रऊफ शेख
फुलंब्री तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वनाथ माणिकराव काकडे यांनी कुकुपालनामध्ये ४२ दिवसात ब्रॉयलर कोंबड्यांचे विक्रमी १० टन उत्पादन घेतले.अवघ्या ४२ दिवसात त्यांनी यातून १४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. सध्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या दारात दुप्पटीने वाढ झाल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
पारंपरिक शेतीत हाती काहीही उरत नसल्याने अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळले असून वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
यापूर्वी केली होती सफरचंद लागवड
राजेश काकडे यांची ८ एकर शेती.त्यांनी यापूर्वी फरचंद लागवड करून शेतीमध्ये नवीन प्रयोग केला होता. तो प्रयोग यशस्वी झाला. मग त्यांनंतर त्यांनी केवळ १० गुंठे जागेवर २०१७ मध्ये कुकुटपालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला या व्यवसायात जेमतेम नफा मिळाला असला तरी यंदा त्यांना अवघ्या ४२ दिवसात १४ लाखांच्या वर उत्पन्न मिळाले आहे.
उन्हाचा पारा जातोय वर
उन्हाचा पारा ४० वर गेलेला असताना उन्हामुळे या व्यवसायामधील अनेक ठिकाणचे कुक्कुट पालन केंद्र बंद पडले. पण विश्वनाथ काकडे यांनी पाण्याची व त्या कोंबड्या न खाद्याची व्यवस्था नीटनेटकी केल्याने कोंबड्या उत्पादन चांगले निघाले. मंगळवारी १० टन कोंबड्यांमधून ६ टन कोंबड्या विकल्या. त्यातून त्यांना ९ लाख रुपये एकरकमी मिळाले. उर्वरित ४ टन कोंबड्या शुक्रवारी विकल्या जाणार असल्याचे ते सांगतात. यातून त्यांना ५ लाख ४० हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे.
पाठबंधारे विभागात नोकरी करून २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मी कुकुटपालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातील २ हजार कोंबड्यांचे उत्पन्न घेणे सुरु केले. आता १० हजार वर पोहचले. मागील आठवड्यात १२० चा भाव होता. आता १५० वर गेला आहे. पहिल्यांदाच विक्रमी भाव ब्रॉयलर कोंबड्यांना मिळाला असल्याचे कुकुट पालन व्यवसायिक विश्वनाथ काकडे सांगतात.
४२ दिवसांपूर्वी पालन केलेल्या त्यांच्या बॉयलर कोंबड्या आता दहा टन वजनाच्या झाल्या असून, यातील सहा टन कोंबड्या विकून त्यांना मंगळवारी ९ लाख रुपये मिळाले. उर्वरित ४ टन कोंबड्यांचाही करार झाला असून त्यातून ५ लाख ४० हजार रुपये मिळणार आहेत. त्यांना केवळ ४२ दिवसांतच १४ लाख ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील तीन महिन्या पूर्वी ब्रॉयलर कोंबड्यांचे प्रती किलो दर ७० ते ८० रुपये होते. यात आता दुप्पटीने वाढ झाली आहे. प्रतिकिलो १५० पर्यंत भाव पोहचले असल्याने याचा चांगला आर्थिक फायदा कुकुटपालन व्यावसायिकाला झाला आहे.