Lokmat Agro >लै भारी > आदिवासी शेतकऱ्यांचा सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा पॅटर्न देतोय भातापेक्षा अधिक उत्पन्न

आदिवासी शेतकऱ्यांचा सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा पॅटर्न देतोय भातापेक्षा अधिक उत्पन्न

Organic strawberry farming pattern of tribal farmers is yielding more income than rice | आदिवासी शेतकऱ्यांचा सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा पॅटर्न देतोय भातापेक्षा अधिक उत्पन्न

आदिवासी शेतकऱ्यांचा सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा पॅटर्न देतोय भातापेक्षा अधिक उत्पन्न

कोणतेही औषध न फवारता संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने स्ट्रॉबेरी तयार केली जात आहे. कसदार लाल जमिन, हवामान व जिवामृत यामुळे महाबळेश्वर पेक्षा चांगली गोडी येथील स्ट्रॉबेरीला आली आहे.

कोणतेही औषध न फवारता संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने स्ट्रॉबेरी तयार केली जात आहे. कसदार लाल जमिन, हवामान व जिवामृत यामुळे महाबळेश्वर पेक्षा चांगली गोडी येथील स्ट्रॉबेरीला आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

निलेश काण्णव
भात पिकावर अवलंबून असलेला आदिवासी शेतकरी आता स्ट्रॉबेरी सारखे नगदी पिक घेवू लागला आहे. आंबेगावच्या आदिवासी भागात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

कोणतेही औषध न फवारता संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने स्ट्रॉबेरी तयार केली जात आहे. कसदार लाल जमिन, हवामान व जिवामृत यामुळे महाबळेश्वर पेक्षा चांगली गोडी येथील स्ट्रॉबेरीला आली आहे.
सध्या भीमाशंकर व आहुपे परिसरातील ४० शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.

शासनाने यासाठी योजना आखली असून हि योजना सुरू झाल्यानंतर यामध्ये अजून वाढ होणार आहे. उंच डोंगराळ भागातले हवामान, लाल जमिन यामुळे येथील स्ट्रॉबेरीला वेगळीच गोडी व चव येत आहे.

स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी झाल्यास भात पिकावर अवलंबून असलेला शेतकरी नविन पिकाकडे जाईल. दरवर्षी पावसाच्या बदलेल्या चक्रामूळे भात पिकाला मोठा फटका बसत आहे. स्ट्रॉबेरी पिकामूळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.

लागवडीची योजना
महाराष्ट्र शासनाने आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व हा शेतकरी पारंपारीक पिके सोडून इतर पिकांकडे वळावा यासाठी स्ट्रॉबेरी लागवडीची योजना आळखली आहे.

राज्याचे सहकारी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्टॉबेरी लागवडीची योजना तयार करण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या होत्या. काही शेतकरी महाबळेश्वर येथे जावून या पिकाचे प्रात्यक्षिक घेवून आले आहेत. लवकरच या योजनेतून शेतकऱ्यांना रोपे घेण्यासाठी मदत मिळणार आहे.

२३ हजार झाडे लावली
आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसाठी आयसीआयसीआय फौंडेशन मदत करत आहे. नविन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विंटर डाउन या जातीची रोपे घेण्यासाठी फौंडेशन मदत करते व रोपांची निगा कशी राखायची, जिवामृत कसे बनवायचे याचे प्रशिक्षण नितीन गुरव हे शेतकऱ्यांना बांधावर जावून देतात. पाच शेतकरी मिळून तेवीस हजार झाडे लावली व यातून उत्पन्न सुरू झाले असल्याचे पिंपरगणे येथील शेतकरी शंकर केंगले यांनी सांगितले.

नविन प्रयोग होणे आवश्यक
स्ट्रॉबेरी सेंद्रिय असल्याने याला अतिशय चांगली गोडी आली आहे, यामुळे याला अतिशय चांगली मागणी आहे. पुढे जावून आदिवासी शेतकऱ्यांसाठी काजु लागवडीचा नविन प्रयोग होणे आवश्यक आहे. समुद्र सपाटीला असलेला काजू डोंगरावरही चांगला येवू शकतो यासाठी काजु लागवड व्हावी असे शेतकरी भीमा यांनी सांगितले.

अधिक वाचा: दुष्काळी पट्टयात फुलतंय पंचवीस वर्षे जगणारं हे झाड.. कशी केली जाते शेती

Web Title: Organic strawberry farming pattern of tribal farmers is yielding more income than rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.