Lokmat Agro >लै भारी > Kakdi Farming : काकडी शेतीतुन एकरी अडीच लाख रुपयांचा नफा, नंदुरबारच्या शेतकऱ्यांची करार शेती 

Kakdi Farming : काकडी शेतीतुन एकरी अडीच लाख रुपयांचा नफा, नंदुरबारच्या शेतकऱ्यांची करार शेती 

Latest News Successful farming of cucumber in Shednet by farmers through contract farming | Kakdi Farming : काकडी शेतीतुन एकरी अडीच लाख रुपयांचा नफा, नंदुरबारच्या शेतकऱ्यांची करार शेती 

Kakdi Farming : काकडी शेतीतुन एकरी अडीच लाख रुपयांचा नफा, नंदुरबारच्या शेतकऱ्यांची करार शेती 

Cucumber Farming : नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी गावात शेतकऱ्यांनी शेती करार करून शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली.

Cucumber Farming : नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी गावात शेतकऱ्यांनी शेती करार करून शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली.

शेअर :

Join us
Join usNext

- राधेश्याम कुलथे

Kakdi Farming : 'उत्पन्नच नाही यंदा, उन्हामुळे पीके करपली तर अतिवृष्टीमुळे, अशी कितीकारी उदाहरणं आजूबाजूला असताना प्रतिकूल हवामानात शेती टिकवणं शेतकऱ्यांसाठी मोठी कसरतच.. अशात नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात शेतकऱ्यांनी शेती करार करून शेडनेटमध्ये काकडीची लागवड (Cucumber Farming) केली. ही काकडी इतर राज्यासह परदेशात देखील तोरा करतेय.... त्यात वर्षाला एक एकर मागे अडीच लाख रुपयांचा नफा शेतकऱ्यांना मिळतोय.

भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये ६० टक्के समाज हा शेतीवर अवलंबून आहे. या मोठ्या क्षेत्रात बदल करण्याच्या दिशेने फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. मुळात शेती व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे अनेकदा केलेले नियोजन कोलमडून पडते. त्याच प्रमाणे आजही कृषी क्षेत्राकडे बघण्याचा मुख्य उद्देश व्यापारी राहिलेला नाही. आजही शेती सामान्यतः पारंपरिक पद्धतीने केली जाते, जागतिक बाजारपेठेत होणारे बदल किंवा तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत एकतर पोहचत नाहीत किंवा फार उशिरा पोहचत असल्याने पारंपरिक शेतीला बगल देत ब्राह्मणपुरी परिसरातील शेतकरी करार शेतीकडे वळले आहेत. 

मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत विदेशात देखील त्याची निर्यात होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसर हा केळी पिकांबरोबर पपई, सोयाबीन आधी पीक घेत भरघोस उत्पन्न घेत आहे. परंतु अचानक मध्येच आसमानी सुलतानी संकटामुळे शेतकरी हतबल होऊन शेतात लावलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवल्याचे चित्र दिसून येते. ब्राह्मणपुरी परिसरातील शेतकऱ्यांनी गुजरात राज्यातील एका कंपनीला सुमारे ७ वर्ष करारशेती देत त्यात काकडी ची लागवड केली आहे. यातून स्थानिक मजुरांना रोजगाराची संधी प्राप्त होऊन शेतकरी मालामाल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यात एकरी ३० टन काकडीचे उत्पादन निघत थेट गुजरात राज्यातील व्यापारामार्फत काकडी थेट परदेशात विक्री होत आहे. 

शेडनेट उभारून लागवड 
ब्राह्मणपुरी येथील शेतकरी अंशुमन गोपाळ पाटील यांनी आपल्या १२ एकर क्षेत्र तर राजेंद्र माधव पाटील १० एकर, संजय नरोत्तम पाटील ३ एकर अंबालाल सुभाष पाटील साडे सात एकर, कुणाल तुकाराम पाटील ६ एकर क्षेत्रावर शेड नेट उभारून सुमारे ७ वर्षाच्या कराराने करार शेती दिली आहे. यात त्यांना एकरी सुमारे अडीच लाख रुपये नफा मिळत आहे. त्याच बरोबर स्थानिक शेकडो मजुरांना दैनदिन रोजगार उपलब्ध होत असून स्थलांतर रोखण्यास मदत होत आहे. स्वतःचा शेतीसोबत करार शेतीतून साधली.

व्यावसायिक वृध्दी
स्वतःच्या पारंपरिक केळी, पपई पिकांसोबत व्यवसायवृद्धीसाठी कराराने शेतीचे उत्तम नियोजन केले आहे. अर्थात, यात वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक अनियमितता यामुळे वाढत्या नुकसानीची जोखीम कमी करण्यासाठी वर्षभरात योग्य नियोजन व व्यवस्थापनातून ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांनी मार्ग काढला आहे.
 

Web Title: Latest News Successful farming of cucumber in Shednet by farmers through contract farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.