Join us

Tomato Farming Maharashtra : सतरा एकर टोमॅटो शेतीला लानेवो कीटकनाशक ठरलं वरदान, सिन्नरच्या शेतकऱ्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:19 AM

Tomato Farming in Maharashtra : सिन्नर येथील शेतकऱ्याच्या सतरा एकर टोमॅटो शेतीसाठी लानेवो कीटकनाशक फारच फायदेशीर ठरलं आहे.

- गोकुळ पवार  

Success Story of Tomato Farming : 'पदवीच शिक्षण घेतलं, घरची शेती होती. याच शेतीत मेहनत करण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षापूर्वी एक एकरवर टोमॅटो लागवड केली होती. हळूहळू अनुभव येत गेले, टोमॅटो शेतीत लागवडीपासून ते बाजारपेठांचे गणित कळाले, आणि आज तब्बल सतरा एकरवर टोमॅटो लागवड केली जात आहे. वेगवगेळी औषधे वापरात असतानाच यंदा धानुका कंपनी चे लानेवो कीटकनाशक फारच फायदेशीर ठरलं आहे. खर्चही वाचला, वेळेचीही बचत झाल्याचे सांगत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने टोमॅटो शेतीचा प्रवास उलगडून सांगितला. 

 

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील विनोद शांताराम वाघ यांची 17 एकर शेती. वडिलोपार्जित शेती असल्याने वाघ यांनी पदवीचे शिक्षण २०१४ मध्ये पूर्ण केलं. नोकरीच्या मागे न लागता थेट शेतीत उतरण्याचा निर्णय घेतला. मुळात परंपरागत शेती करत असल्याने लहान असल्यापासून ते शेतीचे छोटी मोठी कामे करत असतं. त्यामुळे नव्याने काही शिकावे लागले नसल्याचे ते म्हणाले. मात्र शेतीत नवनवीन तंत्रज्ञान, मार्गदर्शन व अनुभव त्यांनी घेतले. आणि टोमॅटो शेतीत झोकून देण्याचं ठरवलं. त्यानुसार ते गेल्या दहा वर्षांपासून टोमॅटो शेती करत असून यंदा तब्बल 17 एकरवर टोमॅटो लागवड केली आहे. योग्य खत नियोजन, सिंचन नियोजनाच्या जोरावर (Successfull Tomato Farming) टोमॅटो शेती यशस्वी करून दाखवली आहे. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया! 

लागवडीपूर्वीची तयारी कशी केली? 

लागवडीपूर्वी साधारण दोन महिने आधीपासूनच तयारी करण्यात येते. यात लागवड करण्यापूर्वी शेतजमीन चांगली तयार करून घेतली जाते. पूर्वमशागतीसाठी ट्रॅक्टर किंवा रोटाव्हेटरच्या साहायाने तास मारून सऱ्या पाडल्या जातात. पूर्वी नांगराच्या साहाय्याने ही कामे केली जायची. मात्र आता अनेक यांत्रिक अवजारांवर भर दिला जातो. त्यानंतर सऱ्यांवर मल्चिंग पेपर अंथरूण घेतला जातो. शिवाय ठिबक टाकण्याचे काम याच दरम्यान केले जाते. साधारण या परिसरात नागपंचमीला लागवड करण्या सुरवात केली जाते. काही लोक अगोदर किंवा त्यानंतर लागवड करतात. लागवड अंतर निश्चित करून सरीवर अंथरलेल्या मल्चिंग पेपरला छिद्रे पाडून घेतली जातात. त्यावर साधारण दीड फूट अंतरावर टोमॅटो रोपांची लागवड करण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले.

खत आणि पाणी व्यवस्थापन

लागवड केल्यानंतर शिफारशीनुसार खतांचे नियोजन केले. योग्य वेळी, योग्य प्रमाणात खते देत असल्याने झाडांना पोषक खाद्य मिळत जाते. साधारण पावसाळ्यात लागवड होत असल्याने पाण्याची जास्त आवश्यकता भासत नाही. मात्र पावसाने विश्रांती दिली तर पाणी द्यावे लागते. आम्ही लागवड केलेल्या प्लॉटला २० ते २५ दिवस झाले आहेत. या दिवसात मागील आठवड्यात पाऊस नसल्याने दोनदा पाणी देण्यात आले. तसेच नेहमीची खतांची मात्रा देत असल्याने झाड टवटवीत आहेत. त्यामुळे जमिनीतील वाफसा स्थिती आणि पिकाची पाण्याची गरज यांचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जातो.

यंदा पोषक वातावरण म्हणून.... 

टोमॅटो लागवडीत प्रामुख्याने तुडतुडे, पांढरी माशी , थ्रिप्स, नागअळी व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. सध्या पोषक वातावरण असून पाऊसही योग्य प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या तरी झाडाची वाढ होण्यास कोणताही अडथळा नाही. पाऊस जर जास्त असल्यास करपा किंवा काळे ठिपके येतात, यंदा अशी परिस्थिती नाही. मात्र आवश्यकतेनुसार शिफारशीप्रमाणे रासायनिक फवारण्या करण्यात येत आहेत. शिवाय वेळीच नियंत्रण करण्यासाठी पिकाची सातत्याने निरीक्षणे नोंदवून घेतली जातात. 

धानूकाच्या लानेवो कीटकनाशकाचा फायदा कसा झाला? 

धानुका या कंपनीचे लानेवो कीटकनाशक टोमॅटो शेतीत वापरल्याने खूपच फायदा झाला. 1 ऑगस्ट रोजी लागवड केलेल्या प्लॉटवर 17 व्या दिवशी स्प्रे केला होता. स्प्रे केल्यानंतर झाडाला जी पहिली नागअळी होती, ती पूर्णपणे नाहीशी झाली. तसेच थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे, फळ पोखरणारी अळी देखील नष्ट झाली आहे. या स्प्रेनंतर झाडाला फुटवा आला असून झाडाची वाढही झाली. शिवाय झाड हिरवेगार दिसू लागले आहे. दुसरा स्प्रे देखील 40 ते 45 दिवसांनी दिला जाणार आहे. एकाच स्प्रे मध्ये अनेक किटकांवर प्रभावी ठरल्याने वेळ आणि खर्चाची बचत झाल्याचे वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :शेती क्षेत्रनाशिकसिन्नरखतेटोमॅटोशेती