Lokmat Agro >लै भारी > Poultry Success Story : पोल्ट्रीने दिली आर्थिक प्रगतीची संधी; क्षीरसागर कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी

Poultry Success Story : पोल्ट्रीने दिली आर्थिक प्रगतीची संधी; क्षीरसागर कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी

Poultry Success Story : Poultry provided an opportunity for economic progress; An inspiring story of the Kshirsagar family | Poultry Success Story : पोल्ट्रीने दिली आर्थिक प्रगतीची संधी; क्षीरसागर कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी

Poultry Success Story : पोल्ट्रीने दिली आर्थिक प्रगतीची संधी; क्षीरसागर कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी

आयुष्यातील संकटांना तोंड देत वडीलोपार्जित ४ एकर शेतीला कुक्कुटपालनाची (Poultry Farming) जोड देत पांगरा (Pangara) येथील शिवाजीराव व सुनंदा या क्षीरसागर दांपत्यानी ३१ एकर पर्यंत आपल्या शेतीचा विस्तार केला आहे. 

आयुष्यातील संकटांना तोंड देत वडीलोपार्जित ४ एकर शेतीला कुक्कुटपालनाची (Poultry Farming) जोड देत पांगरा (Pangara) येथील शिवाजीराव व सुनंदा या क्षीरसागर दांपत्यानी ३१ एकर पर्यंत आपल्या शेतीचा विस्तार केला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

आयुष्यातील संकटांना तोंड देत वडीलोपार्जित ४ एकर शेतीला कुक्कुटपालनाची जोड देत पांगरा येथील शिवाजीराव व सुनंदा क्षीरसागर दांपत्याने आपल्या शेतीचा विस्तार ३१ एकर पर्यंत केला आहे.

१९९२ मध्ये लग्न झाल्यानंतर पाठीशी लागलेली जबाबदारी आणि वडीलोपार्जित अवघे ४ एकर क्षेत्र यामुळे शेतीला जोडधंद्यांची गरज जाणवली. पारंपरिक पिकांना फाटा देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील पांगरा येथील शिवाजी लिंबाजी क्षीरसागर यांनी १९९३ मध्ये ५०० पक्ष्यांपासून कुक्कुटपालनास सुरुवात केली. आज गेल्या ३० वर्षांच्या यश-अयशाच्या काळात क्षीरसागर परिवाराने कुक्कुटपालनाच्या जोरावर आपल्या ४ एकर शेतीचा ३१ एकरपर्यंत विस्तार केला आहे.

सध्या या ३१ एकरांतील ५ एकरवर ३१ फुट बाय ५०० फुट आकाराचे ५ शेड आहेत, ज्याद्वारे ८ ते ९ वार्षिक बॅचचे नियोजन केले जाते. यामध्ये जवळपास ६० हजार पक्षांचे संगोपन केले जाते. तसेच बारमाही पाण्यासाठी २ एकर क्षेत्र, विहीर, बोअरवेल आणि तीन एकर सीताफळ बाग आहे. उर्वरित क्षेत्रात कुक्कुटपालनासाठी आवश्यक असलेला मका पिकाचे उत्पादन घेतले जाते.

अशा प्रकारे चालते बॅच..

दैनंदिन बदलत्या दरांनुसार १ दिवस वयाचे पक्षी खरेदी केले जातात. त्यांचे ४०-४५ दिवस संगोपन केले जाते, ज्यामध्ये प्रति पक्षी २.५-२.८ किलो वजनवाढ होते. ५ व्या दिवशी लासोटा, १२ व्या दिवशी गंबोरो, आणि २२ व्या दिवशी लासोटा बुस्टर डोस दिला जातो. नंतर बाजाराच्या दरांचा अंदाज घेत जागेवर विक्री केली जाते.

आधुनिक पद्धतींचा वापर, मेहनत कमी

क्षीरसागर यांनी पोल्ट्री शेडमध्ये पक्ष्यांना खाद्य आणि पाण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेचा उपयोग केला आहे. फिड मिलमधून मका भरडा व इतर खाद्य थेट पक्षांपर्यंत पोहचत असल्याने मेहनत कमी झाली असल्याचे शिवाजीराव सांगतात.

सुनंदाताईंची खंबीर साथ

पोल्ट्रीमध्ये विविध दैनंदिन कामे पत्नी सुनंदा आणि मुलगा शुभम बघतात, तर शिवाजीराव मका व इतर खाद्य खरेदी, पक्षी विक्री आदी कामे सांभाळतात. पत्नी आणि मुलाच्या मदतीमुळे बाहेरून मजूर बोलवण्याची गरज पडत नाही. घरच्या सदस्यांच्या मदतीने देखभाल होत असल्याने वेळोवेळी पक्षांचे निरीक्षण होते. त्यामुळे विविध आजाराने ग्रस्त पक्षी किंवा व्यवस्थापनातील अडचणी त्वरित लक्षात येतात, असे सुनंदाताई सांगतात.

शेतकऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत

खाद्यासाठी लागणारा २५-३० क्विंटल मका परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. पोल्ट्रीमधून निघणारे वार्षिक ५०० ट्रॉली कोंबडीखत प्राधान्याने मका खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना ३ हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे दिले जाते.

 

Web Title: Poultry Success Story : Poultry provided an opportunity for economic progress; An inspiring story of the Kshirsagar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.