Join us

शेतीची धुरा तरुणाईने सांभाळली अन् बाराही महिने फुलू लागले टरबूजचे मळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 10:38 AM

चांगदेव चिंचोल येथील शेतकऱ्यांनी केळी पाठोपाठ आता टरबूज उत्पादक शेतकरी म्हणून नवी ओळख मिळविली आहे.

मतिन शेख 

जळगाव : उत्कृष्ट केळी उत्पादन करणाऱ्या  जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव चिंचोल येथील शेतकऱ्यांनी केळी पाठोपाठ आता टरबूज उत्पादक शेतकरी म्हणून नवी ओळख मिळविली आहे. कृषी तंत्रज्ञानाला प्रयोगाची जोड देत बाराही महिने टरबूज पीक उत्पादन घेऊ लागले आहे. तीन महिन्यांच्या या पिकात सरासरी दोन टन टरबूज उत्पादनाचे उद्दिष्ट गाठत निर्यातक्षम टरबूज उत्पादनाचे लक्ष साध्य करीत आहे. विशेष म्हणजे पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोगशील शेती ची धुरा या गावातील तरुणाई हाताळत आहे.

बारमाही दिसू लागले आहे...

दशका पूर्वी नद्यांच्या थड्यावर उन्हाळ्यात बहरणारे टरबूज पीक शेतात बाराही महिने फुलातील यावर पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता. परंतु कुटुंबातील शेतीची धुरा तरुणाईने सांभाळली आणि शेतीत तंत्रज्ञानचा वापर वाढला प्रगत तंत्रज्ञानाने बाजारपेठच्या घडामोडी समजू लागल्या,. यातूनच बेरजेचे अर्थकारण गाठण्यास शेतात नवनवीन प्रयोग करून ऑफ सिजनमध्ये आपले फळ बाजारपेठेत पोहोचले. म्हणजे मालाला भाव मिळतो, यावर लक्ष केंद्रित करून या भागातील तरुण शेतकऱ्यांनी एकमेकांच्या सल्ल्याने साखळी पद्धतीने बारमही टरबूज उत्पादनाचा प्रयोग केला. आणि तो यशस्वी झाला. 

कमी दिवसाचे फळ पीक ..

या भागात केळी पाठोपाठ टरबूजचे मळे फुलू लागले आहे. ९० दिवसाच्या या फळ पिकाला लागवडीपासून तर हार्वेस्टिंगकरेपर्यंतचा खर्च, येणारे उत्पन्न आणि अस्थिर बाजारपेठेत मिळणारा मोबदला यातून टरबूज उत्पादन परवडणारे गणित जुळत असल्याने या भागात टरबूज शेतीचा कल वाढला आहे. हिवाळ्यात ९० दिवस तर उन्हाळ्यात ७० ते ७५ दिवसात टरबूज उत्पादना साठी लागतात.

सरासरी २० टन उत्पन्न...

एका एकरात टरबूज लागवडीसाठी साधारण पणे ५०ते ५५ हजार रुपये खर्च येतो. यातून  १५ ते २५ टन टरबूज उत्पादन मिळते. सरासरी २० टन उत्पन्न गृहीत धरले जात आहे. बाजारात तेजी असली तर खर्च वजा जाता दीड ते दोन लाखापेक्षा अधिकचा नफा शक्य होतो. नसेल तर बाजारात टरबूजचे भाव पडले तरी खर्च वजा जाता एक लाखाच्या आता उत्पन्न मिळते.

टरबूज उत्पादन एकरी खर्च-

नागरटी - १८००, रोटर - १२००, बेड बनविणे - १०००, बियाणे -  १५००, मल्चिंग पेपर - ५५००, खते आणि फवारे- २५०००, हार्वेस्टिंग -  ७०००

चांगदेव येथील टरबूज उत्पादक शेतकरी डॉ. आशिष पाटील म्हणाले की, तंत्रशुद्ध लागवड आणि देखरेख मुळे टरबूज शेती कमी अवधीत उत्पन्न देणारे फळपीक आहे, ऑफ सिजनमध्ये आपला माल बाजारात पोहचला तर टरबूज अधिक फायद्याचे आहे.त्या दृष्टीने नियोजन महत्वाचे आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीजळगावफलोत्पादनशेतकरी