Lokmat Agro >लै भारी > मोबाईल व कॉम्प्युटरद्वारे तीस एकरावरील द्राक्षबागेचे व्यवस्थापन

मोबाईल व कॉम्प्युटरद्वारे तीस एकरावरील द्राक्षबागेचे व्यवस्थापन

Management of 30 acres of grape orchard through mobile and computer | मोबाईल व कॉम्प्युटरद्वारे तीस एकरावरील द्राक्षबागेचे व्यवस्थापन

मोबाईल व कॉम्प्युटरद्वारे तीस एकरावरील द्राक्षबागेचे व्यवस्थापन

आधुनिक पद्धतीने द्राक्ष शेती करणारे प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब माळी यांनी ऑटोमेशनद्वारे हायटेक केलेली द्राक्ष शेती या परिसरासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. 

आधुनिक पद्धतीने द्राक्ष शेती करणारे प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब माळी यांनी ऑटोमेशनद्वारे हायटेक केलेली द्राक्ष शेती या परिसरासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

उत्तर महाराष्ट्राचं मुख्यालय असलेला नाशिक जिल्हा थंड वातावरणाबरोबरच इतर गोष्टींसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक बाबी नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात सांगता येतील. मराठी साहित्यक्षेत्रातील भारदस्त व्यक्तिमत्व कुसुमाग्रज यांचे नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे हे मूळ गांव होय. येथूनच अवघ्या चार किलोमीटरवर वडनेर भैरव गाव वसलेले आहे. येथील आधुनिक पद्धतीने द्राक्ष शेती करणारे प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब माळी यांनी ऑटोमेशनद्वारे हायटेक केलेली द्राक्ष शेती या परिसरासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. 

अण्णासाहेब माळी यांना सुरवातीपासूनच शेतीची आवड. पूर्वी आपल्या शेतीत पाटचारी पद्धतीनं ते पाणी देत असतं. राबराबून अण्णासाहेबांनी आपल्या परिवारासह ३० एकर जमीनीत द्राक्षबाग लावली. नंतर त्यात जैन इरिगेशन कंपनीच्या ऑटोमेशन अत्याधुनिक सिंचन प्रणाली बसवली. ज्या तऱ्हेने सिंचनाचे नवनवीन यंत्रणा विकसित होत गेली तसतसे ते आपल्या शेतीमध्ये या यंत्रणांचा वापर करू लागले. पारंपरिक पद्धत ज्याला मोकाट सिंचन पद्धती म्हटले जाई त्यापासून ते ठिबक सिंचन, ऑटोमेशनच्या उच्च तंत्राने पाणी देणे, इतवर त्याचा प्रवास झालेला आहे.

अण्णासाहेब यांनी वडिलोपार्जित असलेली एकूण आठ एकर शेती आपल्या मेहनतीच्या जोरावर वाढवत आज ३२ एकरांपर्यंत नेली आहे. सोनाका, सिडलेस शरद, थॉमसन, माणिक चमन या द्राक्ष जाती त्यांनी ९ बाय ५ अंतरावर लावल्या. द्राक्ष बागेवर स्प्रे, डिपिंग ते छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतात. द्राक्षबाग त्यांनी ३० एकरांत ११ प्लॉटमध्ये विभागली आहे. बागेत रस्ते केलेले आहेत तसेच राहण्याची जागा, मजुरांसाठी निवास, गुरांसाठी गोठे ही दोन एकर जमीनीत आहेत. विशेष म्हणजे माळी यांचे अल्पशिक्षण असतानाही ते ‘टेक्नोसेव्ही’ आहेत. अण्णासाहेबांच्या द्राक्षबागेचे वैशिष्ट्याबाबत सांगायचे झाले तर, या संपूर्ण सिंचन प्रणालीचे नियंत्रण घरबसल्या लॅपटॉपच्या साहाय्याने करता येते. 

द्राक्षबागेत अण्णासाहेब फेरफटका मारत असतात. या दरम्यान ते कोणत्या प्लॉटमध्ये सिंचन करायला हवे, फर्टिगेशन किंवा विद्राव्य खतांचे नियोजन याबाबत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ते करतात. अण्णासाहेबांनी बागेतूनच मोबाइलवर आपल्या अभियांत्रिकी शिकलेल्या सूनबाईंना सूचना द्याव्यात आणि सूनबाईंनी अगदी घरचा स्वयंपाक करता-करता लॅपटॉपवर कमांड द्यावी अन् लगेच काम सुरू व्हावं, इतकी सुलभता जैन इरिगेशनच्या ऑटोमेशनमुळे साध्य झाली. त्यांनी ही प्रणाली आपल्या शेतात वर्ष २०११ मध्ये बसवून घेतली. अगदी मोबाईलवरदेखील देशातल्या कोणत्याही भागातून ही यंत्रणा नियंत्रित करता येते, त्यांच्या या शेतात मुले सुनील, रूपेश, सुना प्रियंका, राजश्री आणि पत्नी शोभाबाई यांचे संपूर्ण लक्ष असते. ऑटोमेशनची हाताळणी माळी यांची लहान सूनबाई राजश्री माळी तसेच जाऊबाई प्रियंका माळी (ज्या नाशिक येथे प्राध्यापिका आहेत व सध्या पीएच. डी. करीत आहेत) या शनिवारी, रविवारी सुटीच्या दिवशी आल्या तर मदतीसाठी येतात. अशा रितीने अत्यंत मेहनतीने माळी परिवार द्राक्षाची शेती करतात.

