राहाटी येथील सुशिक्षित तरुण शंकर कौसले या शेतकऱ्यांने १० गुंठे क्षेत्रावर डिसेंबर महिन्यात वांग्याची लागवड करून १०० दिवसांत ८० हजार रुपये कमावले आहेत.
कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पालगत असलेले राहाटी येथील शेतकरी शकंर कौसले यांनी डिसेंबर महिन्यात वांग्याची लागवड केली. कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी त्यांनी वांग्याची लागवड करण्याचा निर्णय घेत लागवड केली. बियाणे खरेदी व लागवड खर्च आतापर्यंत १५ हजार रुपये आल्याचे शेतकऱ्याने सांगितले. खर्च वजा जाता संबंधित शेतकऱ्यास ८० हजार रुपये उत्पादनात मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले. १० गुंठे क्षेत्रावर १ हजार वांग्याची झाडे डिसेंबर महिन्यात लावण्यात आली होती.
सध्या वांगे तोडणीस सुरुवात झाली असून एका वांग्याचे वजन तीन ते साडेतीन किलो आहे, तर एका वांग्यापासून जवळपास २७ ग्राम बियाणे तयार होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वांग्याच्या बियाण्याचा दर ९५ हजार रुपये क्विंटल आहे. सरासरी १५ हजार रुपये खर्चात गेली तरी ८० हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार असल्याचे सांगितले.