Join us

Success Story आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने भुईमुगाचे विक्रमी उत्पादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:42 AM

एका एकरात १७ क्विंटल भुईमुगाचे उत्पादन

प्रकाश काळे

निसर्गाचा लहरीपणा, नापिकीमुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा आली आहे. कोरडवाहू शेतीचे दिवस संपले आहेत. शेतमालाला दर नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. मात्र, चंद्रपुर (Chandrapur) जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील प्रगतिशील शेतकरी अंकित मारोती भोयर यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भुईमुगाचे विक्रमी उत्पादन घेतले.

निसर्गाची अवकृपा, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. उत्पादन खर्च जास्त त्या तुलनेत उत्पादन कमी होते. रास्त भाव मिळत नसल्याने शेती करणे परवडत नाही. एखाद्या वेळी उत्पादन झाले तर शेतमालाला कमी दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे जिकिरीचे झाले आहे.

मात्र, राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील प्रगतिशील शेतकरी अंकित भोयर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक एकर शेतात आधुनिक पद्धतीने भुईमूग groundnut पिकाची लागवड केली.

भुईमूग तीन महिन्यांचे उन्हाळी पीक (Summer crop) आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून भुईमूग पीक घेतले तर त्याला कमी खर्च येतो. आणि उत्पादनही चांगले होते. सध्या भुईमुगाला बाजारपेठेत सहा हजार रुपये दर आहे. अंकित भोयर यांनी एका एकरात १७ क्विंटल भुईमुगाचे उत्पादन घेतले.

शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, गहू, चना पिकांसोबत आधुनिक शेती केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तर त्याचा फायदा होतो. त्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करून शेतकऱ्यांच्या मनात आशेचा दीप फुलवला आहे.

आधुनिक तंत्रज्ञान मोलाचेच

बाजारपेठेत विविध प्रकारच्या जातींचे वाण उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. प्रत्येक शेतकऱ्यांनी आता आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेतकरी समृद्ध होईल.

हेही वाचा - Success Story आंब्याने दिली सुखाची दिशा; प्रगतीशील मिठ्ठू काकांची ही यशकथा

टॅग्स :पीकशेतकरीशेतीविदर्भबाजारपीक व्यवस्थापनतंत्रज्ञानशेती क्षेत्र