Lokmat Agro >लै भारी > प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड

प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड

Prashant cultivated this healthy wheat; Integration of processing and marketing | प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड

प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड

बारामती तालुक्यातील मळद येथील शेतकऱ्याने खपली गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आरोग्यदायी असणाऱ्या या वाणाचे गव्हाबरोबरच भरडा करून लापशी/दलिया मागणीनुसार विक्री करण्यात येते.

बारामती तालुक्यातील मळद येथील शेतकऱ्याने खपली गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आरोग्यदायी असणाऱ्या या वाणाचे गव्हाबरोबरच भरडा करून लापशी/दलिया मागणीनुसार विक्री करण्यात येते.

शेअर :

Join us
Join usNext

प्रशांत ननवरे
बारामती तालुक्यातील मळद येथील शेतकऱ्याने खपली गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आरोग्यदायी असणाऱ्या या वाणाचे गव्हाबरोबरच भरडा करून लापशी/दलिया मागणीनुसार विक्री करण्यात येते.

अशी माहिती शेतकरी प्रशांत शेंडे यांनी दिली. त्यानुसार, सन २०११-१२ साली कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत एकता शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली आहे.

गटाच्या माध्यमातून विविध हंगामातील पिकांविषयी मार्गदर्शनाचा कार्यक्रम, शेतीतज्ज्ञ यांचे मार्गदर्शनाचे कार्यक्रम, शिवार फेरी, प्रशिक्षणे, अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून सुधारित तंत्रज्ञान शेतात वापर, सुधारित बियाणे, बाजारपेठ इत्यादी माहिती मिळत गेली.

त्या अनुषंगाने पाच-सहा वर्षांपूर्वी रब्बी हंगामात गहू व खपली गव्हावर संशोधन करणाऱ्या होळ येथील आधारकर संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये खपली गव्हाविषयी दैनंदिन आहारातील त्याचे महत्त्व समजले. त्यानंतर, शेंडे यांनी पाच-सहा वर्षांपासून खपली गव्हाची लागवड केली.

खपली गहू इतर गव्हासारखाच भारी, चोपन जमिनीतही येतो. साधारण चार ते साडेचार महिन्यांमध्ये खपली गहू काढण्यास योग्य होतो. गहू काढणीपर्यंत चार ते पाच पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. पाण्याच्या पाळीबरोबर जीवामृताची मात्रा दिली जाते.

खपली गहू पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ती वाढविणारा आहे. मधुमेह (रक्तातील साखर म्हणजेच ग्लुकोज कमी करण्यास मदत), हृदयविकार (हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास मदत), पोटाचे आजार, कर्करोग इत्यादी आजारी रुग्णांच्या आहारासाठी योग्य.

यामध्ये पाचक पदार्थ (तंतुमय पदार्थ), प्रथिने कमी असतात. हे पदार्थ मधुमेह रुग्णांसाठी अपायकारक मानले जातात. ते खपली गव्हामध्ये कमी असतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, तसेच यामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्त्व असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात. गरोदर महिलांच्या आहारात हा गहू अत्यंत पौष्टिक आहे. याचा महत्त्वाचा गुण म्हणजे शरीरातील
हाडांची, दातांची झीज भरून काढतो.

परिवाराचा हातभार
• खपली गव्हाला शेतातील नांगरटपासून, पेरणी, औषधे, खते, हार्वेस्टिंग, भरडणे, क्लीनिंग, पॅकिंग ते माल तयार होईपर्यंत २५ ते ३० रुपये प्रति किलो खर्च येतो.
• धान्य-बाजारात (मार्केट कमिटी) विक्री न करता थेट ग्राहकाला विक्री करतो, या शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीमुळे ग्राहकाला धान्य मिळते.
• विविध शेती उत्पादनासाठी शेंडे यांना त्यांच्या पत्नी कल्पना यांची मोठी मदत होते.
• कल्पना ज्वारीचे अधिक उत्पन्न घेतल्याबद्दल स्पर्धेत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
• तसेच त्यांचा मुलगा प्रतीक हा बीएससी अॅग्री असून शेतातील फळे, धान्याचे मार्केटिंग करण्यास त्यांची मदत मिळते, असे शेंडे म्हणाले.

अधिक वाचा: तुर्की बाजरीने केली कमाल ढेकळवाडीचे शेतकरी नानासाहेब झाले मालामाल

Web Title: Prashant cultivated this healthy wheat; Integration of processing and marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.