Lokmat Agro >लै भारी > Mushroom Success Story : फिल्म इंडस्ट्रीतील जॉब सोडून सुरू केला मशरूम व्यवसाय; पुण्यातील दाम्पत्याची लाखोंची उलाढाल

Mushroom Success Story : फिल्म इंडस्ट्रीतील जॉब सोडून सुरू केला मशरूम व्यवसाय; पुण्यातील दाम्पत्याची लाखोंची उलाढाल

Mushroom Success Story: Leaving a job in the film industry, started a mushroom business; The turnover of lakhs of couple in Pune | Mushroom Success Story : फिल्म इंडस्ट्रीतील जॉब सोडून सुरू केला मशरूम व्यवसाय; पुण्यातील दाम्पत्याची लाखोंची उलाढाल

Mushroom Success Story : फिल्म इंडस्ट्रीतील जॉब सोडून सुरू केला मशरूम व्यवसाय; पुण्यातील दाम्पत्याची लाखोंची उलाढाल

Pune Mushroom Farming Success Story :  योगायोगाने २०२० साली कोरोनामुळे लॉकडाऊन पडले आणि सर्वांना आपापल्या गावाची वाट धरावी लागली. त्यावेळी अमरही गावाला आले आणि त्यांनी विविध व्यवसायाची चाचपणी केल्यानंतर मशरूम व्यवसाय करण्याचे ठरवले.

Pune Mushroom Farming Success Story :  योगायोगाने २०२० साली कोरोनामुळे लॉकडाऊन पडले आणि सर्वांना आपापल्या गावाची वाट धरावी लागली. त्यावेळी अमरही गावाला आले आणि त्यांनी विविध व्यवसायाची चाचपणी केल्यानंतर मशरूम व्यवसाय करण्याचे ठरवले.

शेअर :

Join us
Join usNext

Pune Mushroom Farming Success Story :  पुण्यातील जुन्नर येथील अमर पडवळ व त्यांची पत्नी अक्षता पडवळ यांनी मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीतील नोकरी सोडून गावी येण्याचा निर्णय घेतला आणि मशरूम शेती सुरू केली. चार वर्षापूर्वी सुरू केल्या मशरूम शेतीने आता चांगली भरारी घेतली असून मशरूमपासून वेगवेगळे उत्पादने तयार करतात. या व्यवसायाने त्यांना परिसरात नावलौकिक मिळाला आहे. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा शेती क्षेत्रात पुढारलेला तालुका म्हणून ओळखला जातो. जुन्नरच्या पुर्वेला असलेल्या राजुरी गावातील अमर पडवळ हे मुंबई येथे फिल्म इंडस्ट्रीत काम करत होते. ते मूळचे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांची मातीशी नाळ जुळलेली होती. अनेक वर्षे मुंबईत काम केल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये काहीतरी करण्याच्या अनुषंगाने गावाला येण्याचा निर्णय घेतला.   

योगायोगाने २०२० साली कोरोनामुळे लॉकडाऊन पडले आणि सर्वांना आपापल्या गावाची वाट धरावी लागली. त्यावेळी अमरही गावाला आले आणि त्यांनी विविध व्यवसायाची चाचपणी केल्यानंतर मशरूम व्यवसाय करण्याचे ठरवले. सप्टेंबर २०२० साली त्यांनी राजुरी गावात छोटेखानी आपल्या व्यवसायाची सुरूवात केली. 

सुरूवातीला ६०० बॅगपासून या व्यवसायाची सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी मार्केटची गरज ओळखून आपल्या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याचे ठरवले. दरम्यानच्या काळात त्यांनी सोशल मिडिया, डिजीटल मार्केटिंग आणि थेट ग्राहकांना मालाची विक्री करून विश्वास संपादन केला. पुढे बँकेचे कर्ज काढून ऑक्टोबर २०२३ साली त्यांनी हा व्यवसाय वाढवला. आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यसााठी त्यांनी निर्वाणा फ्रेश या मशरूम ब्रँडची सुरूवात केली आणि त्या बँडखाली ते विक्री करू लागले. 
(Amar Padwal Mushroom Farming Sucess Story)

व्यवस्थापन
सध्या अमर यांच्याकडे १०० बाय ३५ फुटाचे शेड असून त्यामध्ये ३ हजार ५०० बेडची क्षमता आहे. शेडचे व्यवस्थापन आणि मशरूमची काढणी करण्यासाठी ४ कामगार आहेत. येथे दररोज बेड तयार केले जातात. यामुळे दररोज मशरूमचे उत्पादन काढणे शक्य होते. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, भात या पिकाचा भुसा निर्जंतुकीकरण करून एका पिशवीमध्ये भरला जातो. या पिशवीमध्ये मशरूमच्या बुरशीचे कल्चर टाकले जाते. बेड भरल्यापासून 

विक्री आणि ब्रँड
सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मालाची विक्री वाढवली. त्याचबरोबर ग्राहकांना फ्रेश मशरूम दिल्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन झाला. पुढे त्यांनी 'निर्वाणा फ्रेश मशरूम' या ब्रँडची स्थापना केली. पुढे या ब्रँडखाली मशरूमची विक्री सुरू केल्यामुळे निर्वाणा हा ब्रँड आता प्रचलित झाला आहे.

प्रक्रिया आणि उत्पादने
फ्रेश मशरूमची विक्री केल्यानंतर उरलेल्या मालावर प्रक्रिया केली जाते. मशरूम सुकवून साधारण ८०० ते १००० रूपये किलोप्रमाणे विक्री केले जाते. ड्राय मशरूमची विक्री होत नसेल तर ड्राय मशरूमपासून पावडर तयार केली जाते. सध्या बाजारपेठेत मशरूम पावडरला चांगली मागणी आहे. तर अमर यांनी प्रायोगिक तत्वावर मशरूमपासून चॉकलेटही बनवले आहे.

कुटुंबियांची साथ
अमर यांना त्यांची पत्नी अक्षता यांची भक्कम साथ लाभली आहे. अक्षता या मशरूमचे उत्पादनाचे व्यवस्थापन बघतात तर अमर हे मशरूनची विक्री, ऑपरेशन्स आणि ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावतात, यामुळे व्यवसायाची चांगली घडी बसली आहे. त्याचबरोबर अमर यांचे सासरे यांचीही त्यांना चांगली साथ लाभल्याचं ते सांगतात.

उत्पन्न
एका बॅगेला साधारण ७० ते ८० रूपये उत्पादन खर्च येतो. तर एका बॅगेपासून साधारण २ ते अडीच किलो मशरूमचे उत्पादन निघते. सध्या बाजारात एका किलो मशरूमचा होलसेल दर हा १०० ते १५० रूपयांच्या आसपास आहे. प्रत्येक दिवसाला ३५ ते ४० किलो फ्रेश मशरूमचे उत्पादन निघत असल्याने साधारण प्रत्येक महिन्याला साधारण १ लाख २० हजार रूपयांचे उत्पन्न या व्यवसायातून अमर यांना मिळते. तर ड्राय मशरूम, पावडर आणि गांडूळ खतातून साधारणपणे महिन्याकाठी ३० ते ४० हजार रूपयांचे उत्पन्न होते. एकूण १ लाख ६० हजार रूपयांच्या उत्पन्नातून ५० ते ६० हजार रूपयांचा खर्च वजा केला तर या व्यवसायातून १ लाख रूपयांचा निव्वळ नफा अमर यांना शिल्लक राहतो.

Web Title: Mushroom Success Story: Leaving a job in the film industry, started a mushroom business; The turnover of lakhs of couple in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.