Lokmat Agro >लै भारी > Sericulture Farming : वर्धा जिल्ह्यात असंख्य शेतकरी रेशीम शेतीतून लक्षाधीश बनत आहेत, वाचा सविस्तर 

Sericulture Farming : वर्धा जिल्ह्यात असंख्य शेतकरी रेशीम शेतीतून लक्षाधीश बनत आहेत, वाचा सविस्तर 

Latest News Sericulture Farming Many farmers in Wardha district are becoming millionaires from Reshim sheti, read more  | Sericulture Farming : वर्धा जिल्ह्यात असंख्य शेतकरी रेशीम शेतीतून लक्षाधीश बनत आहेत, वाचा सविस्तर 

Sericulture Farming : वर्धा जिल्ह्यात असंख्य शेतकरी रेशीम शेतीतून लक्षाधीश बनत आहेत, वाचा सविस्तर 

Sericulture Farming : या पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीतून (Sericulture Farming) वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्नतीचा मार्ग साधला आहे.

Sericulture Farming : या पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीतून (Sericulture Farming) वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्नतीचा मार्ग साधला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वर्धा : गत काही वर्षांपासून पारंपरिक शेतीत होणारे नुकसान, वाढती महागाई अन् पडलेले शेतमालाचे भाव आदींमुळे शेती तोट्याची होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. मात्र या पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीतून (Sericulture Farming) शेतकऱ्यांनी उन्नतीचा मार्ग साधला आहे. गत वर्षभरात रेशीम शेतीतून ४५ शेतकरी लक्षाधीश झाले आहे. 

वर्धा जिल्ह्यात (Wardha District) ३२२ एकरावर याची लागवड करण्यात आली. मात्र पावसाची अनियमीतता, निसर्गाचा लहरीपणा वेळेत उपलब्ध होऊ न शकणारा मजूर वर्ग, बेभरवशाची बाजारपेठ आणि कच्च्या मालाची अनिश्चितता या सर्व बाबीमुळे शेतीच्या उत्पादनावर जेवढा खर्च होतो. तेवढे उत्पन्न ही पारंपरिक शेतीतून मिळत नाही. पर्यायाने शेतीवर अवलंबून राहणे दुरापस्त झाले आहे. जिल्ह्यात शेतकरी मुख्यत्वे करून कापूस, सोयाबीन, हळद, ऊस इत्यादी नगदी पिके घेतात. मात्र यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेकांनी प्रायोगिक तत्त्वार रेशीम शेतीला सुरवात केली. 

वर्धा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास अत्यंत अनुकूल ठरल्याने अनेकांनी यातून उन्नती साधली आहे. दोन महिन्यांचे पीक असून, यासाठी रेशीम विभागाच्या वतीने प्री-प्लांटेशन प्रशिक्षण, व लागवड प्रशिक्षण देण्यात येते. शिवाय वेळोवेळी येणाऱ्या अडचणीसाठी मार्गदर्शन करण्यात येते. जिल्ह्यात सव्वातीनशे शेतकऱ्यांनी लागवड केली असून, यातून वर्षाकाठी तीन लाख रुपये उत्पन्न घेणाऱ्या शेतऱ्यांची संख्या ४५ वर गेली आहे. उत्पादनाची शास्वती व धोक्यापासून हमी देणारा उद्योग असल्याने अलीकडे जिल्ह्यात रेशीम शेतीला सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.


६०४ एकरांसाठी झाली नोंदणी 
सन २०२४-२५ मध्ये तुती लागवडीकरीता शेतकरी निवड महारेशीम अभियान अंतर्गत करण्यात आली. विभागाला ३०० एकराचे लक्षांक देण्यात आले होते. त्यानुसार नव्याने ५५९ शेतकऱ्यांनी ६०४ एकरासाठी नाव नोंदणी रेशीम कार्यालयाकडे करण्यता आली आहे.

जिल्ह्यात १३३ एकरांवर नव्याने झाली लागवड
रेशीम शेतीला नवीन लागवडीस प्रारंभ झाला असून, ११८ शेतकऱ्यांनी १३३ एकर क्षेत्रावर नवीन तुती लागवड पूर्ण झाली आहे. तर लागवडीचे कामकाज शेतकरी स्तरावर सुरू आहे. जिल्ह्यात यापूर्वी १५६ शेतकऱ्यांनी १८९ एकरावरून लागवड केली आहे. जुनी नवीन अशी एकून २७४ शेतकरी ३२२ एकरावर लागवड झाली आहे.

६५ हजार रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर 
रेशीम शेतीला प्रति क्विंटल ४५ ते ६५ हजार रुपये दर मिळतो. यासाठी जिल्ह्यात बाजारपेठ नाही. मात्र रेशीम विभागाच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. दोन महिन्यांचे पीक असून, वर्षभरात ३ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे उत्पादन घेणाऱ्यांची यादी करण्यात आली. त्यात ४५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात गत महिन्यात तीन शेतकऱ्यांचा वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले आहे. 

Web Title: Latest News Sericulture Farming Many farmers in Wardha district are becoming millionaires from Reshim sheti, read more 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.