Cabbage Farming Story : भंडारा जिल्ह्यात आतापर्यंतच्या इतिहासात पावसाळ्याच्या दिवसांत फूलकोबीचे उत्पन्न घेण्याचे यशस्वी प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाले नाही. एक हजार ते एक हजार 500 मिलिमीटर पाऊस पडत असल्याने फूलकोबी (Cabbage Farming)उत्पादित करणे कठीण असते. बीटीबीच्या तंत्रशुद्ध नियोजनाने बिरजू खराबे या उमद्या शेतकऱ्याने पाच एकरांत फूलकोबीचे उत्पन्न घेत प्रती एकर एक लाख दहा हजारांच्या निव्वळ नफा मिळविला.
बीटीबी निर्मितीपूर्वी भंडारा जिल्ह्याला (Bhandara) इतर राज्यांतून व जिल्ह्यांतून भाजीपाल्याची आवक करावी लागत होती. मात्र, बीटीबीने शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान अवगत करून पावसाळ्याच्या दिवसांत भाजीपाल्याच्या क्षेत्रात भरीव प्रगतीचे मार्ग मोकळे करून दिले. यात वांगी, मिरची, लवकी, काकडी, चवळी, शेंग, बिनस वाल, साधा गावरान वाल, कारले, कोहळा, भेंडी, गवार, ढोबळी मिरची, दोडका, आदी भाज्यांचे उत्पादन सुमार झाले. त्यामुळे अर्ध्याच्या वर उत्पादन इतर राज्यात निर्यातीला मार्ग मोकळा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्याकरिता मार्ग सापडला.
नियोजित नियमित भाज्या उत्पादित करीत त्याहीपुढे जाऊन इतर राज्यांत होणाऱ्या भाज्यांचे उत्पादन आपण आपल्या जिल्ह्यात घेऊ शकतो काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरिता बीटीबीने भारतभर भ्रमंती करून अभ्यास घेतला. अभ्यासाअंती फूलकोबी जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांत उत्पादित होऊ शकतो यावर शिक्कामोर्तब करीत बिरजू खराबे यांना फूलकोबी लागवडीकरिता प्रेरणा देण्यात आली. त्यांनी नियमितपणे मल्चिंग व ड्रीपचा आधार घेत उत्कृष्टपणे फूलकोबी उत्पादित केला.
भंडारा जिल्ह्यातील व जिल्ह्याशेजारील भाजी उत्पादक शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान देत भाजीपाला क्षेत्रात परिपूर्ण करायचे आहे. त्याचा पहिला प्रयोग बिरजू खराबे या भाजी उत्पादकाला देण्यात आला. त्यांनी तो सार्थक ठरविला.
- बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी, भंडारा
बीटीबीच्या मार्गदर्शनात फूलकोबीचा मळा फुलविला. माझ्या १८ एकर जागेत केवळ भाजीपाल्याची शेती कोबी लागवडीतून एकराला एक लाखाचा नफा करीत त्याहीपुढे जाऊन इतर राज्यांत होणाऱ्या भाज्यांचे उत्पादन आपण आपल्या जिल्ह्यात घेऊ शकतो काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरिता बीटीबीने भारतभर भ्रमंती करून अभ्यास घेतला. अभ्यासाअंती फूलकोबी जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांत उत्पादित होऊ शकतो यावर करतो आहे. त्यात पावसाळी हंगामात पाच एकरांत फूलकोबी काढला. एका एकरात एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न हाती आले. खर्च वजा जाता एकराला एक लाख १० हजार रुपये उरले. तो माझा निव्वळ नफा ठरला.
- बिरजू खराबे, फूलकोबी उत्पादक मोहाडी (गोवरी)