लाल चुटूक सफरचंद आता रखरखीत मराठवाड्याच्या मातीत पिकताहेत! असे सांगितल्यास तुमचा विश्वास बसेल? पण हे खरंय.हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर यांसारख्या थंड हवामान असलेल्या प्रदेशात पिकणारं हे फळ आता मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या मातीत पिकतंय. पारंपरिक शेतकी धोरणांना फाटा देत गेवराई तालुक्यातील मिरकाळा येथील शेतकऱ्याने धाडसी प्रयोग करत शेतात सफरचंदाची लागवड केली आहे. सफरचंदाची झाडे तीन वर्षांची झाली असून आता हिरवीगार फळे लगडली आहेत.
हिमाचलमधून मागवली रोपं
गढीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरकाळा गाव. या गावातील शेतकरी पोपट ढाकणे यांनी हिमाचल प्रदेशातून मागविली रोपे राज्यात सोलापूर, सांगली, अहमदनगर येथे काही शेतकऱ्यांनी सफरचंद लागवड केली आहे. परंतु सफरचंद फळाची आपल्या शेतीतदेखील लागवड करावी, असे ढाकणे यांनी ठरवले. मात्र, महाराष्ट्रात रोपे नसल्याने त्यांनी हिमाचल प्रदेशातील एका व्यापाऱ्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधत रोपे मागितली.
सफरचंद लगडली..
मोसंबी, डाळिंब यांसह हंगामी पिके घेतली आहेत. परंतु इतरांपेक्षा वेगळे व नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करावी, असे त्यांनी ठरवले. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना येथील शेतकऱ्यांच्या फळबाग बघत त्यांचा आदर्श घेतला आहे. ढाकणे यांनी तीन वर्षांपूर्वी शेतात सफरचंदाची २०० झाडे लावलेली होती. आता एका झाडाला ४० ते ५० फळे लागली आहेत. सध्या एका फळाचे सरासरी १०० ग्रॅमपर्यंत वजन आहे. या बहरातील सफरचंदाची फळे मे-जून महिन्यामध्ये विक्रीसाठी तयार होणार आहेत. दीड टनापर्यंत फळ निघणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
शेतीत नवनवीन प्रयोग करतोत. तीन वर्षापूर्वी सफरचंदाची शेती करावी, असा डोक्यात विचार आला, तो प्रत्यक्षात उतरवला. इतरांप्रमाणे मलाही जिल्ह्यातील वातावरणात सफरचंद तग धरेल का असा प्रश्न होता. परंतु बीड जिल्ह्यातदेखील सफरचंदाची शेती होऊ शकते हे निश्चित झाले आहे. अजून सफरचंदाचे क्षेत्र वाढविण्याचा विचार आहे.-पोपट ढाकणे, सफरचंद उत्पादक, मिरकाळा.
पारंपरिक शेतीसह महाराष्ट्रातले अनेक शेतकरी अनेक नवनव्या प्रयोगांमधून यशस्वी शेती करत आहेत. थंड प्रदेशातील अनेक फळांची लागवड उष्णकटिबंधीय प्रदेशातही होत असल्याची अनेक उदाहरणे दिसू लागली आहेत.तुळजापूरातील दुष्काळी जमिनीवर केवळ १२ गुंठ्यात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करणारे शेतकरी आता चांगलं उत्पन्न मिळवताहेत. काहींनी ड्रॅगन फ्रूट लावत कर काहींनी रेशीम शेती करत नव्या शेतीचा पर्याय स्विकारला आहे.
हेही वाचा-
ताजी स्ट्रॉबेरी आता पिकतेय तुळजापुरात! १२ गुंठ्यात यशस्वी प्रयोग
चाकण औद्योगिक नगरीत फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती
रेशीम शेतीतून साधला मार्ग! तूती लागवडीतून खर्च वगळून वर्षाकाठी ६ लाखांचे उत्पन्न
शेतीतील अशाच यशकथांसाठी फॉलो करा 'लोकमत ॲग्रो' च्या व्हॉटसॲप ग्रूपला..
https://chat.whatsapp.com/C4PI000UzoO6Nxvnhfn8q1