Lokmat Agro >लै भारी > Farmer Success Story : तीन शेतकऱ्यांची कमाल, गोड मक्यातून एकरी लाखांचे उत्पन्न मिळवले, वाचा सविस्तर

Farmer Success Story : तीन शेतकऱ्यांची कमाल, गोड मक्यातून एकरी लाखांचे उत्पन्न मिळवले, वाचा सविस्तर

Latest news Farmer Success Story Three farmers got maximum income of lakhs per acre from sweet corn, read in detail | Farmer Success Story : तीन शेतकऱ्यांची कमाल, गोड मक्यातून एकरी लाखांचे उत्पन्न मिळवले, वाचा सविस्तर

Farmer Success Story : तीन शेतकऱ्यांची कमाल, गोड मक्यातून एकरी लाखांचे उत्पन्न मिळवले, वाचा सविस्तर

Farmer Success Story : गोड मक्याचे पीक अडीच महिन्यांतच निघते. तसेच गोड मक्याच्या चाऱ्यालाही चांगला भाव मिळतो.

Farmer Success Story : गोड मक्याचे पीक अडीच महिन्यांतच निघते. तसेच गोड मक्याच्या चाऱ्यालाही चांगला भाव मिळतो.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) भडगाव तालुक्यात सध्या मक्याच्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. निंभोरा येथील तीन शेतकऱ्यांनी गोड मका (स्विट कॉर्न) (Sweet Corm Farming) ची लागवड केली आणि त्यातून एकरी सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. फक्त ८५ दिवसांतच हे उत्पादन आले आहे. 

निंभोरा येथील दिलीप मन्साराम पाटील, शरद हिलाल पाटील, नाना साहेबराव पाटील या शेतकऱ्यांनी गोड मक्याची (Maka farming) लागवड केली. हा गोड मका फक्त ८५ दिवसांत तोडला गेला अन् या पिकाला खर्चही कमी आला. या तिघाही शेतकऱ्यांनी सरासरी एकरी एक लाखांच्या जवळपास उत्पन्न काढलेले आहे आणि मका कन्नड येथील अरबाज खान या मका व्यापाऱ्याला १२.५० रुपये प्रति किलो भावाने शेताच्या बांधावर विक्री केला आहे. मका कणसे तोडून विक्रीसाठी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यांतील बाजारपेठेत विकला. 

साध्या मक्याचे पीक सव्वाचार महिन्यांनंतर येते. त्याला लागणारा खर्च हा गोड मक्याच्या (Maize Farming) दुप्पट असतो. नंतर मक्याची कणसे तोडणे, चारा जमा करणे, मजुरी, मका मळणी यंत्रावर काढून तो बाजारात विक्रीला नेणे, याला मोठा खर्च येतो, तर मक्याला प्रती क्विंटल १५०० ते २००० रुपयांचा भाव मिळतो. तसेच चाऱ्यालाही फारसा भाव मिळत नाही. मात्र, गोड मक्याचे पीक अडीच महिन्यांतच निघते. ही कणसे तोडून मका १२५० रुपये प्रति क्विंटल भावाने दिला जातो. 

तसेच गोड मक्याच्या चाऱ्यालाही चांगला भाव मिळतो. या चाप्यात कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या मक्याच्या चाऱ्याला पशु मालकांकडून जास्त मागणी असते. हा मका चारा एकरी २० हजारांच्या जवळपास जनावरे मालकांना विकला जातो. २ वर्षापूर्वी गोड मक्याचे पीक कनाशी, देव्हारी, लोणपिराचे, निभोरा, कोठली यासह काही भागात शेतकरी घेताना दिसत होते. मात्र, आता या परिसरात निभोरा येथील हे तीनच शेतकरी गोड मका पीक घेताना दिसन आले.

आंतरपीक म्हणून घेतला मका 
निंभोरा येथील शेतकरी दिलीप मन्साराम पाटील यांनी मोसंबी पिकात तिसऱ्यांदा आंतरपीक घेतले. त्यांनी चार एकर मोसंबीत सप्टेंबरमध्ये गोड मक्याची लागवड केली होती. अडीच महिन्यांनंतर या आठवड्यात मका कणसे तोडून प्रति किलो १२.५० रुपये भाव शेताच्या बांधावर व्यापाऱ्यांकडून मिळाला आहे. ५० क्किटल मका कणसे माल आकारला असून, हा माल एकूण ६२ हजार ५०० रुपयांचा झाला आहे. चारा २५ हजारांचा आकारला आहे. २० हजार रुपये खर्च आला असून, निव्वळ नफा ६७ हजार ५०० रुपये मिळाला आहे.

शरद पाटील यांना दीड लाखाचे उत्पन्न 
निंभोरा येथील शेतकरी तथा पोलिस पाटील शरद हिलाल पाटील यांनी २५ सप्टेंबरला एक एकरात खाण्याच्या गोड मका पिकाची लागवड केली होती. या मका पिकाचा खर्च १५ हजारांपर्यंत आला आहे. ८५ दिवसांत मक्याचे उत्पन्न निघाले आहे. ८० हजार रुपये एकरी असे उत्पन्न मिळाले आहे. २० हजारांचा चारा विकला आहे. मका कणसे कन्नडचे व्यापारी अरबाज खान यांना शेताच्या बांधावर मोजला आहे. चार वर्षांपासून गोड मका लागवड करीत आहोत. गोड मका पीक चांगले उत्पन्न देणारे ठरत आहे. 

नाना पाटील यांनाही एक लाखाचे उत्पन्न 
निंभोरा येथील शेतकरी नाना साहेबराव पाटील यांनी दीड एकर क्षेत्रात १ सप्टेंबरला गोड मका पिकाची लागवड केली होती. ६५ विकेटल मका आला. त्याची १२.५० रुपये प्रति किलो भावाप्रमाणे ८१ हजार २०० रुपयांचा माल निघाला. चारा २० हजारांचा झाला. या पिकावर खर्च २५ हजारांपर्यंत आला. ८५ दिवसांत मका माल निघाला. लाखापर्यंत मका पिकाचे उत्पन्न मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वीही दीड एकरात गोड मका लागवड करून एक लाखांचे उत्पन्न मिळाले होते.

Farmer Sucessful Story : पारंपारिक शेतीला अत्याधुनिक अद्रकाची फोडणी देणारे नागरे यांची यशकथा वाचा सविस्तर

Web Title: Latest news Farmer Success Story Three farmers got maximum income of lakhs per acre from sweet corn, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.