Lokmat Agro >लै भारी > Success Story : शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे बँक उभी करणारी हरणगावची महिला सरपंच 

Success Story : शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे बँक उभी करणारी हरणगावची महिला सरपंच 

latest news Women Sarpanch of Harangaon who set up agricultural implements bank for farmers | Success Story : शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे बँक उभी करणारी हरणगावची महिला सरपंच 

Success Story : शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे बँक उभी करणारी हरणगावची महिला सरपंच 

एकवेळ अशी आली जेव्हा प्रत्येक गावकऱ्याच्या दारात एक कृषी अवजारे आलं, कृषी अवजारांची एक मोठी बँकच शेतकऱ्यांसाठी उभी करण्यात यश आलं.

एकवेळ अशी आली जेव्हा प्रत्येक गावकऱ्याच्या दारात एक कृषी अवजारे आलं, कृषी अवजारांची एक मोठी बँकच शेतकऱ्यांसाठी उभी करण्यात यश आलं.

शेअर :

Join us
Join usNext

"गावाच्या आजूबाजूला पाणी होतं, पण व्यवस्थापन नव्हतं. त्यामुळेच शेतीला किती आणि कसं पाणी द्यावं हे हरणगावच्या लोकांना उमगत नव्हतं. म्हणून पारंपरिक शेती पिकत होती. त्याला तंत्रज्ञानाची जोड नसल्याने शेतीत वेगळा काही प्रयोग करण्याचंही कोणी धाडस करत नव्हते. एकवेळ आली जेव्हा प्रत्येक गावकऱ्याच्या दारात एक कृषी अवजारे आलं, कृषी अवजारांची एक मोठी बँकच शेतकऱ्यांसाठी उभी करण्यात यश आलं. त्यानंतर शेतीत नवनवे प्रयोग होऊ लागले. जिथं केवळ भात शेती होत होती, तिथं आता साखर देणारा ऊसही होऊ लागला. एवढंच काय तर पाणी व्यवस्थापनाने घरोघरी पाणी खेळू लागलं. ही आभासी वाटणारी गोष्ट सत्यात उतरवली ती, पेठ तालुक्यातील हरणगावच्या महिलासरपंच पल्लवी विजय भरसट  यांनी.' 

सरपंच म्हटलं कि पुरुष सरपंचाचा मोठा तोरा पाहायला मिळत असतो. मात्र हल्ली एक गाव ओलांडलं तरीही महिला सरपंच आपल्या नजरेस पडते. मात्र महिला केवळ नावालाच सरपंच राहत असून पतीचं सत्ताधारी म्हणून वावरत असतात. मात्र हरणगावच्या महिला सरपंच त्याला अपवाद ठरल्या आहेत. वर्षभरापूर्वी लोकांच्या निवडीतून सरपंच म्हणून पहिल्यांदा गावचा कारभार हाती घेतला. यासाठी पल्लवी यांना समाजसेवेची ओढ असलेल्या पतीच्या साथ मिळाली आणि स्वतः कामकाज समजून घेत गावाला विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवले. मागील वर्षी हरणगावला स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात आला. तर लोकमत आयोजित सरपंच अवार्डने सरपंच पल्लवी भरसट यांना गौरविण्यात आले. 

आजही नाशिक जिल्ह्यातील बहुतांश गावात कुपोषण ही समस्या दिसून येते. या उपरही पाणी हा आजही महिलांसाठी खूप मोठा प्रश्न आहे. हरणगावातही पाणी आणि कुपोषण असे दोन मुख्य प्रश्न होते. पल्लवी भरसट यांनी सरपंच म्हणून गावाची जबाबदारी घेतल्यानंतर पाणी आणि कुपोषण याला प्राधान्य दिले. कुपोषण टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कुपोषणमुक्तीचे पाऊल टाकण्यात आले. आता हळूहळू हे प्रमाण कमी होऊन कुपोषणावर मात करण्यात यश येत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यानंतर दुसरा प्रश्न आ वासून उभा होता, तो म्हणजे पाण्याचा. मात्र पाणी असूनही पाण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. अशा स्थितीत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून गावाला पाणीदार केलं.  


कृषी अवजारे बँक ठरली निर्णायक 

महिला सरपंच म्हटली की ग्रामपंचायत कारभार हाकणे अनेकदा अवघड जाते. इतर पुरुषच गावचा कारभार हाकत असतात. त्यातही मग शासकीय योजना म्हटल्या कि एकही योजनाची माहिती नसते. मात्र पल्लवी भरसट यांनी गावातील मुख्य प्रश्न सोडविल्यानंतर थेट शासकीय योजना गावात राबविण्याचा निर्णय घेतला. कारण गावात पाणी आलं होतं, मात्र शेतीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं असल्यास कृषी तंत्रज्ञानाची जोड देणं आवश्यक होत, म्हणून त्यांनी कृषी अवजारांच्या योजना राबवत शेतकऱ्यांना अवगत केले. नवनवीन अवजारांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना दिला. या अवजारांमध्ये मिनी ट्रॅक्टर, भात लावणी मशिन, बॅटरीवर चालणारे फवारणी पंप, भात कापणी मशिन, भात मळणी यंत्र, गवत कापणी मशिन, स्वयंचलित मळणी यंत्र अशा प्रकारे एकूणच गावातच कृषी अवजारांची बँकच उभी केली. शेतीला लागणारे विविध साहित्य कृषी बँकेत ठेवण्यात आले. ज्या शेतकऱ्यांना ज्या अवजारांची आवश्यकता भासेल ते अवजारे भाड्याने देण्याची सुविधा करण्यात आली. अशाप्रकारे पल्लवी भरसट यांच्याकडून कृषी अवजारे बँकेसारखा वेगळा प्रयोग प्रभावीपणे राबविला जात आहे. 


पारंपरिक शेतीला कृषी तंत्रज्ञानाची जोड 

हरणगावात अनेक वर्षांपासून पारंपरिक शेती केली जात होती. मात्र ज्यावेळी पाण्याचे व्यवस्थापन केले, कृषी अवजारे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अवजारांचा पुरवठा झाला. यानंतर बागायती शेतीला चालना मिळाली. सुरवातीला जल व्यवस्थापनासाठी वृक्षारोपण, वनराई बंधारे, केटी बंधारे बांधण्यात आले. हरणगाव धरणाचे जलव्यवस्थापन करून आजूबाजूची बाराशे हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आणली. मग भात शेतीबरोबर ऊस, गहू, हरभरा, भोपळा, वाल, आंबे लागवड आदींची शेती होऊ लागली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवले. यासाठी गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण असो, रेशीम शेती, परसबाग प्रशिक्षण आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगल्भ करण्यात यश आले. यातूनच हरणगावचा शेतकरी संपन्न होऊ लागला.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...
 

Web Title: latest news Women Sarpanch of Harangaon who set up agricultural implements bank for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.