Lokmat Agro >लै भारी > Women Drone Pilot : भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला ड्रोन पायलट भावना भलावे, जाणून घ्या त्यांचा प्रवास 

Women Drone Pilot : भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला ड्रोन पायलट भावना भलावे, जाणून घ्या त्यांचा प्रवास 

Latest News Women Drone Pilot Bhandara district's first female drone pilot Bhavna Bhalle | Women Drone Pilot : भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला ड्रोन पायलट भावना भलावे, जाणून घ्या त्यांचा प्रवास 

Women Drone Pilot : भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला ड्रोन पायलट भावना भलावे, जाणून घ्या त्यांचा प्रवास 

Agriculture News : भावना रविशंकर भलावे कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट ड्रोन पायलट म्हणून नावारूपाला आल्या आहेत. 

Agriculture News : भावना रविशंकर भलावे कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट ड्रोन पायलट म्हणून नावारूपाला आल्या आहेत. 

शेअर :

Join us
Join usNext

- अंगेश बेहलपाडे 

शेतीत अनेक बदल होत आहेत. नवनवीन आधुनिक अवजारांच्या साहाय्याने शेती कसली जात आहे. यात ड्रोनसारख्या नव्या आधुनिक तंत्राचा वापर शेतकरी करताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या सोबतीला महिला मंडळही पुढे असल्याचे चित्र आहे. भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) लाखनी तालुक्यातील मुरमाडी सावरी येथील भावना रविशंकर भलावे कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट ड्रोन पायलट म्हणून नावारूपाला आल्या आहेत. 

केवळ बारावीपर्यंत शिक्षण, मात्र काहीतरी करण्याची जिद्द, अशातच बचत गटाच्या (Self-help Group) माध्यमातून नव्या व्यवसायाला उभारी मिळाली. हाच व्यवसाय उभारी घेत असताना महिला ड्रोन पायलट होण्याची संधी भावना यांना आली. कधीच अशा पद्धतीचे तांत्रिक काम न केलेल्या भावना यांनी कुटुंबांशी जुळवून, नवं शिकण्याचा मानस बाळगून अनेक प्रशिक्षणांनंतर भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला ड्रोन पायलट होण्याचा मान मिळवला. चूल आणि मुलं सांभाळून आज कृषी क्षेत्रात नव्या पद्धतीचा अवलंब करत ही महिला इतर महिलांसाठी प्रेरक उदाहरण ठरली आहे. 

ड्रोन पायलट भावना भलावे म्हणाल्या की, 2019 ला सहा ते सात महिला एकत्रित येत बचत गटाची स्थापना केली. बचत गटाच्या माध्यमातून आटाचक्की मिळाली. याद्वारे विविध खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरवात झाली. खाद्य पदार्थ बनवून ते घरपोच पाठवणे, असा दिनक्रम सुरू होता. तिथूनच नियमित चर्चामधून हे ड्रोन पायलट बनण्याची संधी पुढे आली. ती मी स्वीकारली.

पुण्यातील आठ दिवसांच्या ट्रेनिंगनंतर काम करण्यास बळ मिळाले. आज अनेक महिला घराबहेर पडून शेती व्यवसायात नाव मोठं करीत आहेत. शिवाय आयटी क्षेत्रातही महिलांचा दबदबा पाहायला मिळतो. ग्रामीण भागातील महिला देखील चूल मूल सांभाळून इतर कामे करत असतात. मात्र काही वेळा तांत्रिक काम करताना अडचणी येतात. मात्र अडचणींवर मात करत भलावे यांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले. 

अनेक शहरात प्रशिक्षण 

विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात आदिवासी जिल्हा असल्याने महिला ड्रोन पायलट मिळणे जिकिरीचे होते. बाहेरील शहरातील प्रशिक्षण, होणारी परीक्षा यामुळे कोणी महिला पुढे येण्यास धजावत नव्हत्या. अखेर यासाठी तयारी दर्शवत परीक्षा दिली. या परीक्षेत पास होऊन जिल्ह्यात ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निवड झाली. पुण्यात जानेवारी महिन्यात १५ दिवसांचे प्रशिक्षण, फेब्रुवारीत सातारा येथे ०३ दिवसांचे प्रशिक्षण झाले. यानंतर गुजरातमध्ये भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पीएम नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. याचवेळी एकाचवेळी एक हजार ड्रोन उडविण्याचे प्रात्यक्षिक पार पडले. या प्रात्यक्षिकात सहभागी होण्याचा मान मिळाल्याचे भलावे यांनी सांगितले. 

ड्रोन च्या माध्यमातून शेती.
 
शेती म्हटली की विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषध फवारणी आवश्यक असते. औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. सर्व क्षेत्र पंप किंवा इतर आधुनिक अवजाराच्या साहाय्याने फवारणी करावी लागते. अशावेळी. वेळ, खर्च, मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असते. मात्र सद्यस्थितीत शेती व्यवसायासाठी ड्रोन माध्यम वरदान ठरत आहे. ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी पिकांसाठी पोषक आणि उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. शिवाय औषध फवारणीचा खर्चही वाचवता येत आहे. 

Web Title: Latest News Women Drone Pilot Bhandara district's first female drone pilot Bhavna Bhalle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.