१९९० मध्ये विवाह झाल्यानंतर अण्णासाहेब माळी यांनी पूर्णवेळ शेतीकडे लक्ष केंद्रीत केले. पारंपरिक शेतीपेक्षा उत्तम शेती करावी, असा ध्यास त्यांनी घेतला. आरंभी वडिलोपार्जित आठ एकर शेतीत त्यांनी टोमॅटो, द्राक्ष, कांदे आणि पानमळा आदि पिकं घेतली. त्यावेळी त्यांनी शेतात मोकाट सिंचन पद्धतीचा अवलंब केला होता. त्यावेळेस क्षेत्र मर्यादित होते म्हणून पाणी पुरायचे. पण, हळूहळू क्षेत्र वाढत गेले. पाणी मात्र तीन विहिरींचा स्त्रोत इतकाच राहिला. ठिबकबाबत माहिती झाल्यानंतर त्यांनी वर्ष १९५५-५६ पासून जैन ठिबक शेतात बसवून घेतले.

अण्णासाहेब माळी याबाबत सांगतात की, “एका शेतकरी प्रदर्शनात जैन इरिगेशनचा ठिबकचा डेमो’ पाहिला. त्यातून प्रेरणा मिळाली. नंतर जैन हिल्सला भेट देऊन कंपनीचे सगळे तंत्र व्यवस्थित समजून घेतले. आपल्याही शेतात ठिबक सिंचन बसवावे, असा पक्का निश्चय केला आणि जैन ठिबक बसवून घेतले”. 

आपल्या ३० एकरी द्राक्ष बागेत खताचं पूरेपूर नियोजन ते करतात. लिक्विड खत, सेंद्रिय खताचा समावेश त्यात असतो. 0:52:34 प्रति एकर दोन बॅगा, 0:0:50 दोन बॅगा, 0:52:34 एक बॅग, एक ट्रक भरून शेणखत बागेसाठी उपोयागात आणतात. ऑक्टोबर पासून ते नोव्हेबंरच्या शेवटपर्यंत छाटणी संपवली जाते. हवामान व पिकाची स्थिती बघून खतांची मात्रा ठरवली जाते. त्याच तऱ्हेने रोगराई होऊ नये याकरिता पीएच काय आहे, भूरीचा प्रार्दुभाव असल्यास त्यानुसार फवारणी करतो.  

पाटचारीच्या मोकाट सिंचनापेक्षा ठिबक सिंचनाचे अधिक फायदे अण्णासाहेबांच्या ध्यानी आले.  कठोर मेहनत आणि ईमानेइतबाराने हळूहळू आपल्या शेतीच्या आसपास असलेली शेतीदेखील त्यांनी खरेदी केली आणि आपल्या क्षेत्राचा विस्तार केला. असे करीत आज त्यांच्याकडे ३० एकर शेती आहे. १४ वर्षांपूर्वीच शेतातच त्यांनी त्यावेळी २३ लाख रुपये खर्च करून बंगला बांधला. या बंगल्याच्या छतावरून सर्व शेताची द्राक्षबाग दृष्टिक्षेपात येते. गच्चीवर उभे राहून संपूर्ण शेतीवर त्यांना नजर ठेवता येते. त्यादृष्टीने उंच टेकडीवर त्यांनी हा बंगला बांधला आहे.

ऑटोमेशनचे आधुनिक तंत्रज्ञान
ऑटोमेशनचे चार प्रकार आहेत. १) हार्डवायर २) वायरलेस ३) हायब्रीड ४) वेब बेस
मुख्यत्वाने टाइम, व्हॉल्यूम आणि सेन्सॉर बेसड् मोडमध्ये या सिस्टिम्सला चालविता येते. उदाहरणार्थ- अमुक वेळेत, क्षेत्रात, पाणी असाही प्रोग्राम आखता येतो.
महाराष्ट्रात आतापर्यंत एक हजाराहून अधिक ऑटोमेशनचे इन्स्टॉलेशन झाले आहे.  
ऑटोमेशनमुळे वेळ, खते, पाणी, श्रम आणि पैसा यांची बचत होते. शिवाय, गुणवत्तेचे उत्पादन घेता येते. निर्यातक्षम माल उत्पादन होत असल्याने चांगला भाव मिळतो.
पाणी, माती परीक्षण केल्यामुळे कोणते घटक कमी आहेत, ते घटक न्यूट्रिकेअरच्या साहाय्याने नेमकेपणाने व योग्य त्यावेळी थेट मुळाशी देण्याचे तंत्र असल्याने १०० टक्के कार्यक्षम वापर होतो.

Web Title: Management of 30 acres of grape orchard through mobile and computer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.