Lokmat Agro >लै भारी > Purandar Custard Apple : पुरंदरच्या सिताफळाचा जगात डंका! अरब देशातील निर्यात सक्सेसफुल!

Purandar Custard Apple : पुरंदरच्या सिताफळाचा जगात डंका! अरब देशातील निर्यात सक्सेसफुल!

Purandar highlands custard apple famous in world Successful export Arab countries | Purandar Custard Apple : पुरंदरच्या सिताफळाचा जगात डंका! अरब देशातील निर्यात सक्सेसफुल!

Purandar Custard Apple : पुरंदरच्या सिताफळाचा जगात डंका! अरब देशातील निर्यात सक्सेसफुल!

फ्रेश सिताफळ अरब देशांतील सुपर मार्केटमध्ये पाठवण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. पुरंदर हायलँड्स ही पुरंदर येथील शेतकरी उत्पादक कंपनी आणि सायऑन अॅग्रिकॉस या आंतरराष्ट्रीय कंपनीने मिळून सिताफळाची निर्यात केली आहे. 

फ्रेश सिताफळ अरब देशांतील सुपर मार्केटमध्ये पाठवण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. पुरंदर हायलँड्स ही पुरंदर येथील शेतकरी उत्पादक कंपनी आणि सायऑन अॅग्रिकॉस या आंतरराष्ट्रीय कंपनीने मिळून सिताफळाची निर्यात केली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Pune Custard Apple : पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध सिताफळ आता शेतकरी उत्पादक कंपनीच्या साहाय्याने परदेशातील सुपर मार्केटमध्ये निर्यात झाले असून तेथील ग्राहकांच्या पसंतीस पडले आहे. पुरंदर तालुक्यातील सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी उपलब्धी असून येणाऱ्या काळात निर्यातीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील स्थानिक वाणाचे म्हणजेच फुले पुरंदर हे सिताफळ प्रसिद्ध आहे. सिताफळाच्या तोडणीनंतरची टिकवणक्षमता कमी दिवसांची असल्यामुळे निर्यात कमी प्रमाणात होते. त्यामुळे सिताफळाचा पल्प काढण्याचे अनेक व्यवसाय पुरंदर तालुक्यात उभे राहिले आहेत. पण पुरंदर हायलँड्स ही शेतकरी उत्पादक कंपनी आणि सायऑन अॅग्रिकॉस या आंतरराष्ट्रीय कंपनीने मिळून सिताफळाची अरब देशांत निर्यात केली आहे. फ्रेश सिताफळ अरब देशांतील सुपर मार्केटमध्ये पाठवण्याचा हा पहिलाच प्रयोग होता.  

हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे सुरूवातीला ६०० किलो सिताफळाची निर्यात करण्यात आली आहे. हे सिताफळ अरब देशांतील विविध सुपर मार्केट आणि प्रिमिअम स्टोअरमध्ये विक्री केले गेले आणि तेथील ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. चव, गोडी आणि एकूणच सिताफळाची प्रत पाहून खरेदीदारांनी पुढील ऑर्डरही दिल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात आता पुरंदरच्या सिताफळ निर्यात वाढीस चालना मिळणार आहे.

दरम्यान, पुरंदर हायलँड्स या कंपनीने येथील भौगोलिक मानांकनप्राप्त अंजिराचा जगातील पहिला ज्यूस बनवला असून त्याचे पेटंटही मिळवले आहे. हे ज्यूस त्यांनी जगातील विविध एक्स्पोमध्ये सादर केल्यानंतर तेथील ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यानच्या काळात दुबई येथे पार पडलेल्या गल्फफूड ग्रीन या प्रदर्शनामध्ये सिताफळ आणि अंजिराचा ज्यूस डिस्प्ले करण्यात आला होता. त्यावेळीच सिताफळाची ऑर्डर मिळाली आणि पहिल्या टप्प्यात ६०० किलो सिताफळ यशस्वीरित्या निर्यात करण्यात आले आहे.


पुरंदर हायलँड्स या शेतकरी उत्पादक कंपनीने परदेशातील सुपर मार्केटसाठी सिताफळ निर्यात करण्याची पहिलीच वेळ होती. दुबई येथे झालेल्या गल्फफूड ग्रीन या प्रदर्शनामध्ये ओळखीदरम्यान ही ऑर्डर मिळाली होती. आता हे सिताफळ तेथील ग्राहकांच्या पसंतीस पडत असून आम्हाला पुढील ऑर्डर मिळाल्या आहेत. याचा फायदा फुले पुरंदर वाणाच्या सिताफळ उत्पादकांना होणार आहे. 
- रोहन उरसळ (व्यवस्थापकीय संचालक, पुरंदर हायलँड्स शेतकरी उत्पादक कंपनी)

Web Title: Purandar highlands custard apple famous in world Successful export Arab countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.