Lokmat Agro >लै भारी > कर्ज काढलं, शेती फुलवली, आता शासनाच्या आधाराची गरज, सुरगाण्याच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

कर्ज काढलं, शेती फुलवली, आता शासनाच्या आधाराची गरज, सुरगाण्याच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

Loan taken, agriculture flourished, now need of government support, success stories of Surgana farmer | कर्ज काढलं, शेती फुलवली, आता शासनाच्या आधाराची गरज, सुरगाण्याच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

कर्ज काढलं, शेती फुलवली, आता शासनाच्या आधाराची गरज, सुरगाण्याच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

Nashik : शासन शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलं तर हजारो शेतकऱ्यांच्या शेतात नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही'

Nashik : शासन शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलं तर हजारो शेतकऱ्यांच्या शेतात नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही'

शेअर :

Join us
Join usNext

Success Story : 'शेती फुलवली, प्रगती झाली, मात्र अजूनही बँकेचे कर्ज फेडण्यात आयुष्य चाललंय. शेतकऱ्यांना कुठेतरी शासनाने हातभार लावून शेतकऱ्यांकडील ओझं हलकं करावं, म्हणजे शेतकऱ्यांना देखील समाधान वाटेल, शेतकऱ्यांची चांगली बाजू दाखवितांना त्या शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावे लागलेत, आता किती कष्ट घेतोय याचा सारासार विचार करून शासन शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलं तर हजारो शेतकऱ्यांच्या शेतात नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही', असे मत सुरगाणा तालुक्यातील शेतकरी अर्जुन हाडस यांनी व्यक्त केले. 

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील दुर्गापूर गावातील शेतकरी अर्जुन हाडस यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले. शासनाच्या कृषी विभागाकडून त्यांची यशोगाथा देखील प्रसिद्ध करण्यात आली. आजच्या घडीला शेतकरी हाडस हे स्ट्रॉबेरी पिकासह गहू, टोमॅटो, बटाटे आदी पिके घेत आहेत, पूर्वी ते भात, नागली, वरई अशी पारंपरिक पिके घेत असतं. मात्र आता कमालीचा बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने हाडस यांची दखल घेत इतर शेतकऱ्यांना आदर्शवत ठरणारी यशोगाथा समोर आणली. मात्र हे सगळं सुरु असताना दुसरीकडे या शेतकऱ्याला आजही बँकांचे हफ्ते भरण्यासाठी जीवाचं रान करावं लागत असल्याची खंत या शेतकऱ्याने बोलून दाखवली. 

अर्जुन हाडस हे मूळचे दुर्गापूरचे. या गाव शिवारात त्यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. सुरवातीला पासूनच पारंपरिक शेती करत आले. अर्जुन हाडस यांचं शिक्षण अवघ पहिलीच्या वर्गात झालेले. मात्र घरची शेती असल्याने ते पहिल्यापासून शेतीत रमले. एकादशीला पंढरपूरला जायचो मग शेती पाहायचो, मग आपल्याला शेतीत काही बदल करता येतील का? म्हणून पारंपरिक शेतीला सोबत आधुनिक शेतीला सुरवात केली. पुढे २०१२ मध्ये त्यांनी बँकेतून कर्ज काढले. त्या कर्ज आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. हळूहळू टोमॅटो, कांदा, भाजीपाला मग आता आता स्ट्रॉबेरी लागवड करत शेतीत बदल केला. मात्र हे सगळं करत असताना दुसरीकडे कुटुंब चालवत कर्जाचा डोंगर कमी करत असल्याचे हाडस म्हणाले. 

शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरव 

सद्यस्थितीत हाडस यांनी शेतीसोबतच पोल्ट्री फार्मही सुरु केले आहे. या फार्ममध्ये साडे चार हजार पक्षी असून शेतीसोबत जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्मचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. हाडस यांनी पाच एकर शेतीसाठी  शेतातच शेततळे उभारले आहे. तर शेतीसाठी बोअरसुद्धा खोदलेली आहे. जेव्हा लाईट नसते तेव्हा ते शेततळ्यात साठवलेल्या पाण्यावर शेती करतात. शिवाय शेततळ्यामध्ये ते मत्सपलणाचा व्यवसायही करतात. जोड धंद्यातून चांगला नफा मिळतो म्हणून शेतकऱ्यांनी जोड धंदा उभारावा असही ते आग्रहाने सांगता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन २०१९ मध्ये आदिवासी गटातील शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

पण मी शेतकरी झालो.... 

शेतकरी अर्जुन हाडस म्हणतात की, आई-वडील अडाणी म्हणून शिक्षण झालं नाही, माझ्यासोबतच अनेक शिक्षक, पोलीस झाले, पण मी शेतकरी झालो. कर्ज काढलं पण भारी झालं, आज शेतीत चांगली प्रगती झाली आहे. यामुळे जमीन सुधारली. कुणीतरी मार्गदर्शन केल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. अशावेळी एखादा निर्णय वेळीच घेणं महत्वाचं ठरत. अनेकजण आता हळूहळू करू लागले आहेत. शेतीत नवेपण शोधू लागले आहेत. मात्र अशा शेतकऱ्यांना शासनाने पुरस्काराऐवजी प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 


 

Web Title: Loan taken, agriculture flourished, now need of government support, success stories of Surgana farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.