Join us

Rose Farming Success Story: जगाच्या फुल मार्केटवर राज करतोय मावळचा गुलाब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 11:56 AM

मावळ तालुका हा कोकण भागाच्या घाटमाथ्यावर. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथे शेतकरी भात पिकांचे उत्पादन घेत असे; परंतु आधुनिक पद्धतीने या ठिकाणी शेतकरी फूलशेती करू लागला आहे. मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरांवर फुलशेती पिकवली जात आहे.

मावळ तालुका हा कोकण भागाच्या घाटमाथ्यावर. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथे शेतकरी भात पिकांचे उत्पादन घेत असे; परंतु आधुनिक पद्धतीने या ठिकाणी शेतकरी फूलशेती करू लागला आहे. मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरांवर फुलशेती पिकवली जात आहे. सध्याच्या युगात यांत्रिकीकरण आल्याने शेतकरी बंदिस्त फुलशेती करताना दिसत आहे.

बंदिस्त फुलशेतीसाठी केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जामध्ये सवलत मिळत असते. यामुळे मावळमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा बंदिस्त फुलशेतीकडे कल गेला आहे. गुलाब, जरबेरा अशा विविध फुलांची जागतिक बाजारपेठेत मागणी मोठ्या प्रमाणावर असते.

पुणे जिल्ह्यातील मावळमधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठविले जात असतात. यामुळे लाखो रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडत असतात.

याशिवाय देशातील मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आदी मोठ्या शहरांत फुले जातील ती वेगळीच. तसेच संपूर्ण जगभरातील तरुणाईंना उत्कंठा लागलेला 'व्हॅलेंटाइन डे'च्या आठवड्यात गुलाबाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे प्रतीक असलेल्या गुलाब फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या तयारीसाठी मावळातील गुलाब फूल उत्पादक शेतकऱ्यांची तीन महिनाभर आधी लगबग सुरू असते.

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असल्याने दरवर्षी 'व्हॅलेंटाइन डे'ला मावळातून ३० ते ३५ लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होत असते. स्थानिक बाजारपेठेत ७० ते ८० लाख गुलाबांची निर्यात होत असते.

'व्हॅलेंटाइन डे'च्या पार्श्वभूमीवर मावळातील फूल उत्पादक शेतकरी हे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फुलांच्या झाडांची कटिंग व बेंडिंगला प्रारंभ करून चांगले उत्पन्न व दर्जासाठी अडीच महिन्यांपासून दिवस-रात्र शेतात राबत असतात.

२० जानेवारी ते १० फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांच्या निर्यातीचा कालावधी असतो. मावळ तालुक्यातील पोषक वातावरण असल्याने फुलांच्या उत्पादनाबरोबर दर्जाही उत्तम असते. पोषक वातावरणामुळे औषधांवर होणारा नाहक होणारा खर्च कमी होत असतो.

फुलांच्या दराची प्रतवारी ही लांबीनुसार ठरली जाते. स्थानिक व जागतिक बाजारपेठेत ४० ते ६० सेंटिमीटरच्या फुलांना मोठी पसंती असते. देशभरात मावळातील फुलांना चांगली मागणी असून, प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत सध्या एका फुलाला १० ते १५ रुपये, तर स्थानिक बाजारपेठेत १२ ते १७ रुपये भाव मिळत असतो.

'व्हॅलेंटाइन डे'ला मावळातील 'डच फ्लॉवर' प्रजातीतील लाल रंगाच्या टॉप सिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्पर क्लास, ग्रीनगला, फस्टरेड, पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राइक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉइजन, ऑरेंज (नारंगी) रंगाच्या ट्रॉफिकल अमेजॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या अवीलॉस या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे जपान, हॉलंड, थायलँड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इग्लंड, जपान, दुबई व इथिओपिया या देशांतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरु, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकाता, भोपाळ, इंदूर, सुरत, हैद्राबाद व गोवा या स्थानिक बाजारपेठेत सर्वाधिक मोठी मागणी असते.

सचिन ठाकरपवनानगर

टॅग्स :शेतीशेतकरीफुलशेतीफुलंमावळपुणेव्हॅलेंटाईन्स डेमावळ