Lokmat Agro >लै भारी > Farmer Success Story : केळी बागेतील टरबुज आंतरपीकातून एकरी दीड लाखाचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Farmer Success Story : केळी बागेतील टरबुज आंतरपीकातून एकरी दीड लाखाचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Latest News farmer Success Story Watermelon intercropping in banana farming yields Rs 1.5 lakh per acre | Farmer Success Story : केळी बागेतील टरबुज आंतरपीकातून एकरी दीड लाखाचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Farmer Success Story : केळी बागेतील टरबुज आंतरपीकातून एकरी दीड लाखाचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Farmer Success Story : केळी पिकात (Banana Farming) लावलेल्या टरबुजाच्या उत्पन्नातून प्रति एकर दीड लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पाहून घेतले आहे.

Farmer Success Story : केळी पिकात (Banana Farming) लावलेल्या टरबुजाच्या उत्पन्नातून प्रति एकर दीड लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पाहून घेतले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- मुखरु बागडे 

भंडारा : नाविन्यपूर्ण बदल स्वीकारल्याशिवाय प्रगती नसल्याचे शक्य अभ्यासातून एका शेतीनिष्ठ शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. साडेसहा एकर बागेत ४ एकरात केळीची  (Banana Farming) तर दोन एकरात पपईची लागवड केली आहे. या सहा एकरात आंतरपीक (Watermelon Intercrop) म्हणून टरबूज लावले आहे. टरबुजाच्या उत्पन्नातून प्रति एकर दीड लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पाहून घेतले आहे. असा हा परिवर्तनशील प्रेरणादायी शेतकरी लाखणी तालुक्यातील कोलारी (पळसगाव) येथील आहे. 

मोरेश्वर खुशाल सिंगनजुडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तसेच सहा एकरात टरबुजाचे आंतरपीक (Tarbuj Antarpik) लागवडीखाली आहे. ४ एकरात केळी व २ एकरात पपई केळी व पपई हे मुख्य पीक असून, त्यात टरबूज हे आंतरपीक आहे. सरासरी टरबुजाने खर्च वजा जाता ४ ते ४.५ लाख रुपयांचा नफा सोडला. चार एकर केळी व दोन एकरात पपई वीस लाख रुपयांपर्यंत उत्पन्न सोडणार आहे.

गतवर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने मोरेश्वर यांना उत्पन्नाची व नफ्याची शाश्वती मिळाली आहे. जुलैपर्यंत पपई निघणार तर ऑक्टोबर महिन्यात केळी निधण्याचे नियोजन केले आहे. यात सुद्धा अर्था खर्च व अर्धा नफा नियोजित आहे. धान शेतीला फळ बागायत पर्याप्त पर्याय आहे. फक्त शेतकऱ्यांनी परिवर्तन करण्याची नितांत गरज आहे. टरबूज, केळी व पपईला वर्षभर मागणी आहे. अपेक्षित भावसुद्धा मिळत आहे. इतर शेतकऱ्यांनी निश्चितच बदल स्वीकारण्याचा प्रयत्न करावा.

एक एकरात ७० हजार रुपयांपर्यंतचा नफा...
एका एकरात टरबुजाचे उत्पन्न १५ ते २० टनपर्यंत मिळाले. त्याला ८ ते १० रुपये किलोचा दर मिळाला. सरासरी प्रति एकर १ लाख ५० हजार रुपये एवढे नगदी उत्पन्न हातात मिळाले. पैकी एका एकरात ६० ते ७० हजार रुपये खर्चात गेल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात अर्थे खर्चात तर अर्धा नफा तत्वावर टरबुजाची शेती फळाला आली, टरबूज हे आंतरपीक असून, तीन महिन्यांत प्रति एकर ७० हजार रुपये नफा मोरेश्वर यांना मिळाला आहे.

वर्षभरात सहा एकरात १२ लाखांचा नफा !
अभ्यासांती प्रत्यक्ष कृतीतून मोरेश्वर यांनी अनुभवलेले आहे. वर्षाला बागायतीतून बारा लाख रुपयांचा शुद्ध नफा कमवत प्रति महिना एक लाख रुपयांची मिळकत अनुभवाने कमवली आहे, असे मला वाटते. मोरेश्वर यांच्या कामगीरीबद्दल महाराष्ट्र शासनाने गतवर्षी त्यांचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार' देऊन यथोचित सन्मानसुद्धा केला आहे. या पुरस्काराने त्यांचे मनोबलही वाढले.
- मोरेश्वर सिगनजुडे, कोलारी पळसगाव

Web Title: Latest News farmer Success Story Watermelon intercropping in banana farming yields Rs 1.5 lakh per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.