Lokmat Agro >लै भारी > Poultry Success Story : वयाच्या १० व्या वर्षी अपंगत्व येऊन पोल्ट्री व्यवसायातून हा शेतकरी कमावतोय २४ लाखांचा नफा

Poultry Success Story : वयाच्या १० व्या वर्षी अपंगत्व येऊन पोल्ट्री व्यवसायातून हा शेतकरी कमावतोय २४ लाखांचा नफा

Pune junnar aurangpur handicap Uttam Dukare Poltry Farm Success Story | Poultry Success Story : वयाच्या १० व्या वर्षी अपंगत्व येऊन पोल्ट्री व्यवसायातून हा शेतकरी कमावतोय २४ लाखांचा नफा

Poultry Success Story : वयाच्या १० व्या वर्षी अपंगत्व येऊन पोल्ट्री व्यवसायातून हा शेतकरी कमावतोय २४ लाखांचा नफा

Poultry Success Story : २००७ सालापासून सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाने आता भरारी घेतली असून पोल्ट्री व्यवसायातील जाणकार म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ७० ते ८० शेतकऱ्यांनी पोल्ट्री उद्योग सुरू केला आहे. 

Poultry Success Story : २००७ सालापासून सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाने आता भरारी घेतली असून पोल्ट्री व्यवसायातील जाणकार म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ७० ते ८० शेतकऱ्यांनी पोल्ट्री उद्योग सुरू केला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Pune Uttam Dukare Poltry Farm Success Story : एका पायाने अपंग अन् कुटुंबाची जबाबदारी असूनही संकटाशी दोन हात करत पोल्ट्री उद्योगातील यशस्वी माणूस म्हणजे जुन्नर तालुक्यातील औरंगपूर येथील उत्तम डुकरे. त्यांनी २००७ सालापासून सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाने आता भरारी घेतली असून पोल्ट्री व्यवसायातील जाणकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ७० ते ८० शेतकऱ्यांनी पोल्ट्री उद्योग सुरू केला आहे. 

पुणे जिल्ह्याचील जुन्नर तालुक्यातील शेती ही पुढारलेली आहे. येथील शेतकरी शेतात नवनवे प्रयोग करत असतात. तर बाजारपेठा जवळ असल्यामुळे येथील शेतकरी सधन आहेत. तर या तालुक्यातील औरंगपूर येथील उत्तम डुकरे हे यशस्वी पोल्ट्री व्यवसायिक आहेत. इयत्ता पाचवीमध्ये असताना उत्तम यांच्या पायावर लाकूड पडल्याने त्यांच्या पायाला मार लागला आणि पुढे त्यांचा पाय काढावा लागला. यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले. पण खचून न जाता त्यांनी शेती करायचं ठरवलं. 

साधारण २००७ साली त्यांनी ओपन शेडमध्ये बॉयलर पोल्ट्री व्यवसायाला सुरूवात केली. योग्य व्यवस्थापन आणि नियोजनामुळे त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत होते. पुढे काही वर्षे त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे केला. व्यवसायातील बारकावे जाणून घेत काम केल्यामुळे त्यांनी अनेकांना पोल्ट्री व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. 

ओपन शेडमध्ये पोल्ट्री फार्मिंग करत असताना २०१४ साली काही जाणकारांनी त्यांना EC (Environment Controlled) पोल्ट्री शेड  सुरू करण्याची कल्पना दिली होती. त्यानंतर २०१८ साली त्यांनी या शेडची उभारणी केली. पण उभारणी केल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या शेडमधून पोल्ट्री फार्मची इत्यंभूत माहिती देणारे जाणकार कुणीच नसल्याने त्यांनी स्वतःच शिकून अडचणींवर मात केली. 

योग्य आणि काटेकोर व्यवस्थापनामुळे उत्तम यांना प्रत्येक बॅचमधून चांगलं उत्पन्न मिळत आहे. अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. आत्तापर्यंत त्यांनी ७० ते ८० शेतकऱ्यांना ईसी पोल्ट्री शेड उभे करण्यास मदत केलीये. त्यांचे मार्गदर्शन घेऊन उभे केलेले कित्येक शेडच्या माध्यमातून शेतकरी लाखोंचा नफा कमावत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
 
उत्पन्न
उत्तम यांच्या दोन्ही ईसी शेडमध्ये १६ हजार पक्ष्यांची क्षमता आहे. वर्षाकाठी या दोन्ही शेडमध्ये साधारण ६ ते ७ बॅच निघतात. तर एका बॅचमधून उत्तम यांना ३ लाखांचा निव्वळ नफा राहतो. वर्षाकाठी उत्तम यांना खर्च वजा जाता २१ ते २४ लाख रूपयांचा निव्वळ नफा राहतो. त्यांचे उत्पन्न हे एका चांगल्या व्यवसायिकाला तोंडात बोट घालायला लावण्यासारखे आहे. 

दरम्यान, लहानपणापासून एक पाय नसलेला व्यक्ती जिद्दीने हा व्यवसाय करतो आणि आज महिन्याकाठी २ लाखांचा निव्वळ नफा कमावतो ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना लखपती बनवू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. 

Web Title: Pune junnar aurangpur handicap Uttam Dukare Poltry Farm Success Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.