Lokmat Agro >लै भारी > Organic Onion Farming : स्वनिर्मित सेंद्रिय निविष्ठेचा वापर करत ज्ञानेश्वरराव घेतात एकरी १५० क्विंटल लाल कांदा

Organic Onion Farming : स्वनिर्मित सेंद्रिय निविष्ठेचा वापर करत ज्ञानेश्वरराव घेतात एकरी १५० क्विंटल लाल कांदा

Organic Onion Farming: Dnyaneshwar Rao grows 150 quintals of red onion per acre using self-made organic inputs | Organic Onion Farming : स्वनिर्मित सेंद्रिय निविष्ठेचा वापर करत ज्ञानेश्वरराव घेतात एकरी १५० क्विंटल लाल कांदा

Organic Onion Farming : स्वनिर्मित सेंद्रिय निविष्ठेचा वापर करत ज्ञानेश्वरराव घेतात एकरी १५० क्विंटल लाल कांदा

अलीकडे वातावरणीय बदलांमुळे कांदा (onion farming) उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे खर्च आणि उत्पन्नात मोठी तफावत जाणवत असल्याने कांदा उत्पादक (onion producer) शेतकरी कचाट्यात सापडले आहे. मात्र यावर सेंद्रिय (organic) मार्ग काढत स्वनिर्मित सेंद्रिय निविष्ठेचा वापर करून ज्ञानेश्वरराव एकरी १५० क्विंटल लाल कांद्याचे उत्पादन घेत आहे. 

अलीकडे वातावरणीय बदलांमुळे कांदा (onion farming) उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे खर्च आणि उत्पन्नात मोठी तफावत जाणवत असल्याने कांदा उत्पादक (onion producer) शेतकरी कचाट्यात सापडले आहे. मात्र यावर सेंद्रिय (organic) मार्ग काढत स्वनिर्मित सेंद्रिय निविष्ठेचा वापर करून ज्ञानेश्वरराव एकरी १५० क्विंटल लाल कांद्याचे उत्पादन घेत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

अलीकडे वातावरणीय बदलांमुळे कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे खर्च आणि उत्पन्नात मोठी तफावत जाणवत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी कचाट्यात सापडले आहे. मात्र यावर सेंद्रिय मार्ग काढत स्वनिर्मित सेंद्रिय निविष्ठेचा वापर करून ज्ञानेश्वरराव एकरी १५० क्विंटल लाल कांद्याचे उत्पादन घेत आहे. 

शिरोडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानेश्वर डगळे यांना वडीलोपार्जित ५ एकर शेती. कोरडवाहू भाग असल्याने केवळ पारंपरिक मका, कपाशी, मुग, तुर, लाल कांदा आदी खरीप पिके ते घेत. परिसरातील शेतकऱ्यांसोबत कृषी विज्ञान केंद्राशी ओळख झाल्याने व त्यातून सेंद्रिय शेती, मातीचे आरोग्य आदींची ओळख झाल्याने गेल्या ५ वर्षांपासून ज्ञानेश्वर आता संपूर्णपणे सेंद्रिय शेती करत आहे. 

यंदा ज्ञानेश्वर यांच्या शेतात १ एकर मका, १ एकर कपाशी, १० गुंठे अद्रक आहे. तर १० गुंठे क्षेत्रातील लाल कांद्याचे रोप तयार झाले असून आगामी दोन दिवसांत त्याची १.५ एकर मध्ये लागवड होणार आहे.

स्वनिर्मित सेंद्रिय निविष्ठेचा वापर केल्याने उत्पादनात वाढ

ज्ञानेश्वर सांगतात की, पारंपरिक शेती पिकांसह कांदा पिकांत सेंद्रिय निविष्ठेचा वापर केल्याने अनेक प्रभावी बदल दिसून आले. सोबतच कांदा उत्पादनात वाढ झाली. आमच्या परिसरातील शेतकरी ७०-८० क्विंटल एकरी कांदा उत्पादन घेत असताना मी मात्र १५० क्विंटल कांदा उत्पादन घेत असल्याचे ही ज्ञानेश्वर सांगतात. 

.. या प्रक्रियेतून निर्माण केली जाते सेंद्रिय निविष्ठा 

गूळ, बेसन पीठ, वेस्ट डि-कंपोजर २०० लीटर पाण्यात टाकून त्या पाण्याद्वारे  गांडूळ खत प्रक्रियेतून मिळणाऱ्या वर्मी वॉशला साठवले जाते, तसेच यात विविध फळे टाकले जातात. त्यानंतर दर ३ दिवसांनी हे मिश्रण ढवळत सलग २०-२२ दिवस ही प्रक्रिया केली जाते. ज्या पश्चात विविधरित्या फायद्याची सेंद्रिय निविष्ठा तयार असल्याचे ज्ञानेश्वर डगळे सांगतात. 

हेही वाचा - Sericulture Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत महेशने शोधली रेशीम शेतीतून नोकरी

Web Title: Organic Onion Farming: Dnyaneshwar Rao grows 150 quintals of red onion per acre using self-made organic inputs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.