बापू नवले
अद्यावत यंत्रणा, विविध प्रकारच्या मोजणीच्या कामामधून राज्याबाहेरील मोजणीच्या कामावर आपली केडगाव ता. दौंड येथील युवा उद्योजक प्रकाश दत्तू गरदरे यांनी कमांड ठेवली आहे.
चार तालुक्यात प्रथमच त्यांनी डीजीपीएस हे मशीन घेऊन सॅटेलाईटच्या मदतीने मोजणी करत १०० टक्के अचूक मोजमाप करण्यासाठीचे मशीन वापरले आहे. हे मशीन त्यांनी २०१५ साली खरेदी केले आहे. त्यावरून केले गेलेले मोजमाप हे बिनचूक असून विश्वासार्ह असल्याने या मशीनला राज्याबाहेर मागणी आहे.
२०१० साली संगणक प्रशिक्षण केंद्र केडगाव येथे सुरू केले होते. तो व्यवसाय बंद करून मोजणी व्यवसायात सुरू करण्याचा विचार केला. त्या कालावधीमध्ये आर्थिक प्रचंड पडझड झाली. या पडझडीमध्ये पत्नी माया कोकरे यांनी प्रचंड साथ दिली.
त्यानंतर त्यांनी मोजणी व्यवसायात प्रवेश केला. अद्यावत तंत्रज्ञान संगणक यंत्रणेचा पुरेपूर वापर करत ग्रामीण भागातील शेतकरी मध्यमवर्गीय यांच्यासाठी मोजणीच्या वेगवेगळ्या सोप्या पद्धती सांगितल्या.
बाजारात आधुनिक कोणत्या मशीन आहेत याचा शोध घेत त्यांनी डीजीपीएस हे अद्यावत मशीन दौंड, बारामती, शिरूर, इंदापूर, श्रीगोंदा या तालुक्यातील प्रथमच खरेदी करणारे ते प्रथम व्यावसायिक आहेत, हे तंतोतंत मोजणी करण्यासाठीचे मशीन विविध शासकीय मोजमापासाठी भाड्याने देखील घेतले जाते.
या मशीनला विविध स्वयंचलित सूचना देणारी यंत्रणा असल्यामुळे तांत्रिक दोष मुक्त हे मशीन सध्या प्रचलित झाले आहे. अनेक लोकांचे बांधावरील वाद मिटवण्यात प्रकाश गरदरे यांना यश आले आहे.
श्री सर्वेअर च्या माध्यमातून त्यांनी दौंड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे बांधावरील वाद मिटवले त्यांना हद्दी कायम करून देणे. जमिनीची लेवल काढून देणे. विविध बिल्डिंग व कन्स्ट्रक्शन साइटवर लागणाऱ्या मोजणीच्या अत्याधुनिक सेवा पुरवल्या.
भावा भावांच्यातील पोट हिस्से पाडून देणे. आधुनिक पद्धतीच्या मोजणीच्या सोयीस्कर पद्धतीतून नागरिकांना समजेल अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. नॉन अग्रिकल्चर क्षेत्र (बिगरशेती) करण्यासाठी व्यावसायिकांना मदत करत त्यांच्या एन ए ऑर्डर काढण्यासाठी मदत केली.
भूमि अभिलेख विभागाकडुन हकायम, पोटहिस्सा, बिगरशेती, भूसंपादन, कोर्टवाटप, कोर्टकमीशन, गुंठेवारी मोजणी केली जाते. तसेच अर्जदार यांनी भरणा केलेल्या मोजणी फ्री नुसार नियमित, तातडी, अतितातडी, अतिअतितातडी या कालावधीच्या प्रकारात मोजणी करून दिली जाते. यासाठी सर्व ऑनलाईन अर्ज, चलन या कामे देखील मदत केली जाते.
कुटुंबातूनच मिळाले व्यवहार ज्ञानाचे बाळकडू
• वडगाव बांडे ता. दौंड येथील शेतकरी कुटुंबात प्रकाश गरदरे यांचा जन्म झाला. आजोबा कै. बापूराव नामदेव गरदरे व आजी शकुंतला यांच्या संस्कारात त्यांची वाढ झाली. चुलते निवृत्त उपाधीक्षक भूमि अभिलेख दौंड भागूजी गरदरे यांच्या दूरदृष्टीतून प्रकाश यांनी जमीन मोजणी हा व्यवसाय सुरू केला.
• व्यवसायाचे बाळकडू त्यांनीच दिल्याने व्यवसायाला दिशा मिळाली. आपले चुलत बंधू निलेश संजय गरदरे यांना देखील या व्यवसायात पाठिंबा देत यशस्वी केले. आई विमल व वडील दत्तु गरदरे यांसह चुलते भागुजी व संजय गरदरे यांनी एकत्रित कुटुंब पद्धत यांच्यात रुजवली.
• या संस्कारात वाढल्यामुळेच कमी वयात समज आली. व्यवसायात त्यांनी उतुंग प्रगती केली. व्यवहार ज्ञानाचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाल्याने कुटुंबाची देखील उन्नती झाली. कासुर्डी तालुका दौंड येथील स्नेही कै. संदीप ठोंबरे यांची देखील वेळोवेळी मोलाची साथ लाभली.
अधिक वाचा: Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती आता घरबसल्या करता येईल मोबाईलवरून अपडेट