Join us

४० गुंठे जमिनीतील द्राक्ष बागेतून १२ लाखांचे उत्पादन, केली युरोपात निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 10:29 AM

गंजेवाडीतील १२ टन द्राक्ष गेले युरोपच्या बाजारात

यंदा द्राक्ष दरामध्ये चढ उतार झाल्याने व एकरी उतारा कमी मिळाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला. परंतु, मार्च महिन्यात उन्हाचा पारा वाढ वाढल्याने द्राक्ष भावात थोडी फार वाढ झाली असून, तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी सुदर्शन जाधव यानी ४० गुंठे क्षेत्रात १४ टन द्राक्षाचे उत्पादन घेतले. यातील १२ टन द्राक्षे युरोप देशात निर्यात केली आहेत. याचा त्यांना ९५ रुपये प्रतिकिलो भाव पदरात पडला असून, १३ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले.

गंजेवाडी येथील सुदर्शन जाधव यांच्याकडे १३ एकर क्षेत्रात द्राक्ष बाग आहे. माळरान जमिनीवर कष्टाने उभ्या केलेल्या द्राक्ष बागेतील अवघ्या चाळीस गुंठे जमिनीत त्यांनी 'क्लोन २ एवन' या जातीच्या द्राक्षाचे उत्पादन घेतले. यातून त्यांना १४ टन द्राक्षाचे उत्पादन झाले असून, याला बांधावरच प्रतिकिलो ९५ रुपये किलो असा भाव मिळाला. जाधव यांनी यातील १२ टन द्राक्षे युरोप देशात निर्यात केली आहेत.

यंदा बाजारात द्राक्षाच्या भावात सुरुवातीला घसरण झाली. मात्र, एप्रिल महिन्यात उन्हाच्या पाऱ्यासोबतच द्राक्षाच्या भावातही वाढ झाली. यामुळे सुदर्शन जाधव यांना १ एकरातून १३ लाख रुपयाचे उत्पादन मिळाले आहे. सध्या गावागावात पाण्याची समस्या निर्माण होत आहे. परंतु, जाधव यांनी १ कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यामध्ये सध्या द्राक्ष बागांना पुढील तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा राखून ठेवला आहे. यामुळे उन्हाळा संपेपर्यंत द्राक्ष बागेच्या पाण्याची त्यांना चिंता नाही.

द्राक्षाच्या स्वर्चात गंजेवाडी येथील शेतकरी सुदर्शन जाधव यांच्या बागेतील द्राक्ष सध्या युरोप देशात निर्यात होत आहेत. वर्षाला वाढ होत आहे. मात्र, दरात वाढ झालेली नाही. यंदा सुरुवातीला द्राक्षाचे दर ढासळले होते. परंतु, आता उन्हाचा कडाका वाढल्याने भावात वाढ झाली आहे. मला १ एकरात १३ लाखाचे उत्पादन मिळाले असून, १२ टन द्राक्षे युरोप देशात निर्यात झाली आहेत.- सुदर्शन जाधव,शेतकरी, गंजेवाडी

टॅग्स :द्राक्षेशेती क्षेत्रशेती