विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून एकरी १०७ टन उसाचे उच्चांकी उत्पादन घेऊन ऊस गाळपासाठी पाठवल्याबद्दल अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी ऋषिकेश माणिकराव हिंगे पाटील यांचा सत्कार विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
युवा ऊस उत्पादक शेतकरी ऋषिकेश माणिकराव हिंगे पाटील यांनी २६५ आडसाली उसाची लागवड करून शेणखत व इतर खतांचा योग्य वापर करून पिकाचे योग्य नियोजन करून सन २०२२ ते २०२३ सालात उच्चांकी एकरी १०७ टन ऊसाचे उत्पादन घेऊन घातल्याबद्दल त्यांचा सत्कार कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला आहे. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, संचालक नामदेव थोरात, यशराज काळे व सर्व संचालक मंडळ, ऋषिकेश हिंगे यांचे चुलते सर्जेराव हिंगे पाटील, मीनाक्षी हिंगे पाटील, संदीप हिंगे पाटील उपस्थित होते.
ऋषिकेश हिंगे पाटील यांनी आडसाली उसाची लागवड करून शेणखत व इतर खतांचा योग्य वापर करून पिकाचे योग्य नियोजन केले आहे. २०२२ ते २०२३ सालात उच्चांकी १०७ टन उसाचे उत्पादन घेऊन गाळपासाठी घातल्याबद्दल युवा ऊस उत्पादक शेतकरी ऋषिकेश हिंगे पाटील यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. उसाचे उच्चांकी उत्पादन घेऊन ऊस गाळपासाठी पाठवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.