विविध प्रकारच्या डाळींची भरडाईपरसराम कोठारे हे तूर, पोपट, उडीद, मूग, हरभरा, मसूर, यासह विविध प्रकारच्या डाळी भरडून देतात. यासाठी प्रतिकिलो ३ रुपये भाडे ते घेतात. हंगामात एका दिवसात २० क्विंटल डाळ भरडाई केली जाते. शेतकऱ्यांसह स्वतः सुद्धा ते डाळी भरडून विक्री करतात.