Lokmat Agro >लै भारी > दीड एकरातील पेरू पिकाने शेतकऱ्यास केले मालामाल

दीड एकरातील पेरू पिकाने शेतकऱ्यास केले मालामाल

One and a half acres of guava made goods | दीड एकरातील पेरू पिकाने शेतकऱ्यास केले मालामाल

दीड एकरातील पेरू पिकाने शेतकऱ्यास केले मालामाल

या शेतकऱ्याच्या पेरूला प्रतिकिलोस ४० पासून ६० रुपयांपर्यंत दर मिळाला.

या शेतकऱ्याच्या पेरूला प्रतिकिलोस ४० पासून ६० रुपयांपर्यंत दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

- शैलेश काटे

पुणे : दीड एकरात पेरुच्या बागेने गलांडवाडी नं. १ येथील रामेश्वर फलफले यांना गेल्या तीन वर्षात खर्च वजा जाता लाखो रुपयांचा फायदा मिळवून दिला आहे. पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत गलांडवाडी नं. १ गावच्या हद्दीत रामेश्वर ज्ञानदेव फलफले यांची ११ एकर शेतजमीन आहे. सन २०२० मध्ये त्यांनी दीड एकर क्षेत्रात पेरुची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांचे मित्र प्रमोद गडदे यांच्याकडून त्यांनी तैवान पिंक जातीच्या पेरूची रोपे घेतली. त्यासाठी चाळीस हजार रुपये खर्च आला.

जानेवारी २०२० मध्ये पेरणी केली. नांगरट व फन पाळी व रोटर मारुन जमीन समपातळीत करुन घेतली. शेणखत, कोंबड खत व निंबोळी पेंड ही खते वापरली. रोपे, खते, औषधे व मजुरीसाठी पहिल्या वर्षी एक लाख रुपये खर्च आला. लागवडीनंतर १८ महिन्यांनी पिक हाताशी आले. प्रतिकिलोस ४० पासून ६० रुपयांपर्यंत दर मिळाला.

ड्रॅगन फ्रुट व केळीचे उत्पादन घेणार
पुढील काळात पेरुबरोबरच ड्रॅगन फ्रुट व केळीचे उत्पादन घेण्याचा रामेश्वर फलफले यांचा विचार आहे. फलफले यांची पेरुची बाग अत्यंत आखीव रेखीव दिसते. व्यवस्थित निगा राखल्याने त्यांच्या बागेत दाखवण्यासाठी तण नाही.

शेतकऱ्यांनी शेततळे किंवा पाझर शेततळे विहिरीजवळ किंवा बोरवेल शेजारी अवश्य घ्यावे. जमिनी नुसार एक किंवा दोन एकरवर फळबाग लागवड करावी. त्यामध्ये पेरू, सिताफळ, लिंबूनी, चिकू, अंजीर, जांभूळ, कश्मीरी एप्पल बोर आदींची लागवड करावी.

- रामेश्वर फलफले. पेरु उत्पादक

Web Title: One and a half acres of guava made goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.