Lokmat Agro >लै भारी > Mushroom Farming : एमबीबीएस डॉक्टर तरूणाचा जबरदस्त प्रयोग, झोपडीत फुलवली मशरूमची शेती

Mushroom Farming : एमबीबीएस डॉक्टर तरूणाचा जबरदस्त प्रयोग, झोपडीत फुलवली मशरूमची शेती

Latest News mushroom farming in hut by young mbbs doctor experiment in village | Mushroom Farming : एमबीबीएस डॉक्टर तरूणाचा जबरदस्त प्रयोग, झोपडीत फुलवली मशरूमची शेती

Mushroom Farming : एमबीबीएस डॉक्टर तरूणाचा जबरदस्त प्रयोग, झोपडीत फुलवली मशरूमची शेती

Mushroom Farming :डॉ. रवींद्र या तरुणाने दुष्काळी पट्टयात मशरूमचा यशस्वी (Mushroom) प्रयोग करत आर्थिक प्रगती साधली.

Mushroom Farming :डॉ. रवींद्र या तरुणाने दुष्काळी पट्टयात मशरूमचा यशस्वी (Mushroom) प्रयोग करत आर्थिक प्रगती साधली.

शेअर :

Join us
Join usNext

धुळे  :धुळे जिल्ह्यातील (Dhule) शिरपूर तालुक्यातील दुर्गम क्षेत्रात असणाऱ्या सटीपाणी गावातील उच्च शिक्षित तरुण डॉ. रवींद्र रमेश पावरा यांनी मशरूम उत्पादनाचा (Mushroom farming) यशस्वी प्रयोग केला आहे. उच्च शिक्षण घेऊन नोकरी करता करता या तरुणांनी मशरूम उत्पादनातून आर्थिक प्रगती साधली आहे. याचबरोबर गावातील इतर तरुणांना देखील यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. 

डॉ. रवींद्र पावरा यांनी एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण घेतले असून तोरणमाळ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. डॉ रवींद्र यांच्या घरी वडिलांची अल्पभूधारक कोरडवाहू जमीन आहे. पारंपरिक पिकांच्या माध्यमातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कुटुंब हतबल झाले होते. अशातच धडगाव या ठिकाणी मशरूम व्यवसाय (Mushroom Farm) प्रशिक्षणाला उपस्थित राहिल्याने त्यांनाही मशरूमबाबत कुतूहल वाटले व आपल्या परिसरातदेखील याचा प्रयोग करण्याचे निश्चित केले. मशरूम शेतीबाबत राजेंद्र वसावे व लीला वसावे यांच्या अनमोल मार्गदर्शनातून डॉ. रवींद्र या तरुणाने दुष्काळी पट्टयात मशरूमचा यशस्वी प्रयोग करत आर्थिक प्रगती साधली. थंड प्रदेशात येणारे मशरूम आता सटीपाणी या दुर्गम क्षेत्रातील दुष्काळी पट्टयात आले आहे.

कमी खर्चात मशरूम उत्पादनासाठी शेड
वडिलांच्या गावात असणाऱ्या शेतीत कायम पारंपरिक पीक घेऊन वर्षाकाठी हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळे शेतीत नवीन काही तरी करायचे असे त्यांनी ठरवले. त्यानंतर मशरूम घेण्याचा निर्णय केला, त्याबाबत प्रशिक्षण घेऊन आपल्या राहत्या घरातील एका कोपऱ्यातच शेड उभारले. त्याला आतून आणि बाहेरून ग्रीन मॅट लावली. शिवाय आतून बारदाण्याचे आच्छादनही दिले. बाबूंचे टेबल तयार केले असा हा कमी खर्चात त्यांनी मशरूम उत्पादन करण्यासाठी आसपास उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून शेड उभारले.


नेमकं मशरूम उत्पादन होते कसे?
गव्हाचा किवा सोयाबीनचा भुस्सा घेऊन ते पाण्यात मिक्स करून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. भिजलेला भुसा बाहेर काढून मोकळा करायचा. त्यात ६० टक्के आर्द्रता झाल्यास त्या भुस्यामध्ये मशरूम बीज टाकून पॉलिथिनमध्ये भरुन घ्यायचे. त्यानंतर ते बेड एका हवा बंद रूममध्ये ठेवायचे. ज्या रूमचे तापमान २० अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ६० ते ७० टक्के असावी. १५ दिवसानंतर ते बेड पांढरे शुभ्र पडल्यावर मोकळे करून ठेवायचे. बेड मोकळे केल्यावर त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी मारायचे. २५ दिवसांनंतर त्यावर मशरूम यायला सुरुवात होते.

मशरूम शेतीतून उत्पन्न कसं मिळते? 

मशरुम हे 45 दिवसांचे उत्पादन देत असते. या काळात तीन वेळा याची काढणी करता येते. ज्यात पहिल्यांदा 25 व्या दिवशी त्यानंतर 35 व्या आणि शेवटची काढणी ही 45 व्या दिवशी घेतली जाते. हे मशरुम काढल्यानंतर याचे पॅकेजिंग 1 किलो अशा मागणीप्रमाणं केली जाते. ज्याला तीनशे रुपये प्रति किलो दर त्यांनी निश्चित केला आहे. सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटची काढणी करेपर्यंत सर्व मिळून उत्पादन खर्च अत्यंत कमी म्हणजेच सहा हजारांपर्यंत येतो. याचे उत्पन्न हे तीस हजारांच्या आसपास होते. सगळा खर्च जाऊन या तरुणांना 45 दिवस म्हणजे दीड महिन्यात 25 ते 30 हजारांचा फायदा होतो.
 

Web Title: Latest News mushroom farming in hut by young mbbs doctor experiment in village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.