Lokmat Agro >लै भारी > Shevga Farming : नांदगावच्या शेतकऱ्याने कांदा, कापसाला बाजूला सारलं, आता शेवगा देतोय लाखो रुपये

Shevga Farming : नांदगावच्या शेतकऱ्याने कांदा, कापसाला बाजूला सारलं, आता शेवगा देतोय लाखो रुपये

Latest News Shevga Farming Nandgaon farmer gave up onion and cotton, now Shevga farming lakhs of rupees income | Shevga Farming : नांदगावच्या शेतकऱ्याने कांदा, कापसाला बाजूला सारलं, आता शेवगा देतोय लाखो रुपये

Shevga Farming : नांदगावच्या शेतकऱ्याने कांदा, कापसाला बाजूला सारलं, आता शेवगा देतोय लाखो रुपये

Shevga Farming : नांदगावच्या शेतकऱ्याने (Farmer Success Story) अनेक वर्ष वडिलोपार्जित कांदा, कापसाची पारंपरिक शेती केली, मात्र शेवग्याचा आंतरपिकाचा प्रयोग केल्याने त्यांना नवी दिशा मिळाली.

Shevga Farming : नांदगावच्या शेतकऱ्याने (Farmer Success Story) अनेक वर्ष वडिलोपार्जित कांदा, कापसाची पारंपरिक शेती केली, मात्र शेवग्याचा आंतरपिकाचा प्रयोग केल्याने त्यांना नवी दिशा मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

Nandgoan Shevga Farming : शेती भरपूर, पण खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी परिस्थिती. या परिस्थितीत कागदी निंबुच्या शेतात आंतरपीक म्ह्णून शेवगा लागवड केली. यात कागदी निंबूपेक्षा शेवगा शेतीत चांगलं उत्पन्न मिळालं. मग दीड एकरावर स्वतंत्ररित्या शेवगा लागवड केली. दीड एकरसाठी सव्वा लाख रुपये खर्च आला. तर उत्पन्न जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळालं. तिथून शेवगा शेतीच्या यशस्वी प्रयोगाला सुरवात झाली. 

नांदगाव तालुका (Nandgoan Taluka) दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील कळमदरी हे महेश पगार यांचं गावं. वडिलोपार्जित कांदा आणि कापसाची शेती. मात्र उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक. मग कागदी निंबूची लागवड केली. पण यातूनही निराशा पडली. मग याच कागदी निंबुत पगार यांनी शेवग्याचे आंतरपीक (Intercropping Shevga) घेतले. आणि कांदा आणि कापसाला नवा पर्याय सापडला. सद्यस्थितीत जवळपास सात एकरावर शेवगा (Shegva Farming) शेती फुलते आहे. 

शेवगा शेतीची सुरवात कशी झाली? 
महेश पगार (Mahesh Pagar) यांचे बारावीपर्यंत शिक्षण झालं असून त्यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. या शेतीत कांदा, कापूस ही पारंपरिक पिके घेतली जातात. मात्र मागील दोन वर्षांपासून महेश पगार पीक पद्धतीत पूर्णतः बदल केला आहे. तत्पूर्वी २०१७ च्या सुमारास कागदी निंबुच्या शेतीत आंतरपीक म्हणून शेवगा लागवड केली. त्यावेळी निंबुच्या उत्पादनापेक्षा शेवग्याचे उत्पादन चांगले झाले आणि उत्पन्नही चांगले मिळाले. त्यानंतर २०१९ मध्ये दीड एकरमध्ये स्वतंत्र्यरित्या शेवगा लागवड केली. त्यावेळी उत्पादन चांगले मिळाले, परंतु कोरोना काळ असल्याने भाव कमी मिळाला. मात्र त्यानंतर शेवगा शेती सोडली नसल्याचे पगार यांनी सांगितले. 

एकरी व्यवस्थापन कसे केले? 
एकरी व्यवस्थापनाबाबत पगार म्हणाले कि, शेवगा शेतीला एकरी ६० हजार रुपये खर्च येतो. यासाठी अर्धा किलो बियाणे, १२X ६ किंवा १४X७ वर लागवड केली जाते. एका वर्षात जून आणि डिसेंबर अशा दोन वेळा लागवड करता येते. नांगरणीसाठी ५ हजार रुपये, २ मजूर आवश्यक, झाड वाढीपर्यंत औषधांसाठी ५ ते ६ हजार रुपये, तर दहा हजारांची खते, तसेच एकरी १०० ते १२० क्विंटलचे उत्पादन निघते. सध्या ४० ते ६० रुपये किलोपर्यंत दर मिळतो आहे. तर एका झाडाला जास्तीत जास्त ७० किलो माल निघत असल्याचे ते म्हणाले. 

शेवगा आणि पाण्याचा ३६ चा आकडा, कारण...  
शेवगा शेतीला कमीत कमी पाणी लागते. एक दिवस आड किंवा ओलावा बघून पाणी द्यावे लागते. कारण पाणी जर जास्त झाले, मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवगा शेतीत पाणी नियोजन महत्वाचं आहे. 

कांद्यापेक्षा शेवगा भारी, असं का म्हणतोय शेतकरी 
कापूस एकरी दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन देत होता. कायमस्वरूपी कांदा, कापूस ही पिके घेतली गेली. फेर पालट न झाल्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला. मात्र शेवगा शेतीमुळे या गोष्टी टाळता आल्या. शिवाय कांद्याइतके उत्पादन शेवगा शेतीतून मिळू लागले. शेवगा शेतीला दोन वेळा बहार येत असल्याने डिसेंबरपासून ते ऑगस्टपर्यंत त्याची कटिंग चालते. कांद्याइतकेच शेवग्याचे १२० ते १५० क्विंटलपर्यंत मिळणारे उत्पादन आणि भावही चांगला मिळत असल्याने एकरी २ ते ३ लाख रुपये उत्पन्न मिळते. 

कमी खर्चात जास्त नफा देणाऱ्या शेवगा शेतीचे गणित काय? 
सगळ्यात महत्वाचे मजुरीवरील खर्च कमी झाला, सहा-सहा महिन्यात जमीन तयार करावी लागत असे, ती आता करावी लागत नाही. शिवाय फवारणीचा खर्च कमी होतो आहे. शेवगा शेतीला कमी फवारणी लागते. जसे कापूस पिकाला एकास तीन, एकास दोन अशा पद्धतीने औषधे वापरली जातात, तसे शेवगा शेतीला एकास अर्धा, एकास एक अशी औषधे लागत असल्याने खर्चाची बचत झाली. सध्या सात एकरवरील शेवगा शेतीतून वर्षाला ४ लाख रुपये खर्च होतात. तर दहा लाखांचा नफा होत असल्याचे पगार यांनी सांगितले. 

पारंपरिक शेतीत दिवसरात्र मेहनत घेऊन अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र. त्यामुळे शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने शेतीच गणित समजून घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने महेश पगार यांनी अनेक वर्ष वडिलोपार्जित कांदा, कापसाची पारंपरिक शेती केली, मात्र शेवग्याचा आंतरपिकाचा प्रयोग केल्याने त्यांना नवी दिशा मिळाली. आज सात एकरवर केवळ शेवगा शेतीतून ते लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. 

Web Title: Latest News Shevga Farming Nandgaon farmer gave up onion and cotton, now Shevga farming lakhs of rupees income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.