Lokmat Agro >लै भारी > प्रयोगशील वृत्तीच्या संतोष यांनी खेकडा व मत्स्यपालनाबरोबर शेतीला दिली गती

प्रयोगशील वृत्तीच्या संतोष यांनी खेकडा व मत्स्यपालनाबरोबर शेतीला दिली गती

Santosh, who has an experimental attitude, started agriculture along with crab and fish farming | प्रयोगशील वृत्तीच्या संतोष यांनी खेकडा व मत्स्यपालनाबरोबर शेतीला दिली गती

प्रयोगशील वृत्तीच्या संतोष यांनी खेकडा व मत्स्यपालनाबरोबर शेतीला दिली गती

केवळ शेती नाही तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अधिकाधिक उत्पन्न निर्व्हळ येथील संतोष शांताराम वाघे सतत प्रयत्नशील आहेत. प्रयोगशील वृत्तीमुळे नवीन प्रयोग करीत आहेत. मिळविण्यासाठी खेकडा पालन, मत्स्यपालन हे शेतीपूरक व्यवसायही वाघे उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत.

केवळ शेती नाही तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अधिकाधिक उत्पन्न निर्व्हळ येथील संतोष शांताराम वाघे सतत प्रयत्नशील आहेत. प्रयोगशील वृत्तीमुळे नवीन प्रयोग करीत आहेत. मिळविण्यासाठी खेकडा पालन, मत्स्यपालन हे शेतीपूरक व्यवसायही वाघे उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : केवळ शेती नाही तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अधिकाधिक उत्पन्न निर्व्हळ येथील संतोष शांताराम वाघे सतत प्रयत्नशील आहेत. प्रयोगशील वृत्तीमुळे नवीन प्रयोग करीत आहेत. मिळविण्यासाठी खेकडा पालन, मत्स्यपालन हे शेतीपूरक व्यवसायही वाघे उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत.

त्यांच्या प्रयोगशील वृत्तीची दखल घेत शासनाकडून त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात लागवड करत आहेत. भात पिकाचे स्वतः चांगले उत्पादन घेत असून आसपासच्या शेतकऱ्यांनाही भात पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी शेतीशाळा, प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. एकूण ३.५३ हेक्टर क्षेत्रावर ते भात, आंबा, काजू पिकाचे उत्पादन घेत आहेत. नियोजनबद्ध लागवड केली आहे.

खरिपातील भात काढल्यानंतर विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाचेही उत्पन्न घेत आहेत. पावसाळ्यात परसदारात भाजीपाला लागवड करून अन्य शेतकऱ्यांनाही लागवडीसाठी प्रोत्साहित करत आहेत. जमिनीची मृदा तपासणी करून मृदा पत्रिकेनुसार आवश्यक खताची मात्रा उपलब्ध करून देत असल्याने पिकाच्या उत्पादकतेत वाढ झाली आहे.

सेंद्रिय उत्पादनासाठी बागेतील पालापाचोळा एकत्र करून गांडूळ खत युनिट तयार केले असून, त्याचाच वापर शेतीसाठी सर्वाधिक करत आहेत. शिवाय बायोगॅस युनिट तयार केले असून त्यामुळे इंधनखर्चात बचत झाली आहे. 

लागवडीपासून देखभाल
- कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी मशागतीला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे संतोष वाघे सतत शेतीच्या कामात व्यस्त असतात.
खते, कीटकनाशक वापर असो किवा लागवड ते उत्पादनापर्यंत प्रत्येक बाबीत कृषी विभागाचा सल्ला घेत असतात.
- स्वतःला मिळालेले ज्ञान कसे उपयोगी पडले याबाबत अन्य शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करत आहेत.
- मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे स्वतः शेतात राबतात. याचा त्यांना फायदाच होतो. कृषी विभागाचे मार्गदर्शन त्यांना मिळत आहे.

बांधावर गिरीपुष्पाची लागवड
बागायतीमध्ये सेंद्रिय गांडूळ खत युनिट तयार केले आहे. खताचा वापर बागायती व अन्य शेतीसाठी ते करत आहेत. शिवाय भात शेतीच्या बांधावर गिरिपुष्पाची लागवड केली आहे. गिरिपुष्पाचा पाला चिखलणीवेळी शेतात गाडला गेल्यास नत्राची मात्रा ५० टक्के आधीच उपलब्ध होते. त्यामुळे आंतरमशागत, पाणी व्यवस्थापनावरही संतोष वाघे यांचा भर आहे.

मत्स्यपालन व खेकडा पालन
आंबा, काजू बागेत वाघे यांनी मत्स्यपालन व खेकडा पालन युनिट उभारले आहे. बीज टाकण्यापासून उत्पादन तयार होऊन बाजारात जाईपर्यंत ते बारकाईने लक्ष ठेवून असतात. शेतीपूरक त्यांचा व्यवसाय यशस्वी ठरला आहे. कृषी विभागाकडून याबाबत खास मार्गदर्शन घेत आवश्यक प्रशिक्षणही घेतले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शेततळे खोदले असून त्यामध्ये खेकडा, मत्स्यपालन करत आहेत. वाढ चांगली झाल्याने बाजारात दरही चांगला मिळतो. त्यांचा प्रयोग यशस्वी झाला.

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, याचे मी पालन करतो. जमीन पडीत ठेवण्यापेक्षा ती अधिकाधिक लागवडीखाली कशी येईल यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यामुळे आंबा, काजू, भाजीपाला, भात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी वापरलेले तंत्र माझ्यापुरते मर्यादित न ठेवता, त्याचा अन्य शेतकऱ्यांना कसा फायदा होईल यासाठी मार्गदर्शन करतो. शेतीशाळा, मार्गदर्शन वर्गातूनही मार्गदर्शन करीत असल्याने याचा फायदा होईल यासाठी माझे प्रयत्न सतत सुरू आहेत. - संतोष वाघे, निर्हाळ

Web Title: Santosh, who has an experimental attitude, started agriculture along with crab and fish farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.