Lokmat Agro >लै भारी > कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांचा विक्रम; जगातील सर्वांत मोठे आंब्याचे पान

कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांचा विक्रम; जगातील सर्वांत मोठे आंब्याचे पान

Record of farmer Chandrakant Kajrekar from Kudal; The largest mango leaf in the world | कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांचा विक्रम; जगातील सर्वांत मोठे आंब्याचे पान

कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांचा विक्रम; जगातील सर्वांत मोठे आंब्याचे पान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेती व बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांच्या आंब्याच्या हापूस झाडावर आलेले पान ठरले जगातील सर्वांत मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान, आणि चंद्रकांत काजरेकर ठरले जागतिक रेकॉर्ड होल्डर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेती व बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांच्या आंब्याच्या हापूस झाडावर आलेले पान ठरले जगातील सर्वांत मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान, आणि चंद्रकांत काजरेकर ठरले जागतिक रेकॉर्ड होल्डर.

शेअर :

Join us
Join usNext

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेती व बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांच्या आंब्याच्या हापूस झाडावर आलेले पान ठरले जगातील सर्वांत मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान, आणि चंद्रकांत काजरेकर ठरले जागतिक रेकॉर्ड होल्डर.

निसर्गात अशा बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात; पण, त्या प्रकाशात आणणे महत्त्वाचे असते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी व नंतर अकाउंट व्यवस्थापक म्हणून सुमारे ३२ वर्षे सेवा करून निवृत्त झाल्यानंतर आपली आंबा व काजू बागायतीची आवड जोपासत असताना काजरेकर यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली.

गुगलच्या साहाय्याने जागतिक रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठीत्यांनी आपल्या मुली डॉ. नालंदा परब व डॉ. नुपूर अगरवाडकर आणि जावई धीरज परब व डॉ. देवेन अगरवाडकर यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस, वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला. त्यानंतर पुनर्तपासणीचे रेकॉर्ड तयार करताना संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली.

अधिक वाचा: सांगोला येथील शेतकरी राहुल वाले यांच्या बाजरीला आले ४ फुटांपर्यंत कणीस

महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकूर, प्राध्यापक उमेश मिलिंद कामत व प्राध्यापक दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग व रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले.

या कामात डॉ. दीपाली काजरेकर, डॉ. नालंदा परब व डॉ. नुपूर अगरवाडकर व जावई धीरज परब तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओची टीम यांचे सहकार्य लाभले. व जगातील सर्वांत मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान असल्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली. कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदविले गेले. या पानाची लांबी ५५.६ सेंमी व रुंदी १५.६ सेंमी आहे. यापूर्वी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत त्यांनी नवनवीन प्रयोग केले.

यशस्वी प्रयोग
• कुडाळ येथील आपल्या राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर शेकडो सुपाऱ्या व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला.
• तसेच तळवडे सावंतवाडी येथील शेतात बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्रांच्या साहाय्याने शेती करणे.
• दुर्मीळ वनौषधीची लागवड व संवर्धन यांचेही यशस्वी प्रयोग केले आहेत.

Web Title: Record of farmer Chandrakant Kajrekar from Kudal; The largest mango leaf in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.